कोरोना विषाणूचा स्रोत काय? त्याचा संसर्ग झाला कसा? याप्रश्नी निष्पक्ष, स्वतंत्र आणि सर्वसमावेशक चौकशी व्हावी अशी मागणी अनेक देश करत आहे. भारतानेही या मागणीचा पुनरुच्चार केला आहे. साधारणत: 60 देश या चौकशीसाठी आग्रही आहेत.
वर्ल्ड हेल्थ असेंब्ली या संघटनेची 73वी दोनदिवसीय बैठक सोमवारपासून सुरू होत आहे. वुहान शहरातून कोरोना विषाणू जगभर कसा पसरला यासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी चौकशीची मागणी केली होती. यावरून अमेरिका आणि चीन यांच्यातले संबंध ताणले गेले होते. जगभरात कोरोनामुळे 310,000 जणांचा मृत्यू झाला आहे.
भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, बेलारूस, भूतान, ब्राझील, कॅनडा, चिली, कोलंबिया, जिबूती, डोमिनिकन रिपब्लिकन, इक्वाडोर, अल सल्वाडोर, ग्वाटेमाला, गुयाना, आइलैंड, इंडोनेशिया, जपान, जॉर्डन, कझाकिस्तान, मलेशिया, मालदीव और मेक्सिको या देशांनी कोरोना विषाणूच्या प्रसाराच्या चौकशीची मागणी केली आहे.