18 तारखेनंतर ऑरेंज झोनमध्ये कंटेनमेंट वगळून दुकानं खुली करता येतील - राजेश टोपे

गाड्यांची खरेदी विक्री सुरू करता येईल रजिस्ट्रेशनची कामं सुरू करता येतील ज्यामुळे सरकारला आर्थिक स्रोत सुरू होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

लाईव्ह कव्हरेज

  1. "रस्त्याच्याकडेला माझ्या मुलीचा जन्म झाला आणि तासाभरानं आम्ही चालू लागलो"

  2. मास्क न घातल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून मुंबईत पोलिसांवर हल्ला

    मुंबईच्या अँटॉप हिल परिसरात गरीब नवाज नगरमध्ये पोलिसांवर हल्ला होण्याची घटना घडली आहे. यामध्ये तीन पोलिस जवान जखमी झाल्याची माहिती मुंबई पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी प्रणय अशोक यांनी दिली.

    गरीब नवाज नगरमध्ये पोलीस आणि राज्य राखीव पोलीस बलाच्या जवानांनी काही जणांना मास्क न घातल्याचा जाब विचारला. या कारणावरून लोकांनी पोलिसांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. यामध्ये तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  3. N-95 मास्क आणि पीपीईचे दर निश्चित करा - राज्य सरकार

    महाराष्ट्र सरकारने नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग ऑथरिटीला पत्र लिहून N-95 मास्क आणि पीपीई किट यांचे दर निश्चित करण्याची मागणी केली आहे.

    या उपकरणांची किंमत अद्याप ठरवण्यात आलेली नाही. उत्पादक चढ्या दराने या गोष्टी विकत आहेत. उत्पादनांवर जास्त किंमत लिहून दर आकारण्यात येत आहे. डाॅक्टर, नर्स आणि आरोग्य सेवकांना या वस्तू जास्त भावात विकत घ्याव्या लागत आहेत. त्यामुळे या वस्तूंचा दर तात्काळ निश्चित करण्यात यावेत. सामान्यांना या वस्तूंच्या किमतींबाबत माहिती नाही, असं राज्य सरकारने पत्रात म्हटलं आहे.

    कोरोना

    फोटो स्रोत, Getty Images

  4. कोरोनाच्या संकटातच पूर्व अफगाणिस्तानमध्ये आत्मघातकी हल्ला, किमान 5 जण ठार

  5. कर्नाटकात कोलगोंडनहळ्ळीमध्ये जत्रेचं आयोजन, संबंधितांवर होणार कारवाई

    कर्नाटकातील रामनगर परिसरात कोलगोंडनहळ्ळी गावात एका जत्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. लॉकडाऊन आणि फिजिकल डिस्टन्सिंगबाबत देशभरात दक्षता घेतली जात असताना इथं मोठ्या प्रमाणावर लोक जमा झाल्याचं दिसून आलं.

    या जत्रेचं आयोजन करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डॉ. सी. एन. अश्वत्थ नारायण यांनी दिली आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  6. जगभरातल्या सेक्स वर्कर्स वाऱ्यावर, सरकारकडून कुठलीच मदत नाही

  7. सौदी अरेबियामध्ये 46 हजार 869 कोरोनाग्रस्त

    सौदी अरेबियामध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेले 46,869 रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहेत.

    यामध्ये 77 टक्के रुग्ण मक्का, रियाध, जेद्दाह, मदीना आणि दम्माममध्ये आहेत.

    मक्कामध्ये 9900, रियाध 8430, जेद्दाहमध्ये 8034 तर मदीनामद्ये 6768 रुग्ण आहेत.

  8. मुंबईत खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्तांसाठी जागा नाही - किरीट सोमय्या

    मुंबईत खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांना ठेवण्यासाठी जागा शिल्लक राहिलेली नाही, अशी तक्रार माजी खासदार किरीट सोमय्या यांनी नोंदवली आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  9. धार्मिक संस्थांकडे असलेलं सोनं भारताला तारू शकेल का?

  10. कोरोना लॉकडाऊनच्या आर्थिक संकटात सोनं भारताला तारू शकेल का? #सोपीगोष्ट 78

  11. उद्यापासून सुरू होणार 'वंदे भारत मिशन'चा दुसरा टप्पा

    परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठीच्या 'वंदे भारत' मोहीमेचा दुसरा टप्पा एअर इंडिया उद्यापासून सुरू करेल.

    यामध्ये 31 देशांमध्ये 140 पेक्षा जास्त विमानं पाठवून जवळपास 30,000 भारतीयांना परत आणण्यात येईल.

    या मोहीमेच्या पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 12 देशांत अडकलेल्या 8,000 पेक्षा जास्त भारतीयांना परत आणण्यात आल्याचं केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितलं होतं.

    या 'वंद भारत' मोहीमे अंतर्गत विविध देशांमध्ये एअर इंडियाची विमानं पाठवून तिथे अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यात येतंय. यासाठीचा तिकीट खर्च प्रवाशांकडूनच घेतला जातोय.

    या मोहीमेच्या दुसऱ्या टप्प्यात अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्सलाही विमानं पाठवण्यात येणार आहे.

  12. केंद्र सरकारनं साखर उद्योगाला तातडीनं मदत करावी - शरद पवार

    कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर साखर उद्योगाला संकटातून मुक्त करण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करणारं पत्र शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलं आहे.

    या पत्रात पवार यांनी काही सूचना आणि मागण्या केल्या आहेत.

    १) २०१८-१९ आणि २०१९-२० या वर्षांपासून प्रलंबित असलेल्या निर्यात प्रोत्साहन भत्त्यापोटी आणि राखीव साठ्याच्या खर्चापोटी निधीची तरतूद करावी.

    २) साखरेच्या हमीभावात रुपये ३४५० पासून ३७५० इतकी श्रेणीनिहाय वाढ करावी.

    ३) गेल्या दोन वर्षांत गाळप केलेल्या ऊसाला एका टनासाठी सरासरी ६५० रुपये इतक्या अनुदानाची तरतूद करावी.

    ४) मित्रा समितीनं केलेल्या शिफारसीनुसार थकीत खेळत्या भांडवलाचे अल्प मुदतीच्या कर्जात रुपांतरण करावं आणि कर्जांच्या १० वर्षांच्या कालावधीचे अधिस्थगन करून कर्ज फेडण्याचा कालावधी आणखी २ वर्षं पुढे ढकलावा.

    ५) साखर कारखानदारांच्या उस गाळप व्यवसायाकडे स्ट्रॅटेजिक बिझनेस युनिट म्हणून पहावं.

    साखर उद्योगाला पुन्हा उभं करण्यासाठी केंद्रसरकारने २०१८ मध्ये जाहीर केलेल्या भांडवली खर्चावरील व्याजापोटी देण्यात येणाऱ्या अनुदान योजनेखाली सुरू करण्यात आलेल्या इथेनॉल प्रकल्पांना बँकांनी वित्तपुरवठा करण्याची तरतूद व्हावी असंही शरद पवार यांनी सूचवलं आहे.

    साखर उद्योगाला नवी भरारी मिळण्यासाठी आपण साखर उद्योगात जातीनं लक्ष घालावं आणि कोरोनामुळे उभ्या राहिलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर साखर उद्योगांसाठी आर्थिक उपाययोजना जाहीर करण्यात पुढाकार घ्यावा अशी विनंतीही शरद पवार यांनी या पत्राद्वारे केली आहे.

  13. छत्री - रेनकोट आता अत्यावश्यक वस्तू

    कोरोनाशी लढा सुरू असतानाच दुसरीकडे पावसाळ्यासाठीची तयारीही सुरू आहे. याविषयीचाच एक आदेश आज काढण्यात आलाय.

    यानुसार आता छत्री, रेनकोट, प्लास्टिक शीट्स - कव्हर्स यांचा समावेश अत्यावश्यक वस्तूंच्या यादीमध्ये करण्यात आलेला आहे.

    30 सप्टेंबर 2020 पर्यंत या वस्तूंचा समावेश अत्यावश्यक वस्तूंमध्ये असेल.

  14. नागपुरातदारूसाठी लागल्या लांबच लांब रांगा

    नागपूरच्या ग्रामीण भागातली दारूची दुकानं आज विक्रीसाठी खुली झाली. या दुकानांसमोर लांबच लांब रांगा पहायला मिळतायत. नागपूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागांत आणि नगरपरिषदेच्या हद्दीत येणाऱ्या भागांतली दारूची दुकानं उघडायला जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी परवानगी दिली आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  15. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक

    मुंबईत महापौर बंगल्यावर सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक सुरू आहे.

    राज्यातल्या कोव्हिड-19च्या परिस्थितीवर या बैठकीत चर्चा सुरू आहे. तसंच लॉकडाऊन उठवण्याबाबत या बैठकीत चर्चा सुरू आहे.

    याबैठकीला आदित्य ठाकरे, जयंत पाटील, अनील देशमुख आणि राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता उपस्थित आहेत.

    उद्धव ठाकरे बैठक

    फोटो स्रोत, Shivsena

  16. राज्यात आतापर्यंत 1061 पोलिसांना कोरोनाची लागण

    राज्यामध्ये आतापर्यंत एकूण 1061 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून यामध्ये 112 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. संसर्ग झालेल्यांपैकी 174 पोलीस यातून बरे झाले आहेत. तर दुर्दैवाने 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिलीय.

    लॉकडाऊनच्या काळात आतापर्यंत पोलिसांनी कलम 188 अंतर्गत 1,07,256 गुन्हे दाखल केले आहेत. तर अवैध वाहतुकीविषयीचे 1304 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

    पोलिसांवर हल्ला होण्याच्या 229 घटना घडल्या आहेत. आणि या संबंधी 803 जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे.

    कोव्हिड 19 संबंधी पोलिसांच्या 100 हेल्पलाईनवर आलेल्या तब्बल 91,790 फोन कॉल्सला उत्तर देण्यात आल्याची माहितीही पोलीस प्रशासनाने दिलीय.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  17. जगभरातल्या सेक्स वर्कर्स वाऱ्यावर, सरकारकडून कुठलीच मदत नाही

    कोरोनाचा फटका सगळ्याच उद्योगांना बसला आहे. पण सेक्स वर्कर तर वाऱ्यावर आहेत. उदरनिर्वाह बंद आणि त्यात सरकारकडून मदतही नाही अशा कात्रीत ते सापडलेत. जगभरातून बीबीसीचा खास रिपोर्ट...

    व्हीडिओ कॅप्शन, कोरोनाच्या उद्रेक : जगभरातल्या सेक्स वर्कर वाऱ्यावर, सरकारकडून कुठलीच मदत नाही
  18. वर्ल्ड बँकेकडून भारतासाठी 1 अब्ज अमेरिकन डॉलर्सचं विशेष पॅकेज

    भारत सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी 1 अब्ज अमेरिकन डॉलर्सचं विशेष सामाजिक सुरक्षा पॅकेज (Social Protection Package) वर्ल्ड बँकेने जाहीर केलंय. आरोग्य, सामाजिक सुरक्षा आणि कुटीर, लघु आणि मध्यम उद्योग अशा तीन आघाड्यांवर वर्ल्ड बँक भारत सरकारसोबत काम करणार असल्याचं वर्ल्ड बँकेचे भारतासाठीचे संचालक जुनैद अहमद यांनी सांगितलंय.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  19. ट्रंप चीनसोबतचे संबंध संपूर्णपणे तोडणार का?

    डोनाल्ड ट्रंप

    फोटो स्रोत, Getty Images

    चीनने कोरोना व्हायरस आपल्यापुरताच मर्यादित ठेवला नाही, म्हणून आपण चीनवर अतिशय नाराज असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलंय. कोरोना व्हायरसच्या मुद्द्यावरून दोन्ही देशांमध्ये सुरू असल्याला वादामुळे व्यापारी करारही अर्ध्यात अडकलेला आहे.

    अमेरिका आणि चीनदरम्यान जानेवारी महिन्यात पहिल्या टप्प्यातल्या व्यापारी करारावर सह्या झाल्या होत्या. ट्रंप यांनी या कराराचं तोंडभरून कौतुक केलं होतं. पण आता फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रंप यांनी म्हटलंय, "मी चीनवर अतिशय नाराज आहे. आता जे झालंय, ते व्हायला नको होतं. मी तेव्हा एक चांगला करार केला होता, पण तेव्हाची गोष्ट वेगळी होती."

    चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी आपले चांगले संबंध असल्याचं ट्रंप पूर्वी सांगायचे. पण आता मात्र ते नाराज आहेत. गुरुवारी डोनाल्ड ट्रंप म्हणाले, "मला आता राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्याशी बोलायचं नाही."

    पहिल्या टप्प्यातल्या करारानुसार चीन किमान 200 अब्ज डॉलर्सच्या अमेरिकन वस्तूंची दोन वर्षांत खरेदी करणार होता.

    तर या बदल्यात अमेरिका टॅरिफ मागे घ्यायला तयार झाली होती. पण आता या करारात आपल्याला रस नसल्याचं ट्रंप यांनी म्हटलंय.

    रिपब्लिकन खासदारांनी म्हटल्याप्रमाणे अमेरिकेत शिकायला येणाऱ्या चीनी विद्यार्थ्यांना व्हिसा देणं बंद करणार का, असा काही निर्णय झालाय का?

    हे विचारल्यानंतर ट्रंप म्हणाले, "काही गोष्टी आहेत ज्या आम्ही करू शकतो. आम्ही असं करू शकतो. आम्ही चीनसोबतचे सगळे संबंध संपुष्टात आणू शकतो. संबंध पूर्णपणे संपुष्टात आणले तर काय होईल? 500 अब्ज डॉलर्सची बचत होईल."

    चीनकडून दरवर्षी करण्यात येणाऱ्या आयातीचं मूल्य ट्रंप यांनी सांगितलंय. चीनसोबतचे व्यापारी संबंध म्हणजे पैसे वाया घालवणं असल्याचं ट्रंप यांनी अनेकदा बोलून दाखवलेलं आहे.

  20. कोव्हिडच्या भारतातल्या बळींची संख्या 2,649

    कोरोना व्हायरसच्या प्रकरणांची भारतातली संख्या वाढून आता 81 हजार 970 झालीय. तर बळींचा आकडा वाढून 2,649 झालेला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 27,920 जण उपचारांनंतर बरे झाले आहेत.

    कोरोनाचा सर्वांत जास्त प्रादुर्भाव महाराष्ट्रात आहे. इथल्या रुग्णांची संख्या आहे 27,524. तर 1019 लोकांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे. महाराष्ट्रापाठोपाठ तामिळनाडूमध्ये संसर्गाचं प्रमाण जास्त आहे. इथे संसर्गाची 9,627 प्रकरणं आढळली आहेत. तर 66 जणांचा कोव्हिडमुळे मृत्यू झालाय.

    संसर्गाच्या तिसऱ्या क्रमांकावर आहे गुजरात. इथे 9,591 लोकांना कोरोनाची बाधा झालेली आहे. तर गुजरातमधल्या मृत्यूंचा आकडा आहे 586.

    दिल्लीमध्ये 8470 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय तर 115 जणांचा मृत्यू झालाय.

    पश्चिम बंगालमधली रुग्ण संख्या आहे 2,377 तर कोव्हिडमुळे 215 जणांचा मृत्यू झालाय. मृत्यूदराच्या दृष्टीने मध्य प्रदेशातली परिस्थितीही चिंताजनक आहे. इथे कोरोनामुळे 237 जण दगावले आहेत. ICMRच्या वेबसाईटनुसार 14 मे, सकाळी 9 वाजेपर्यंत देशात 19,47,041 चाचण्या करण्यात आलेल्या आहेत.