You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

बजेट 2021 : काय खास आहे यंदाच्या अर्थसंकल्पात?

भारताचा GDP आकुंचन पावत असण्याच्या काळात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देशाचा अर्थसंकल्प सादर केला.

लाईव्ह कव्हरेज

  1. रस्ते वाहतुकीसाठी मोठी तरतूद

    रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी 1,18,101 लाख कोटींची तरतूद

    8500 किलोमीटरचे रस्ते प्रकल्प पुढच्या वर्षात तयार करणार

    चांगली प्रगती दाखवणाऱ्या योजना आणि खात्यांसाठी 5.54 लाख कोटी कॅपिटल एक्स्पेंडिचर

    PSUची गोदामं विकण्यात येणार

    सार्वजनिक आरोग्य - आर्थिक वर्ष 21-22 - 2.2लाख कोटींची तरतूद

  2. टेक्सटाईल पार्क उभारणार

    -7 मेगा इन्व्हेस्टमेंट टेक्स्टाईल पार्क लाँच करणार

    -7400 प्रोजेक्ट्ससाठी नॅशनल इन्फ्रा पाईपलाईन

    -डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूट सुरू करणार

  3. ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी महत्वाची घोषणा

    20 वर्षं जुन्या खासगी वाहनांसाठी नवीन स्क्रॅपिंग पॉलिसी येणार.

  4. कोरोना लशीकरता मोठी तरतूद

    न्यूमोकॉकल व्हॅक्सिन देशभरात देण्यात येणार

    कोव्हिड 19च्या लसीसाठी 35,000 कोटींची तरतूद. आरोग्य क्षेत्रासाठीची तरतूद 137 टक्क्यांनी वाढवली.

  5. स्वच्छ भारत अभियानासाठी तरतूद

    1,41,678 कोटी - 5 वर्षांसाठी - स्वच्छ भारत मिशन 2.0

  6. राज्यनिहाय डेटाबेस

    मिशन पोषण 2.0 योजना आणि जलजीवन मिशन योजना जाहीर

    सर्व राज्यांचा हेल्थ डेटाबेस तयार करणार. 17 नवीन हेल्थ इमर्जन्सी सेंटर्स उघडण्यात येणार

  7. सार्वजनिक आरोग्यासाठी निधी

    -नवीन आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजना आणणार

    -आरोग्य कल्याणासाठी येत्या सहा वर्षात 64,180 कोटींची तरतूद

  8. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या भाषणातील मुद्दे

    -आतापर्यंत फक्त 3 वेळा अर्थव्यवस्था आकुंचित झाल्यानंतर बजेट सादर करण्यात आलंय. यावेळी जागतिक साथीमुळे अर्थव्यवस्थेत घसरण आणि आकुंचन झालेलं आहे.

    -कोव्हिड 19 साठीचा भारताचा मृत्यूदर जगात सर्वात कमी आहे.

    -अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होत असल्याचे संकेत मिळत आहेत.

    -कोरोना संकटानंतरचं हे वर्ष भारतासाठी आशेचा किरण असेल.

  9. आत्मनिर्भर भारत योजनेने 27.1 लाख कोटींची निधी मिळवन दिला-निर्मला सीतारामन

    27.1 लाख कोटींचा निधी आत्मनिर्भर भारत योजनेच्या विविध टप्प्यांवर मिळून दिला.

    लॉकडाऊन केला नसता तर परिस्थिती भीषण झाली असती आणि अडचणी आणखी वाढल्या असत्या.

    कोव्हिड काळामध्ये काम करणाऱ्या सर्व फ्रंटलाईन वर्कर्सचे अर्थमंत्र्यांनी आभार मानले.

  10. अर्थसंकल्पाआधी शेअरबाजारात तेजी

    बजेटच्या आधी शेअरबाजारात तेजीचं चित्र आहे. सेंसेक्स 500 पॉइंट्स वर आहे तर निफ्टीही 140 पॉइंट्स वर आहे

  11. अर्थसंकल्प वाचनाला सुरुवात

  12. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुरू

    अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे.

  13. काँग्रेसच्या दोन खासदारांकडून कृषी कायद्यांचा निषेध

    काँग्रेसचे खासदार जसबीर सिंग गिल आणि गुरजीत सिंग औलिजा हे ब्लॅक गाऊन परिधान करून संसदेत दाखल.

    केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांना विरोध म्हणून या दोघांकडून ही कृती.

  14. अर्थमंत्र्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

    अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह अर्थ मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली.

  15. यंदा टॅबद्वारे पहिलं डिजिटल बजेट

  16. बजेटमध्ये काय काय असतं? बजेट कसं समजून घ्यायचं?

  17. अर्थमंत्र्यांचे संसदेत आगमन

  18. बजेट राष्ट्रपतींसमोर सादर

    अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी बजेट सादर करण्यापूर्वी प्रथेप्रमाणे राष्ट्रपतींसमोर ते सादर केले.

  19. डिजिटल अर्थसंकल्प

    पहिल्यांदाच अर्थसंकल्प डिजिटल स्वरुपात सादर केला जाणार आहे.

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन टॅबच्या माध्यमातून अर्थसंकल्प सादर करतील. खासदारांनाही कागदी प्रत न देता डिजिटल कॉपी देण्यात येईल.

  20. बजेट 2021 : काय खास आहे यंदाच्या अर्थसंकल्पात?