You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

राज्यात कोरोनाचे 2091 नवीन रुग्ण, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 54,758

मुंबई-पुणे, महाराष्ट्र, देश आणि जगाच्या कोरोनाविषयक ताजे अपडेट्स बीबीसी मराठीच्या लाइव्ह पेजवर पाहायला मिळतील.

लाईव्ह कव्हरेज

  1. मुंबईत उत्तर भारतातून 'भय्ये' नेमके कधीपासून येऊ लागले?

  2. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 8,159 नवे कोरोना रुग्ण, 165 जणांचा मृत्यू

  3. आजच्या लाइव्ह पेजमध्ये इतकंच...

    बीबीसी मराठीच्या आजच्या लाइव्ह पेजमध्ये आपण इथंच थांबत आहोत. कोरोनासंबंधीच्या जगभरातल्या, देशातल्या आणि राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी उद्या पुन्हा नवीन लाइव्ह पेजनं सुरूवात करू.

    आता थांबूया...गुड नाइट...काळजी घ्या.

  4. आज दिवसभरातले महत्त्वाचे अपडेट्स

    • महाराष्ट्रात आज कोरोनाच्या 2091 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 54, 758 झाली आहे.
    • गेल्या काही महिन्यात कोरोनासंबंधीच्या चाचण्या करण्याचा वेग वाढविण्यात आला असून आता दिवसाला 1.1 लाख चाचण्या होत असल्याची माहिती इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (ICMR) महासंचालक बलराम भार्गव यांनी दिली आहे.
    • लॉकडाऊनच्या दरम्यान स्थलांतरित मजुरांना ज्या हालअपेष्टांना सामोरं जावं लागलं, त्याची दखल सर्वोच्च न्यायालयानं घेतली आहे. केंद्र आणि राज्य सरकार मजुरांना योग्य ती मदत देण्यात कमी पडल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.
    • केंद्र सरकार महाराष्ट्राला काही देत नाही, असं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न होतोय. मात्र केंद्राकडून सगळ्या राज्यांना जे मिळतं ते किंवा त्यापेक्षा जास्त महाराष्ट्राला मिळत असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
    • देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्राकडून महाराष्ट्राला आतापर्यंत मिळालेल्या मदतीची आकडेवारी सादर केली.
    • भारतीय रेल्वेनं 3 हजार 276 श्रमिक स्पेशल ट्रेनच्या माध्यमातून एक मेपासून आतापर्यंत 42 लाख स्थलांतरित मजुरांना आपापल्या राज्यात पोहोचवलं.
    • कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या अंतिम परीक्षा रद्द करण्याची मागणी राज ठाकरेंनी केली. त्यांनी तसं पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पाठवलंय.
    • भारतातील एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 45 हजार 380 झालीय, तर मृतांची संख्या 4 हजार 167 वर पोहोचलीय.
  5. आजचं कोरोना पॉडकास्ट

  6. राज्यात आज कोरोनाच्या 2091 नवीन रुग्णांची भर

    महाराष्ट्रात आज कोरोनाच्या 2091 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 54, 758 झाली आहे. आज एकूण 97 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 1792 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

  7. देशात दररोज कोरोनाच्या 1.1 लाख चाचण्या- ICMR ची माहिती

    गेल्या काही महिन्यात कोरोनासंबंधीच्या चाचण्या करण्याचा वेग वाढविण्यात आला असून आता दिवसाला 1.1 लाख चाचण्या होत असल्याची माहिती इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (ICMR) महासंचालक बलराम भार्गव यांनी दिली आहे.

    जगभरात 1 लाख लोकसंख्येमागे 4.4 मृत्यू होत आहेत. भारतात मात्र हा आकडा 0.3 आहे. जगाचा विचार करता हा दर सर्वात कमी आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

    योग्य वेळी लॉकडाऊन जाहीर करणं, वेळीच निदान आणि कोव्हिड-19 चा संसर्ग रोखण्यासाठी होत असलेल्या इतर उपायांमुळे हे शक्य झाल्याचंही आरोग्य मंत्रालयानं म्हटलं.

    स्वास्थ्य मंत्रालाय ने कहा कि यह सिर्फ़ लॉकडाउन, समय पर पहचान और कोविड-19 मामलों के प्रबंधन के कारण हो सका.

  8. मुंबई लष्कराच्या ताब्यात देणार असल्याचं सांगणाऱ्या व्हायरल मेसेजचं सत्य

  9. राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्याचा आधार घेऊन फडणवीसांचा ठाकरेंना चुचकारण्याचा प्रयत्न?

  10. काय आहेत स्थलांतरित मजुरांच्या अडचणी?

  11. आजचं कार्टून

  12. स्थलांतरित मजुरांच्या हालअपेष्टांबद्दल सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्राला विचारणा

    लॉकडाऊनच्या दरम्यान स्थलांतरित मजुरांना ज्या हालअपेष्टांना सामोरं जावं लागलं, त्याची दखल सर्वोच्च न्यायालयानं घेतली आहे. केंद्र आणि राज्य सरकार मजुरांना योग्य ती मदत देण्यात कमी पडल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

    मजुरांना अन्न, निवारा आणि प्रवासाच्या सुविधा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने तातडीनं पावलं उचलणं गरजेचं असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलंय.

    केंद्रानं गुरूवारपर्यंत या प्रश्नावर भूमिका स्पष्ट करावी, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

    सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर स्थलांतरित मजुरांच्या परिस्थितीबद्दल सुनावणी झाली. न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती किशन कौल आणि एम आर शाह यांनी स्वअधिकारात मजुरांच्या परिस्थितीची दखल घेत ही सुनावणी केली.

  13. राज्य सरकारने विरोधकांना विश्वासात घेतलं नाही - देवेंद्र फडणवीस

    राज्य सरकारने विरोधकांना कधी विश्वासात घेतलं नसल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला.

    • दोन महिन्यांपूर्वी बैठक झाली होती, त्यानंतर बैठक झाली का? आम्ही मुख्यमंत्र्यांनाही पत्र दिलं होतं. पण आम्हाला ऑटो जनरेटेड रिप्लाय आला. हे एकतर्फी चाललंय.
    • आपण रोज राजकारण करायचं, आणि विरोधकांना राजकारण करू नका असा सल्ला द्यायचा, हे खपत नाही.सरकारने सांगितलं तर आम्ही जरूर मदत करू
    • विरोधी पक्ष आपला कोरोनापेक्षा मोठा शत्रू असल्याचं सरकार समजतंय. विरोधी पक्षाविरुद्ध त्यांनी पेड कॅम्पेन करून घेतलं. विरोधकांना सोबत घेतलं तर ते राज्यासाठी चांगलं होईल.
    • लॉकडाऊन आवश्यक आहे, पण पूर्णवेळ राहू शकत नाही. त्यासाठीच्या एक्झिट स्ट्रॅटेजीचा विचार होताना दिसत नाही
  14. महाराष्ट्रातील परिस्थितीचं खापर उद्धव ठाकरे- शिवसेनेवर फोडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न- फडणवीस

    महाराष्ट्रातली कोरोनाची परिस्थिती वाईट आहे. रुग्ण आणि मृत्यूसंख्या सर्वात जास्त आहे. गेल्या महिन्याभरात मुंबईत सरासरी 3500 टेस्ट दररोज करण्यात आल्या. यापैकी 32% टेस्ट पॉझिटिव्ह येत आहेत. गेल्या 3-4 दिवसांत हे प्रमाण 40% पेक्षा जास्त आहे.

    राहुल गांधीनी म्हटलं, की आम्ही सरकारमध्ये असलो, तरी निर्णय प्रक्रियेत आम्हाला संधी नाही. आमचं या सरकारमध्ये ऐकलं जात नाही. हे विधान आश्चर्यकारक आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे - कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जातेय हे लक्षात आल्यानंतर हे खापर शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांवर फोडलं जात असल्याचा यातून गंध येतोय.

    तुम्ही सरकारमध्ये आहात, बाहेरून पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे जबाबदारी झटकता येणार नाही.राहुल गांधींचं वक्तव जबाबदारी झटकणारं आणि सरकारची साथ सोडणारं दिसतंय

    भाजपला आता राजकारणात रस नाही. सरकार बनवण्याची आम्हाला घाई नाही. कोरोनाशी लढण्यावर आमचा फोकस आहे. आता जी चर्चा सुरू आहे, त्यामध्ये आम्ही सामील नाही. कोरोनाची लढाई इफेक्टिव्ह व्हावी, यासाठी आम्ही दबाव तयार करू.

    सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न आम्ही करणार नाही. हे सरकार अंतर्गत वादांमुळेच पडेल. सरकारला जागं करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पळवून लावण्याचा नाही.

    राज्य सरकार केंद्राकडून आलेले पैसे खर्च करू शकलेलं नाही. सरकारमध्ये समन्वय नाही. त्यांचं प्राधान्य वेगळ्या गोष्टींना आहे. उद्धव ठाकरेंचं मूल्यमापन मी करणार नाही. राज्याला आता assertive भूमिकेची गरज आहे. बोल्ड निर्णय घेण्याची अपेक्षा आहे.

  15. पैसे नाहीत म्हणून मदत न करण्याची भूमिका घेता येणार नाही - देवेंद्र फडणवीस

    • केंद्र सरकारने जीडीपीच्या 5% कर्ज घेता येईल असा निर्णय घेतला आणि 10,69,000 कोटी रुपयांचं कर्ज घेण्याची व्यवस्था निर्माण केली. यापैकी महाराष्ट्राला 1,60,000 कोटी रुपये मिळू शकतात.
    • राज्य सरकारने बोल्ड पावलं घेण्याची आवश्यकता आहे.पैसे नाही म्हणून मदत न करण्याची भूमिका घेता येणार नाही.
    • MSME चं पॅकेज 3,70,000 कोटींचं आहे. महाराष्ट्रात50 लाख MSME रजिस्टर्ड आणि कार्यरत आहेत. या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातलया उद्योगांना 35 हजार कोटी रुपये मिळू शकतात.
    • 70 हजार कोटींची सबसिडी गृहनिर्माणासाठी देण्यात आलीय. रजिस्टर्ड प्रकल्पांपैकी 40% प्रकल्प महाराष्ट्रात आहेत.
    • राज्याच्या वीज वितरण कंपन्यांवर ताण येऊ नये यासाठी महावितरणला 9 हजार कोटी उपलब्ध
    • नरेगा - 1 लाख कोटी, रजिस्ट्रेशनमध्ये दीड पटींनी वाढ आहे. यापैकी 5 हजार कोटी महाराष्ट्राला मिळू शकतात.
  16. केंद्राकडून महाराष्ट्राला निधी मिळत नसल्याचा प्रचार खोटा- देवेंद्र फडणवीस

    केंद्र सरकार महाराष्ट्राला काही देत नाही, असं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न होतोय. मात्र केंद्राकडून सगळ्या राज्यांना जे मिळतं ते किंवा त्यापेक्षा जास्त महाराष्ट्राला मिळत असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

    देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्राकडून महाराष्ट्राला आतापर्यंत मिळालेल्या मदतीची आकडेवारी सादर केली.

    • गरीब कल्याण पॅकेज - अन्नधान्य देण्याचा निर्णय - एकूण तीन महिन्यांत सरासरी 4592 कोटी रुपयांचं अन्नधान्य केंद्राने राज्याला दिलंय.
    • प्रधानमंत्री किसान सन्मान योजना 1726 कोटी, जनधन - महिलांच्या खात्यात 1308 कोटी आतापर्यंत गेले, अधिक ६५० कोटी जातील. विधवा, ज्येष्ठ नागरिक - 16 कोटी. असे 3800 कोटी रुपये थेट ट्रान्सफर केलं.
    • उज्ज्वलाद्वारे 1625 कोटी मूल्याचे सिलेंडर्स दिले.
    • आरोग्यविषयक आवश्यक बाबी खरेदी करण्यासाठी केंद्राने 2059 कोटी दिले.
    • 5648 रुपयांचा कर परतावा केंद्राने राज्याला दिला.
    • बजेट सादर करताना धरण्यात आलेल्या अपेक्षित करानुसार केंद्राने राज्याला कर परतावा दिला.
    • कापूस खरेदीसाठी 5647 कोटी, तांदूळ खरेदी 2311 कोटी, तूर खरेदी 593 कोटी,चणा-मका 125 कोटी, पीक विमा - 403 कोटी केंद्राने दिले आहेत.

    राज्य सरकारचा शेतमाल खरेदी वेग कमी असल्याचं केंद्राने कळवलंय.

  17. महाराष्ट्रात आमच्याकडे निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार नाहीत- राहुल गांधी

    महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार नाहीत, असं वक्तव्यं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं आहे. राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये राहुल यांना महाराष्ट्रातील परिस्थितीबद्दल विचारण्यात आलं. त्यावेळी बोलताना त्यांनी हे विधान केलं.

    आम्ही राजस्थान, छत्तीसगढ, पंजाब आणि पाँडेचरीमध्ये स्वतंत्रपणे निर्णय घेण्याच्या परिस्थितीमध्ये आहोत. सरकार चालवणं आणि एखाद्या सरकारला पाठिंबा देणं यामध्ये हाच फरक आहे, असं राहुल यांनी म्हटलं.

    महाराष्ट्र हे देशातलं महत्त्वाचं राज्य आहे. सध्या हे राज्य अतिशय अवघड परिस्थितीतून जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांना आणि सरकारला सध्या केंद्र सरकारच्या आधाराची गरज आहे, असंही राहुल गांधी यांनी या पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं.

  18. ...तर पाकिस्तानात पुन्हा लॉकडाऊन जाहीर होऊ शकतो

    पाकिस्तानमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहेत. जर मृत्यूदर याच वेगाने वाढत राहिला तर देशात पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल, असा इशारा देशातील अारोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे.

    डॉक्टर जफर मिर्झांनी सांगितलं, की सोशल डिस्टन्सिंग पाळणं आवश्यक आहे. अन्यथा देशात कठोर लॉकडाऊन जाहीर करावा लागेल.

    या महिन्याच्या सुरूवातीपासून पाकिस्तानात लॉकडाऊन हटवायला सुरूवात झाली होती.

    सध्या पाकिस्तानमध्ये 57 हजारहून अधिक कोरोनाग्रस्त आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 1197 मृत्यू झाले आहेत.

  19. कोरोना काळात हाँगकाँग-चीन संघर्ष पेटणार का?

    कोरोना काळात हाँगकाँगमध्ये निदर्शनं का सुरू आहेत? चीनच्या संसदेत म्हणजेच नॅशनल पीपल्स काँग्रेसमध्ये गुरुवारी एका विधेयकाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

    हा कायदा मंजूर झाल्यानंतर हाँगकाँगमध्ये एक नवा संरक्षण कायदा अस्तित्वात येईल. या कायद्यामुळे हाँगकाँगच्या विशेष दर्जाला धक्का पोहोचणार आहे.

    निदर्शक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला आहे. एकीकडे कोरोनामुळे सर्व जगावर संकट ओढावलेलं असताना हाँगकाँगमध्ये नवा राजकीय पेच निर्माण झाला आहे. कशामुळे होत आहे हा संघर्ष?

  20. दिल्ली पोलिसांकडून मरकजबाबत अहवाल कोर्टात सादर

    दिल्लीतल्या निझामुद्दीन येथे झालेल्या मरकजच्या कार्यक्रमाबाबत दिल्ली पोलिसांनी कोर्टात अहवाल सादर केला आहे.