You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज्यात कोरोनाचे 2436 नवीन रुग्ण, कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 52,667
मुंबई-पुणे, महाराष्ट्र, देश आणि जगाच्या कोरोनाविषयक ताजे अपडेट्स बीबीसी मराठीच्या लाइव्ह पेजवर पाहायला मिळतील.
लाईव्ह कव्हरेज
मुंबईत अडकलेल्या मजुरांना सोनू सूदचा मदतीचा हात- आजचं कार्टून
मोदींनी जाहीर केलेलं पॅकेज म्हणजे एकप्रकारचा जुमलाच -पृथ्वीराज चव्हाण
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 20 लाख कोटी रुपयांच्या कोव्हिड पॅकेजचा तपशील जाहीर झाल्यावर हे खऱ्या अर्थाने प्रोत्साहन पॅकेज नसून नेहमीसारखा मोदींचा 'जुमलाच' आहे. या वेळचा जुमला 'आत्मनिर्भर' आहे." अशी टीका काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी आज व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकार परिषद घेतली.
त्यांनी मांडलेले मुद्दे-
1.12 मे रोजी जेव्हा पंतप्रधानांनी आपल्या भाषणात 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली त्याचवेळी मी त्या घोषणेचेस्वागतकेलं. पण, अर्थमंत्र्यांच्या 5 प्रदीर्घ पत्रकार परिषदेतून या योजनेचा तपशील जाहीर झाला आणि देशाची घोर निराशा झाली आहे.
2.त्या पॅकेजमध्ये रोख मदतीची तरतूद नाही. त्यात फक्त कर्ज काढण्याचे आवाहन केलं आहे. त्यामुळे कोणत्याही घटकाला थेट व त्वरीत दिलासा मिळण्याची सुतराम शक्यता नाही. सरकार निश्चित प्रत्यक्ष किती खर्च करणार हे कुणालाही निश्चित सांगता येत नाही.
3.जवळपास 12 जागतिक वित्तीय संस्था देखील या पॅकेजमधील थेट खर्चाचा निश्चित आकडा सांगू शकल्या नाहीत, या १२ संस्थांच्या वेगवेगळ्या स्वतंत्रअंदाजानुसार हा खर्च भारताच्या जीडीपीच्या फक्त 0.7% (मॉरगन स्टेनले) ते 1.5% (अर्नस्ट व यंग) इतका म्हणजे सरासरी 1%आहे.
नारायण राणे राज्यपालांच्या भेटीला
विद्यार्थ्यी हित लक्षात घेऊनच अंतिम सत्राच्या परीक्षाबाबत निर्णय – उदय सामंत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्या प्रमाणे राज्यातील विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षां संदर्भातील विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असाच विद्यार्थांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, असं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे.
अंतिम सत्राच्या परीक्षेसंदर्भात काय निर्णय घ्यावा, याबद्दल राज्यपाल महोदयांशी सविस्तर चर्चा झाली असून राज्य समितीने दोन दिवसांमध्ये परीक्षेसंदर्भात एक प्रारूप आराखडा तयार करून तो अहवाल राज्यपाल महोदय आणि शासनास सादर करावा, अशा सूचना व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातूनकुलगुरुंसोबत झालेल्या बैठकीमध्ये देण्यात आल्या आहेत, असंही सामंत म्हणाले.
त्यांनी मांडलेले इतर मुद्दे -
1.अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना ग्रेड देऊन पुढे पाठवायचे की कसे, यावरही चर्चा करण्यात आली. हा निर्णय घेत असताना एकाही विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणिविद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून त्यांना पुढे अडचणी येऊ नयेत, असाच निर्णय घेण्यात येईल.
2.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या स्थितीमध्ये राज्यातील असंख्य महाविद्यालयं, विद्यापीठाच्या इमारती, वसतिगृह हे क्वारंटाइनसाठी दिलेली आहेत. त्यामुळे या इमारती वापरासाठी कधी खुल्या होतील, हे आताच सांगणे कठीण आहे. अशा स्थितीमध्ये परीक्षा घेणे कितपत शक्य होईल, यावर चर्चा झाली.
राहुल गांधी यांची टॅक्सी चालकाशी चर्चा
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीत टॅक्सी चालकाशी चर्चा केली आहे. या चर्चेचा फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेयर केला आहे.
त्यांनी लिहिलंय, "दिल्लीमध्ये उबेर या कंपनीचे टॅक्सी चालक परमानंद यांच्याशी चर्चा केली. यावेळेला परमानंद आणि त्यांच्यासारख्या अनेकांच्या समस्या जाणून घेतल्या."
यापूर्वी राहुल गांधींनी स्थलांतरित मजुरांशी चर्चा केली होती.
उत्तर प्रदेश करणार 'मायग्रेशन कमिशन'ची स्थापना
उत्तर प्रदेश सरकार स्थलांतरिक मजुरांची नोंद ठेवण्याकरता लवकरच मायग्रेशन कमिशन (स्थलांतरित आयोग)ची स्थापना करणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तसे आदेश दिले आहे.
या आयोगाचं नाव 'मजूर कल्याण आयोग' असं असेल, अशी माहिती उत्तर प्रदेशच्या गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव अवनीश अवस्थी यांनी दिली आहे.
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांच्या रेल्वेवरून का पेटलं राजकारण?
मजुरांच्या ट्रेनवरून आता महाराष्ट्र सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा ‘सामना’ रंगण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. काल म्हणजे 25 मे रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी अडकलेल्या मजुरांसाठीच्या ट्रेनवरून केंद्राबाबत नाराजी व्यक्त केली.
उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विटरवर ट्वीट्सची मालिकाच सुरू केली आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.दरम्यानच्या काळात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करून रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यावर निशाणा साधला.
पाहा व्हीडिओ -
पीयूष गोयल ट्वीटरवरून आक्रस्ताळेपणा करत आहेत – बाळासाहेब थोरात
"परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी महाराष्ट्राला अपेक्षित ट्रेन रेल्वे मंत्रालय पुरवत नाही. हे सत्य स्वीकारून या मजुरांना मदत करण्याऐवजी रेल्वेमंत्री पीयूष गोयल ट्वीटरवरून आक्रस्ताळेपणा करत आहेत हे दुर्देवी आहे," असं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं आहे.
महाराष्ट्र काँग्रेसनं यासंबंधीचं ट्वीट केलं आहे.
दरम्यान, लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांसाठी केंद्रानं श्रमिक स्पेशल ट्रेन सुरू केल्या. पण त्यांची कमतरता भासत असल्याची खंत महाराष्ट्र सरकारनं व्यक्त केली आणि त्यावरून एक नवीनच वाद सुरू झाला.
मजुरांच्या ट्रेनवरून महाराष्ट्र सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा ‘सामना’ रंगण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.
यासंबंधीची सविस्तर बातमी खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही वाचू शकता. -
कोरोनाच्या लशीसाठी 4 जूनला व्हर्च्युअल संमेलन – बोरिस जॉन्सन
मनोज तिवारी यांच्याकडून क्रिकेट खेळताना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची पायमल्ली
ब्रेकिंग, अशोक चव्हाण यांना कोरोना व्हायरसची लागण – राजीव सातव
विमान वाहतूक सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी 80 उड्डाणं रद्द
कोरोनामुळे शेतकरी आणि डेअरी उत्पादकांवर असं कोसळलंय संकट
राज्यसभेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करताय हे विसरू नका-राऊत
ग्रीन झोनमध्ये जाता जाता सोलापूर असं बनलं कोव्हिड-19चं हॉटस्पॉट
योगींकडे त्यांच्या राज्यातल्या कामगारांची नोंदणी आहे का?-राऊत
सरकारने नागरिकांच्या आरोग्याचा विचार करावा-सर्वोच्च न्यायालय
राज्यात २४ तासात 51 पोलिसांना कोरोना