You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

लॉकडाऊन नसता तर कोरोनाच्या रुग्णांची संख्या खूप वाढली असती -उद्धव ठाकरे

लॉकडाऊन काढला तर आपली स्थिती इटलीसारखी झाली असती असं उद्धव ठाकरे म्हणाले.

लाईव्ह कव्हरेज

  1. मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद सुरु

  2. राजेश टोपे यांनी केली केरळच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा

  3. कोरोना संकटात भारतीय मजूर अजूनही अडकलेत आखाती देशांमध्ये

  4. लॉकडाऊन नसता तर कोरोनाच्या रुग्णांची संख्या खूप वाढली असती -उद्धव ठाकरे

  5. 'पावसाळ्यात मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढणार'

  6. एमएमआरडीएने उभारलेले कोविड समर्पित आरोग्य केंद्र पालिकेला सुपूर्द

    मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांनी वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे एमएमआरडीए मैदानावर कोरोना बाधितांवर उपचारांसाठी सुमारे 1 हजार खाट क्षमतेचे कोविड समर्पित आरोग्य केंद्र (डी.सी.एच.सी.) उभारले आहे.

    या केंद्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत एमएमआरडीएकडून बृहन्मुंबई महानगरपालिकेला आज सायंकाळी हस्तांतरण करण्यात आले.

  7. शरद पवारांचं पंतप्रधानांना पत्र

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजबाबातची आपली निरिक्षणं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रातून कळवली आहेत. शेतीक्षेत्राकडे अधिक लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

  8. सरकारने परवानगी दिलेल्या मोबाईल देखरेखीवर इस्त्राएलचे नागरिक का नाराज आहेत?

  9. अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केले लॉकडाऊन-4 चे नियम

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लॉकडाऊन-4चे नियम जाहीर केले आहेत. यानुसार1) खासगी कंपन्यांच्या कार्यालयामध्ये कामकाजास परवानगी देण्यात आली आहे. मात्र जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी घरातून काम करावे यासाठी प्रोत्साहन द्यावे.2) स्पोर्टस् कॉम्प्लेक्स सुरु करता येतील मात्र तेथे प्रेक्षकांना प्रवेश नसेल.3) या काळात मेट्रो सुरु राहाणार नाही.4) रेस्टोरंटसमध्ये बसून खाता येणार नाही.5) बसमधून केवळ 20 जणांना प्रवास करता येणार.

  10. अहमदाबादेत बस स्टँडवर आढळला कोरोनाग्रस्ताचा मृतदेह

  11. आज रात्री 8 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकांशी संवाद साधतील

  12. जितेंद्र आव्हाड यांची पहिली मुलाखत : 'मी जगण्याची शक्यता फक्त 30 टक्केच होती'

  13. R0 म्हणजे काय? कोरोना लॉकडाऊन उठवण्यासाठी हा आकडा महत्त्वाचा का?

    कोरोना व्हायरसचा धोका नेमका किती मोठा आहे, हे समजून घेण्यासाठी एक आकडा अतिशय महत्त्वाचा आहे.

    जगभरातली सरकारं या आकड्याच्या आधारे लोकांचे जीव वाचवण्यासाठीची पावलं उचलतायत. शिवाय लॉकडाऊन नेमका कधी उठवता येईल, यासाठीचे संकेतही या आकड्यावरून मिळताहेत.

    हा आकडा आहे - बेसिक रिप्रॉडक्शन नंबर. म्हणजेच पुनरुत्पादन वा पुनर्निर्मितीचा मूलभूत आकडा. याला म्हटलं जातंय R0 (उच्चार - आर नॉट (0 अर्थात शून्य याला नॉट असंही म्हटलं जातं.)

    संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा- R0 म्हणजे काय?

  14. ... आणि 'मुख्यमंत्री' उद्धव ठाकरे 'आमदार' झाले

  15. छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस. परतण्यासाठी स्थलांतरीत कामगार इथे गाडीत प्रवेश मिळण्याची वाट पाहात आहेत.

  16. खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी स्टेडियमध्ये ठेवल्या 'सेक्स डॉल्स'

  17. स्थलांतरित मजुरांना आवाहन

    प्रत्येकाला आपल्या राज्याची, गावाची लागली ओढ. मात्र, प्रवाशांनी घाई करु नये. ज्यांची नावं गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या यादीमध्ये नाहीत, त्यांनी आपापल्या घरी जावं. लवकरच त्यांना देखील गावी पाठवण्याची व्यवस्था केली जाईल- अस्लम शेख, पालकमंत्री

  18. पावसाळ्यात मुंबईच्या रुग्णांची संख्या वाढणार- डॉ. प्रदीप आवटे

  19. सार्वजनिक रुग्णालयातील खाटांच्या उपलब्धतेबाबत स्पष्टता हवी

    माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला याबाबत सरकारने सर्व माहिती उपलब्ध करुन देणारा एका डॅशबोर्ड प्रसिद्ध करावा अशी विनंती केली आहे.

  20. स्विगी कंपनीने 1100 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढले

    खाद्यपदार्थांची डिलिव्हरी करणाऱ्या स्विगी कंपनीने कोरोनाच्या काळात मंदावलेल्या व्यवसायाचे कारण देत 1100 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढले आहे.