You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

बजेट 2021 : काय खास आहे यंदाच्या अर्थसंकल्पात?

भारताचा GDP आकुंचन पावत असण्याच्या काळात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देशाचा अर्थसंकल्प सादर केला.

लाईव्ह कव्हरेज

  1. अर्थमंत्री सीतारामन अर्थमंत्रालयात दाखल

    अर्थसंकल्प सादर करण्याआधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थमंत्रालयात दाखल झाल्या आहेत.

    अर्थसंकल्प सादर करण्याची ही त्यांची तिसरी वेळ आहे.

  2. अर्थसंकल्प नागरिकांच्या अपेक्षेनुरुप असेल-अनुराग ठाकूर

    केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी सकाळी आपल्या घरी पूजा केली. अर्थसंकल्प नागरिकांच्या अपेक्षेनुरुप असेल असं त्यांनी सांगितलं.

    'सबका साथ सबका विकास' हे बीद्र ठेऊन चालणाऱ्या सरकारने आत्मनिर्भर पॅकेजच्या घोषणेने देशाला नवी दिशा दिली आहे. कोरोनाच्या संकटातून देशाच्या अर्थव्यवस्थेला तारण्याचं काम केलं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

  3. बजेट कळत नाही? मग हा व्हीडिओ तुमच्यासाठीच आहे

    अर्थसंकल्पात अनेक तांत्रिक गोष्टी असतात. त्या समजून घेण्यासाठी हा व्हीडिओ पाहा.

  4. सरकारकडे पैसा कुठून येतो आणि कर्ज कधी घ्यावं लागतं?

    सरकारच्या सर्वात मोठ्या उत्पन्नाचा मार्ग असतो कर. मग तो प्रत्यक्ष कर (Direct Tax) असो किंवा अप्रत्यक्ष कर (Indirect Tax).

    प्रत्यक्ष कर म्हणजे कमाई करणारा कुणीही थेट किंवा व्यवहारांमार्फत थेट भरतो. म्हणजेच, प्रत्यक्ष कराची जबाबदारी तिसऱ्या कुणावर नसते. करदाता आणि सरकार यांच्यातील हा थेट व्यवहार असतो.

  5. कोरोना नियमावलीचं पालन करत सादर होणार अर्थसंकल्प

    कोरोना नियमावलीचं पालन करण्यासाठी यंदा अर्थसंकल्पाच्यावेळी काही परंपरा बदलण्यात येणार आहेत.

    संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेळी सदस्य सेंट्रल हॉलव्यतिरिक्त लोकसभा आणि राज्यसभेतही बसले होते. आतापर्यंत सेंट्रल हॉलमध्येच सगळे सदस्य एकत्र बसत.

  6. मागणीचा वेग मंदावलेली अर्थव्यवस्था लवकर रुळावर अशी येऊ शकते

  7. आज अर्थसंकल्प सादर होणार

    अर्थसंकल्पाच्या लाईव्ह कव्हरेजमध्ये आपल्या सगळ्याचं स्वागत. सुप्रभात. 2021-2022 वर्षासाठी अर्थसंकल्प आज सादर करण्यात येईल. अर्थसंकल्पाशी निगडीत सर्व अपडेट्स या लाईव्ह पेजवर तुम्ही वाचू आणि पाहू शकाल.

  8. निर्मला सीतारामण सादर करणार तिसरा अर्थसंकल्प

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. पहिल्यांदाच पेपरलेस पद्धतीचं असं हे बजेट असेल.

    काही दिवसांपूर्वीच सीतारामण यांनी युनियट बजेट मोबाईच अपचं अनावरण केलं होतं. अर्थसंकल्पाशी निगडीत सर्व दस्तावेज या अपवर उपलब्ध असतील.

    अर्थमंत्री सकाळी 11 वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. संसदेत अर्थसंकल्प सादर करण्याची ही त्यांची तिसरी वेळ आहे.

    कोरोना संकटानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे.

    कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे झालेला विपरीत परिणाम कमी करण्याच्या दृष्टीने या अर्थसंकल्पाकडे पाहत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं.

    शुक्रवारी आर्थिक सर्वेक्षण अहवाल अर्थमंत्र्यांनी सादर केला होता. आगामी आर्थिक वर्षात जीडीपी 11 टक्के राहील असा अंदाज वर्तवण्यात आला होता.