कोरोना अपडेट: राज्यात 2250 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण, एकूण संख्या 39 हजार 297 वर

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 40 हजारांच्या जवळ पोहोचला आहे.

लाईव्ह कव्हरेज

  1. प्रगत देशांनी आफ्रिकेकडून शिकावं – संयुक्त राष्ट्र प्रमुख

    संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनियो ग्युटेरस

    फोटो स्रोत, Reuters

    फोटो कॅप्शन, संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनियो ग्युटेरस

    “कोरोना व्हायरस साथीला तोंड कसं द्यायचं, हे प्रगत देशांनी आफ्रिकी देशांकडून शिकायला हवं,” असं संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनियो ग्युटेरस यांनी म्हटलं आहे

    आफ्रिकेत युरोप आणि अमेरिकेपेक्षा आफ्रिका खंडात कोरोना व्हायरसमुळे झालेली हानी तुलनेनं कमीच आहे. त्यामुळे आफ्रिकेने कोरोनावर व्यवस्थित नियंत्रित केल्याचं ग्युटेरस म्हणाले.

    बुधवारी फ्रांसच्या एका रेडिओ चॅनलशी बोलताना ते म्हणाले, “कोरोनाचं संकट सुरू झालं होतं, तेव्हा जे अंदाज वर्तवले गेले होते, त्या तुलनेनं आफ्रिकन देशांमध्ये रुग्णांची वाढ बऱ्यापैकी मंद राहिली आहे.याचं एक मोठं कारण म्हणजे, आफ्रिकेच्या बहुतांश सरकारांनी तसंच तिथल्या संस्थांनांनी वेळेवर उचललेली पावलं, आणि हेच प्रगत देशांनी नाही केलं.

    आफ्रिका खंडात आतापर्यंत कोरोनाचे सुमारे 88 हजार रुग्ण आढळले असून, मृतांचा आकडा जवळपास 3000 आहे. हा आकडा भारतापेक्षाही कमीच आहे.

  2. 'एक देश, एक रेशन कार्ड' कितपत शक्य?

    YouTube पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

    YouTube पोस्ट समाप्त

  3. आयुष्मान भारतचे एक कोटी लाभार्थी - पंतप्रधान मोदी

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

    ‘आयुष्मान भारत’ योजनेतून लाभ घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर गेल्याचं पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करून सांगितलं.

    “दोन वर्षांत या योजनेमुळे कित्येक लोकांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम झाला आहे. मी या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या सर्व डॉक्टर, परिचारिका तसंच इतर आरोग्य सेवकांचे आभार मानतो. यामुळे अनेक भारतीयांचा विश्वास या सरकारने कमावला, विशेषतः गरीब आणि वंचितांचा,” असं ते ट्वीटमध्ये म्हणाले.

  4. मुख्यमंत्री घराबाहेर पडेनात, कारभार फेसबुकवरून चालणार का?-राधाकृष्ण विखे-पाटील

  5. ब्रेकिंग, 'कोरोनाने गरिबी निर्मूलनाच्या प्रयत्नांवर पाणी फेरलं'

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

    "कोरोना व्हायरसच्या संकटाने आणि त्यामुळे अर्थव्यस्था ठप्प झाल्यामुळे गेल्या काही काळात गरिबी निर्मूलनाच्या दिशेने केलेली प्रगती वाया गेली आहे. या घटनांमुळे जगभरात सुमारे 6 कोटी लोक अतिदारिद्र्यात ढकलले जाण्याची भीती आहे," असं जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मॅलपास यांनी म्हटलंय.

    जागतिक बँक सध्या 100 हून अधिक देशांमध्ये आर्थिक मदत करत असल्याचं ते म्हणाले. “प्रगतिपथावर परतण्यासाठी आपण आरोग्य संकटांना तोंड देण्यासाठी त्वरित आणि गरजेनुसार विशेष पावलं उचलण्याची गरज आहे. त्यासाठी गरिबांच्या हाती पैसा देणे आणि त्यांना इतर मदत पुरवणे, खासगी क्षेत्राला सावरणे, आणि आर्थिक कणखरतेला बळ देणे आवश्यक आहे,” असंही ते म्हणाले.

  6. आमचा ताजा #CoronaPodcast

    दररोज रात्री आठच्या सुमारास आशिष आणि विनायक तुमच्यासाठी कोरोनासंदर्भातले दिवसभराचे अपडेट्स घेऊन येतात, त्यांचं विश्लेषण करतात आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरंही देतात.

    हा पॉडकास्ट न चुकता लाईव्ह पाहण्यासाठी बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा.

    कालचा हा 61वा पॉडकास्ट पाहा खाली -

  7. कोलकात्यात सकाळपासून वारं, पाऊस

    कोलकातामध्ये सकाळपासूनच असे ढग दाटून आले आहेत

    फोटो स्रोत, Nayana Majumdar

    फोटो कॅप्शन, कोलकातामध्ये सकाळपासूनच असे ढग दाटून आले आहेत

    अम्फान चक्रीवादळ दुपारून भारताच्या पूर्वेच्या किनारपट्टीला धडकणार असलं तरी कोलकात्यात सकाळपासूनच सोसाट्याचा वारा वाहत आहे आणि संततधारसुद्धा सुरू आहे.

    हवामान खात्याच्या ताज्या माहितीनुसार

    फोटो स्रोत, Twitter / IMD

    हवामान खात्याच्या ताज्या माहितीनुसार, सध्या या चक्रीवादळाचं केंद्र बंगालच्या खाडीत आणि परदीपच्या दक्षिण-वायव्येला 180 किमी अंतरावर तर दीघापासून 230 किमी दक्षिणेस आहे.

  8. कोरोना काळात CO2 उत्सर्जनाचा ऐतिहासिक नीचांक

    सरासरी प्रतिदिन CO2 उत्सर्जन आज ऐतिहासिकरीत्या कमी झालं आहे
    फोटो कॅप्शन, सरासरी प्रतिदिन CO2 उत्सर्जन आज ऐतिहासिकरीत्या कमी झालं आहे

    जगभरात कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी विविध देशांनी लादलेल्या लॉकडाऊनमुळे एक चांगली गोष्ट होतेय – पर्यावरण जरा मोकळा श्वास घेऊ लागलंय.

    कोरोना काळात आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या आणि सविस्तर पर्यावरण अहवालानुसार, गेल्या तीन-चार महिन्यांमध्ये लोकांची वाहनांमधून रहदारी कमी झाल्यामुळे कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन दररोज 17 टक्क्यांनी कमी झालं आहे. लॉकडाऊनमुळे लोक घरांमध्ये आहेत, बाहेर कमी पडत आहेत, त्यामुळे गाड्यांच्या फेऱ्या कमी होतायत आणि हेच प्रमुख कारण आहे, असं या अहवालात म्हटलंय.

    पण हे शुभवर्तमान शास्त्रज्ञांनी एका धोक्याच्या इशाऱ्यासह दिलं आहे – की जसजसे जगभरात हे निर्बंध शिथील होतील, तसतसं हे उत्सर्जन पुन्हा वाढेल आणि हा आकडा कोरोनाच्या पूर्वीच्या स्थितीपेक्षाही वाईट असू शकतो.

    त्यामुळे जागतिक नेत्यांनी हीच संधी दवडून कायमस्वरूपी धोरणं आखावीत जेणेकरून ही पर्यावरणसंदर्भातली प्रगती कायम राखता येईल, असा सल्ला या शास्त्रज्ञांनी दिला आहे.

  9. आज दुपारी 'अम्फान' धडकणार

    ओडिशा

    फोटो स्रोत, Getty Images

    बंगालच्या खाडीत रौद्र रूप धारण केलेल्या अम्फान चक्रीवादळाचा तडाखा आज पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीला बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

    बुधवारी दुपारून हे चक्रीवादळ लँडफॉल करणार, अर्थात किनारपट्टीला धडकणार असून ताशी 195 किमीच्या वेगाने वारे वाहण्याची, त्यामुळे तब्बल दोन मजली इमारतीच्या उंचीचं वादळ उभं राहण्याची भीती हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

    त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाने (NDRF) आधीच किनारपट्टीच्या गावांमधल्या लाखो लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे.ओडिशामध्ये मदत आणि बचावकार्यासाठी NDRFच्या 13 तुकड्या आणि पश्चिम बंगालमध्ये 19 तुकड्या तैनात केल्या गेल्या आहेत, तसंच एकूण 21 तुकड्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या गेल्या आहेत, अशी माहिती NDRFच्या प्रमुखांनी दिली.

    ओळघ

    फोटो स्रोत, ANI

    एकट्या ओडिशामध्ये एक लाख 19 हजार 75 लोकांना लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे तर त्यांच्यासाठी 1704 आश्रयगृहं उभारण्यात आली आहेत, असं ANIने ट्वीट केलंआहे.

  10. काल दिवसभरात जगात काय घडलं?

    कॅफे

    फोटो स्रोत, Getty Images

    • जगभरात सध्या कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 48 लाखांच्याही पुढे गेला आहे, तर 3.20 लाखांपेक्षा जास्त लोकांचा यामुळे जीव गेला आहे.
    • कोरोनाव्हायरसला रोखण्यासाठी आपण दीड आठवड्यांपासून हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषध घेतोय, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी सांगितलंहोतं.
    • लॉकडाऊन असाच कायम राहिला तर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला कायमस्वरूपी नुकसान होईल, असा इशारा अमेरिकेचे अर्थमंत्री स्टीव्हन न्युचिन यांनी दिला आहे.
    • जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अदहॅनम गेब्रेयेसुस यांनी म्हटलं आहे की, कोरोना व्हायरसला जगभरातल्या विविध देशांनी कसं प्रत्युत्तर दिलं आहे, याचं आकलन केलं गेलं पाहिजे, फक्त WHOच्या कामगिरीचा आढावा करणं योग्य नाही.
    • पोर्तुगालमध्ये लॉकडाऊन आता शिथील करण्यात आला असून आता तिथे रेस्टॉरेंट्स, पब्स आणि कॅफेंसह इतर दुकानं सुरू करण्यात आली आहेत.
    • कतारमधल्या एका तुरुंगात 12 कोरोनाग्रस्त आढळले आहेत.
  11. गेल्या 24 तासांतले मोठे अपडेट्स

    कोरोना व्हायरसबाबत 19 मे अर्थात मंगळवारी दिवसभरात काय काय घडलं, एक नजर टाकू या -

    • देशात काल कोरोनाग्रस्तांची संख्या एक लाखावर पोहोचली – हा आकडा आता कोरोनाची जन्मभूमी चीनपेक्षाही जास्त आहे
    • महाराष्ट्रात काल 2,100 नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले, त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या 37 हजार 158वर पोहोचली आहे.
    • मुंबईतील ‘बेस्ट’च्या आणखी 9 कर्मचाऱ्यांचा कोरोनाची लागण, लागण झालेल्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 137 वर पोहोचली
    मुंबईतील वांद्रे रेल्वेस्थानकाबाहेर आजही अनेक स्थलांतरित मजूर गोळा झाले होते.

    फोटो स्रोत, ANI

    • मुंबईतील वांद्रे रेल्वेस्थानकाबाहेर आजही अनेक स्थलांतरित मजूर गोळा झाले होते. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर गर्दी कमी होण्यास मदत झाली.
    • 1 जून 2020 पासून दिवसाला 200 ट्रेन धावतील, अशी माहिती भारतीय रेल्वेनं ट्विटरवरून दिलीय. या ट्रेन वातानुकूलित नसतील. शिवाय, द्वितीय श्रेणी कोचच्या या ट्रेन असतील. अडकलेल्या मजुरांसाठी चालवण्यात येणाऱ्या श्रमिक स्पेशल ट्रेनशिवाय या अतिरिक्त 200 ट्रेन असतील, असं भारतीय रेल्वेनं स्पष्ट सांगितलंय.
    • चौथ्या लॉकडाऊनमध्ये काय बंद राहणार, काय सुरू होणार, याबाबत राज्य सरकारने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.त्याबद्दल सविस्तर तुम्ही इथे वाचू शकता.
    • पदवीची म्हणजेच विद्यापीठाच्या अंतिम वर्षाची परीक्षा यावर्षी रद्द करण्यात यावी आणि गेल्या वर्षीच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचा निकाल लावता येईल का? अशी विचारणा महाराष्ट सरकारने विद्यापीठ अनुदान आयोगाला म्हणजेच UGC ला केलीय.
  12. सुप्रभातम् मंडळी!

    कसा काय चाललाय लॉकडाऊन? तुम्ही कामावर जाऊ लागला आहात का? की अजूनही वर्क फ्रॉम होम सुरू आहे? आम्हाला आमच्या सोशल मीडिया हँडल्सवर टॅग करून नक्की सांगा.

    तुम्हाला जगभरातून या कोरोना व्हायरससंबंधीची सर्व माहिती आम्ही देण्यासाठी इथे हजर आहोत.

    त्यामुळे नक्की हे पान तुम्ही शेअर करा आणि दिवसभरातल्या ताज्या घडामोडींसाठी यावर लक्ष ठेवा.

    धन्यवाद.