You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

राज्यात कोरोनाचे 2436 नवीन रुग्ण, कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 52,667

मुंबई-पुणे, महाराष्ट्र, देश आणि जगाच्या कोरोनाविषयक ताजे अपडेट्स बीबीसी मराठीच्या लाइव्ह पेजवर पाहायला मिळतील.

लाईव्ह कव्हरेज

  1. चीनमध्ये तस्करी होणाऱ्या खवले मांजराला वाचवणाऱ्या कोकणातल्या गावाबद्दल माहितीये?

  2. सोनू सूद याने 'सामना'तील टीकेनंतर घेतली उद्धव ठाकरेंची भेट

  3. अशोक चव्हाणांनी कोरोनाला केलं नॉकआऊट

  4. आज दिवसभरातले अपडेट्स

    आज दिवसभरात

    • आज राज्यात कोरोनाची लागण झालेले 2436 नवे रुग्ण आढळले आहेत.
    • राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 52,667 वर गेली आहे.
    • आज 1186 रुग्ण बरे होऊन घरी गेले, एकूण 15,786 रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत.
    • राज्यात आज 60 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला.
    • मुंबईतील रुग्णांची संख्या 31,972 वर गेली आहे.
    • मजुरांच्या प्रश्नावरुन राज्य सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार यांच्यात तणाव

    आता हे लाइव्ह पेज येथेच थांबवत आहोत. उद्या एका नव्या पेजच्या माध्यमातून आपण दिवसभरातल्या घडामोडी जाणून घेऊ.

    काळजी घ्या. गुड नाइट.

    यापुढील अपडेट तुम्हाला इथे वाचता येतील.

  5. निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यांच्या घरातील 2 कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह

    निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यांच्या घरातील 2 कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह आढळले आहेत. करण जोहर आणि कुटुंबीयांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. करण जोहर 14 दिवस सेल्फ आयसोलेशनमध्ये राहणार

  6. कोरोना उपचारांसाठी मुंबईत जम्बो सुविधांची निर्मिती

    १. बीकेसी येथे एमएमआरडीने १५ दिवसांत उभारले देशातील पहिले ओपन हॉस्पिटल ( १००० बेड्सची जम्बो सुविधा ). याचठिकाणी २०० बेड्सची आयसीयू सुविधाही

    २. महालक्ष्मी येथे कोरोना केअर सेंटरचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु.६०० बेड्सची सुविधा यात १२५ बेडचे आयसीयू वॉर्ड असतील. कोविड १९च्या मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना येथे ठेवले जाईल.

    ३. नेसको गोरेगाव येथे ५३५ बेड्सची सुविधा असलेली जम्बो सुविधा कोरोना रुग्णांसाठी रेसकोर्स, दहिसर, गोरेगाव, मुलुंड येथे ७००० पेक्षा जास्त बेड्सची सुविधा असलेली डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल सेंटर आणि डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल पुढील २ आठवड्यात

    ३१ मे पर्यंत एसएससीआय वरळी,महालक्ष्मी, बांद्रा, व नेसको, गोरेगाव अशा मिळून २४७५ खाटा असलेल्या सुविधा रुग्ण सेवेत प्रत्येक वॉर्डमध्ये किमान १०० खाटा आणि २० आयसीयू खाटा असलेल्या रुग्णालयांची सुविधा ताब्यात घेतली.

    स्वत:च्या विलगीकरणाची सोय नसलेल्या कोविड रुग्णांसाठी ३० हजार खाटा क्षमतेच्या कोव्हीड केअर सेंटरची व्यवस्था मुंबईतील खाटांचे नियोजन आता संगणकाच्या माध्यमातून होणार त्यामुळे कोणत्या ठिकाणी खाटा उपलब्ध आहेत ते लगेच कळेल.

    खाटांचा डाटा रिअल टाईम डॅशबोर्डमध्ये. प्रत्येक बेडला युनिक आयडी. डिस्चार्ज धोरणाची कडक अंमलबजावणी रुग्णालयांची स्वच्छता, जेवण व इतर अनुषंगिक बाबींतून डीन यांची जबाबदारी कमी केली.

    आरोग्य उपचारांवर अधिक लक्ष देता येणे शक्य. रुग्णवाहिका १०० वरून ४५० वर. या सेवेसाठी देखील मोबाईल एप केइएम,नायर, सायन, जेजे, सेंट जॉर्ज आणि बीएमसी पेरिफेरल रुग्णालये यांची जबाबदारी ५ आयएएस अधिकाऱ्यांकडे.

    प्रत्येक रुग्णालयात वॉर रूम . सीसीटीव्ही मनपातर्फे दररोज ७ लाख अन्नाची पाकिटे वाटप. मुंबईत ३६० फिव्हर क्लिनिक १९१६ हेल्पलाईनवर ६५ हजार कॉल्स आत्तापर्यंत

  7. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचे पहिले वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आनंदोत्सव

    मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचे पहिले वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आनंदोत्सव साजरा करण्यासाठी भाजप देशभरात 750 हून अधिक व्हर्चुअल रॅली काढणार आहे. त्याचप्रमाणे देशभरात 1 हजार व्हर्चुअल कॉन्फरन्सही आयोजित करणार आहेे. आत्मनिर्भर भारत संकल्प 10 कोटी घरांपर्यंत पोहोचवला जाईल असं पक्षातर्फे सांदण्यात आलं आहे. तसेच मोठ्या प्रमाणात मास्क आणि सॅनिटायजर्सचे वितरण करण्यात येणार आहे.

    मोदी सरकार आप्लया दुसऱ्या कार्यकाळाचे पहिले वर्ष 30 मे रोजी पूर्ण करत आहे. भारतात कोरोनाचे एकूण 1,38,845 रुग्ण आहेत. 4 हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू यामुळे झाला आहे. या उत्सवात सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळला जाईल असं भाजपानं स्पष्ट केलं आहे.

  8. अडकलेल्या मजुरांसाठीच्या रेल्वेवरून खडाजंगी

    कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारनं देशव्यापी लॉकडाऊन लागू केला आणि विविध राज्यांमध्ये रोजगारासाठी गेलेले लाखो मजूर, कामगार अडकून पडले.

    अखेर दीड महिना उलटल्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्रालयानं श्रमिक स्पेशल ट्रेन सुरू करून मजुरांना आपापल्या राज्यात परतण्यासाठी सोय करून दिली. मात्र, आता यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

  9. कोरोना व्हायरस लॉकडाऊन मुळे घेतला 208 जणांचा बळी, शादाब नाझमी, बीबीसी प्रतिनिधी

    25 मार्चपासून देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले. तेव्हापासून ते 20 मेपर्यंत दररोज सरासरी 4 मजुरांचा मृत्यू होतो आहे.

    कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊन जाहीर केले. लॉकडाऊन सुरू होऊन आता दो महिने उलटले. पण अचानक जाहीर केलेल्या या निर्णयामुळे वाहतूक बंद झाली आणि विविध राज्यांमधील मजुरांना आपल्या घरी शेकडो किमीचे अंतर पायी चालत जावं लागलं.

  10. आजपासून देशभरातली विमानतळं अशी बदललेली दिसतील - पाहा फोटो

  11. आजचं कोरोना पॉडकास्ट

  12. टीव्हीवर जुन्याच मालिका पुन्हापुन्हा, ठप्प असलेलं शूटिंग सुरू होणार तरी कधी?, अमृता कदम, बीबीसी मराठी प्रतिनिधी

    गेल्या आठवड्यात टेलिव्हिजन कलाकार मनमीत ग्रेवालनं आत्महत्या केल्याची बातमी आली…आर्थिक चणचणीमुळे मनमीतनं आत्महत्या केली होती. त्याचे पैसे निर्मात्यांकडे अडकले होते आणि लॉकडाऊनच्या काळात खर्च निभावून नेणं अवघड होत होतं.

    या घटनेनंतर अभिनेत्री निया शर्मानं सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. यामध्ये आपल्या ओळखीतील अनेक कलाकारांचे पैसे निर्मात्यांकडे अडकले असल्याचं तिनं म्हटलं आहे.

    त्यातच लॉकडाऊनमुळे सर्वांनाच समस्यांना तोंड द्यावं लागत असून त्यांचा संयम सुटत असल्याचं म्हटलं.

    मनमीतची आत्महत्या ही दुर्दैवी घटना आहेच, पण त्यामुळे टेलिव्हिजन इंडस्ट्रीतली अस्वस्थताही समोर आली. लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका बसलेल्या अनेक क्षेत्रांपैकी एक म्हणजे टेलिव्हिजन इंडस्ट्री.

    कोरोनामुळे शूटिंग पूर्णपणे बंद आहे, ते कधी सुरू होईल याची निश्चित कल्पना अजूनतरी नाहीये.

    या परिस्थितीत कलाकार, तंत्रज्ञ, स्पॉटबॉय, मेकअप आर्टिस्ट आणि मनोरंजन विश्वाशी सर्वांसमोरच अनिश्चिततेचं वातावरण आहे. ही बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

  13. देशांतर्गत विमान सेवा आजपासून मर्यादित स्वरुपात सुरू

  14. ब्रेकिंग, आज राज्यात 2436 नवे रुग्ण

    • आज राज्यात कोरोनाची लागण झालेले 2436 नवे रुग्ण आढळले आहेत.
    • राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 52,667 वर गेली आहे.
    • आज 1186 रुग्ण बरे होऊन घरी गेले, एकूण 15,786 रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत.
    • राज्यात आज 60 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला.
    • मुंबईतील रुग्णांची संख्या 31,972 वर गेली आहे.
  15. कोरोना रुग्णालयात काम करणाऱ्यांचा तणाव कमी करणारा हार्ले

  16. मजुरांच्या रेल्वेवर हल्ला; मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी केली कारवाईची मागणी

    गोव्यातून मजुरांना घेऊन येणाऱ्या मजुरांच्या रेल्वेवर बिहारमध्ये हल्ला झाल्यानंतर मणिपूरचे मुख्यमंत्रि बिरेन सिंग यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना ह्ललेखोरांवर कारवाई करण्याची विनंती केली आहे.

  17. अशोक चव्हाण कोरोना पॉझिटिव्ह, अँब्युलन्समधून निघाले मुंबईला

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. काँग्रेसचे नेते राजीव सातव यांनी बीबीसी मराठीला ही माहिती दिली आहे.

    बीबीसी मराठीसोबत बोलताना सातव म्हणाले, "अशोक चव्हाण यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तसं चव्हाण यांनी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही कळवलं आहे. आणि आता ते पुढील उपचारासाठी मुंबईला येत आहेत."

    "माझं अशोक चव्हाण यांच्याशी बोलणं झालं आहे. कोरोनाची काही मेजर लक्षणं त्यांना दिसत नसल्याचं त्यांनी सांगितलं. पण, काळजी घेणं गरजेचं आहे म्हणून ते मुंबईला येत आहेत. त्यांची प्रकृती लवकर सुधारण्यासाठी आम्ही सगळे प्रार्थना करत आहोत," असंही सातव यांनी म्हटलं.

  18. राज ठाकरे - योगी आदित्यनाथ यांच्यात महाराष्ट्रातील स्थलांतरित मजुरांवरून जुंपली

  19. छत्तीसगडमध्ये दोन मजुरांचा मृत्यू

    छत्तीसगडमधील महासमुंद जिल्ह्यात दोन स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाल्यामुळे तणाव निर्माण झाला आहे.

    या दोन्ही मजुरांची प्रवासात तब्येत बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला असं पोलिसांनी सांगितलं आहे.

    त्यांचे मृतदेह सुरक्षित ठेवण्यात आले असून कोरोनासंबंधित चाचणीचे नमुने रायपूरला पाठवण्यात आले आहेत.

    छत्तीसगडमध्ये बाहेरुन आलेल्या मजुरांचा मृत्यू होण्याच्या काही घटना घडल्या आहेत. मात्र त्यामध्ये कोणालाही कोरोना झाल्याचे दिसून आलेले नाही.

    एका व्यक्तीचा क्वारंटाइन गृहात साप चावून मृत्यू झाला तर एकाने आत्महत्या केलीय या घटनांवर विरोधी पक्षाने सरकारच्या कामकाजावर टीका केली आहे. क्वारंटाईन सेंटरमध्ये खाण्यापिण्याच्या आरोग्याच्या सोयी नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

  20. ठाकरे सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट आणावी- नारायण राणे

    भाजप नेते नारायण राणे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

    "उद्धव ठाकरे सरकार हे कोरानाचं संकट हाताळण्यात अपयशी ठरलं आहे. हे संकट हाताळण्याची या सरकारची क्षमता नाही. त्यामुळे राज्यपालांनी या सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट लागू करावी," अशी मागणी नारायण राणे यांनी या भेटीदरम्यान केली.