18 तारखेनंतर ऑरेंज झोनमध्ये कंटेनमेंट वगळून दुकानं खुली करता येतील - राजेश टोपे

गाड्यांची खरेदी विक्री सुरू करता येईल रजिस्ट्रेशनची कामं सुरू करता येतील ज्यामुळे सरकारला आर्थिक स्रोत सुरू होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

लाईव्ह कव्हरेज

  1. कोरोनाची स्थिती पाहून 30 मे नंतर आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत अंतिम निर्णय

    ajit pawar

    कोरोनाची स्थिती पाहून 30 मे नंतर वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून देहू, आळंदी तसेच आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले.

    विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला आमदार सुनील शेळके,माजी आमदार उल्हास पवार, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे सदस्य सचिव सल्लागार विठ्ठल जोशी, देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधूकर महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड विकास ढगे पाटील, राजाभाऊ चोपदार, योगेश देसाई, अभय टिळक, विशाल मोरे, माणिक मोरे,संजय मोरे, सोपानदेव देवस्थानचे विश्वस्त तथा अध्यक्ष गोपाळ गोसावी, मनोज रणवरे, श्रीकांत गोसावी आदी उपस्थित होते.

    उपमुख्यमंत्री म्हणाले, श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांची आषाढी पायी वारीला वारकरी संप्रदायात ऐतिहासिक महत्त्व आहे. अनेक वर्षाची या वारीला परंपरा आहे, राज्यात कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेत पुढील पंधरा दिवसातील कोरोना स्थिती पाहून पुन्हा वारकरी सांप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून व विश्वासात घेवूनच अंतिम निर्णय घेण्यात येईल.

    आळंदी ते पंढरपूर व देहू ते पंढरपूर पालखी प्रस्थान स्वरूप कसे असावे, याबाबत आळंदी व देहू या दोन्ही संस्थान प्रमुखांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यानुसार लॉकडाऊनचे स्वरूप पाहता श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांची पायी वारी व पालखी सोहळयाच्या स्वरूपाबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

    सोलापूर, सातारा व पंढरपूर येथील मान्यवरांची आषाढी वारी पालखी सोहळयाबाबतची मते विचारात घेतली जाणार आहेत. राज्य मंत्रीमंडळ बैठकीतही याबाबत चर्चा केली जाणार असून त्यांनतरच अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले

  2. बीकेसीतील कोव्हिड-19 रुग्णालयाची शरद पवार, राजेश टोपेंकडून पाहणी

    बीकेसीमधील कोव्हिड-19 रुग्णालयाची शरद पवार आणि राजेश टोपेंनी पाहणी केली.

    शरद पवार, राजेश टोपे
  3. लॉकडाऊन 4 बाबत नियोजनासाठी मुख्यमंत्र्यांची बैठक

    लॉकडाऊनची सध्याची परिस्थिती, त्याच्या पुढील टप्प्यातील नियोजन आणि राज्यात काही ठिकाणी आर्थिक व्यवहार सुरु करणेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दादर येथील एका बैठकीत आढावा घेतला. केंद्र शासन #लॉकडाऊन चा चौथा टप्पा कशा स्वरूपात ठरविते ते पाहून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  4. आधीपासूनच आत्मनिर्भर...

    कार्टून
  5. वंदे भारत मिशनमध्ये 61 विमानांतून 12 हजारपेक्षा जास्त नागरिक भारतात

    लॉकडाऊनमुळे परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी मिशन वंदे भारत अभियानराबवण्यात येत आहे.

    या अभियानाअंतर्गत आतापर्यंत 61 विमानं सोडण्यात आली. या विमानांतून 12 हजारपेक्षा जास्त भारतीय नागरिकांना परत आणण्यात आलं आहे, अशी माहिती केंद्रीय विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी दिली आहे.

    तसंच 3 हजारपेक्षा जास्त नागरिक भारतातून परदेशात गेले असल्याचं पुरी यांनी सांगितलं.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  6. ब्रिटनमध्ये लॉकडाऊनमुळे वाढलाय घरगुती हिंसाचार

    व्हीडिओ कॅप्शन, ब्रिटनमध्ये लॉकडाऊनमुळे वाढलाय घरगुती हिंसाचार
  7. परदेश शिष्यवृत्तीसाठी कौटुंबिक उत्पन्नाची मर्यादा आता ६ लाख रुपये

    परदेशात उच्चशिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या परदेश शिष्यवृत्तीसाठी कौटुंबिक उत्पन्नाची मर्यादा आता ६ लाख रुपये करण्यात आली आहे. गोरगरीब व हुशार असलेले विद्यार्थी या शिष्यवृत्ती पासून वंचित राहू नये यासाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  8. उत्तर कोरियाने प्रसिद्ध केला सार्वजनिकरित्या फिरणाऱ्या लोकांचा व्हीडिओ

    उत्तर कोरियाची राजधानी प्याँगयांगमध्ये सार्वजनिकरित्या फिरणाऱ्या लोकांचे व्हीडिओ प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

    उत्तर कोरिया कोरोनाशी लढा देत असल्याच्या बातम्या येत होत्या. या बातम्या चुकीच्या असल्याचं दर्शवण्यासाठी उत्तर कोरियाने हा व्हीडिओ जारी केल्याचं सांगितलं जात आहे.

  9. BBC viral video : मजुरांचे 'ते' कुटुंब बीबीसीला पुन्हा भेटते तेव्हा..

  10. शेतमाल योग्य किंमतीत विकला जावा, यासाठी केंद्रीय पातळीवर कायदा - निर्मला सीतारमण

    अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे -

    • शेतकऱ्यांना माल योग्य किमतीत विकता यावा यासाठी केंद्रीय पातळीवर एक कायदा आणणार.
    • आंतरराज्य व्यवहारात कोणतीही बाधा नको.
    • शेतीचा व्यवहार योग्य पद्धतीने करता यावा यासाठी कायदेशीर प्रकिया राबवणार.
  11. टॉप टू टोटल या योजनेत अतिरिक्त 500 कोटींची तरतूद

    अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे -

    • टॉप टू टोटल या योजनेत अतिरिक्त 500 कोटींची तरतूद.
    • आधी त्यात फक्त टमाटर, कांदा, बटाटा होता.
    • आता सर्व फळं आणि भाज्यांसाठी ऑपरेशन ग्रीन योजना.
    • ही योजना सहा महिन्यांसाठी असेल आणि त्यानंतर वाढवण्यात येईल.
    • अत्यावश्यक वस्तू सेवा कायद्यात सुधारणा करण्यात येतील.
    • शेतकऱ्यांच्या त्यांच्या मालाचा योग्य मोबदला मिळावा त्यासाठी ही योजना.
    • हा कायदा 1955 मध्ये आला होता.
  12. औषधी वनस्पतींच्या उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी 4 हजार कोटी - निर्मला सीतारामन

    अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे -

    • औषधी वनस्पतींच्या उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी 4 हजार कोटी
    • नॅशनल मेडिसिनल प्लँट्स बोर्ड ची स्थापना.
    • त्यानुसार 2.25 लाख हेक्टर भागात औषधी वनस्पतीची उभारणी करणार.
    • गंगेच्या किनारी 800 हेक्टर भागात औषधी वनस्पतींची लागवड.
    • मध उत्पादन करणाऱ्यांसाठी 500 कोटी रुपयांची तरतूद.
    • त्याचा फायदा 2 लाख उत्पादकांना होणार.
  13. पशुसंवर्धन क्षेत्रासाठी 15 हजार कोटी उभारणार - निर्मला सीतारमण

    अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे -

    • पशुसंवर्धन क्षेत्रासाठी 15000 कोटी उभारणार.
    • प्राणी आरोग्य नियंत्रण योजनेअंतर्गत 13,343 कोटींची तरतूद.
    • त्यात सर्व पाळीव प्राण्यांना, म्हशी, बकरी, आणि डुकरांना लसीकरण होणार.
    • एकूण 53 कोटी प्राण्यांचं लसीकरण होईल.
  14. मत्स्यउत्पादन क्षेत्रासाठी 20 हजार कोटींची तरतूद

    अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे -

    • मत्स्यसंपदा योजना अर्थसंकल्पाच्या वेळी घोषणा केली होती.
    • त्यासाठी 11000 कोटींची तरतूद.
    • मुलभूत सुविधांसाठी 9,000 कोटी रुपयांची तरतूद.
    • त्यामुळे मत्स्यउत्पादनात 70 लाख टनांची वाढ पुढच्या पाच वर्षांत होणार.
    • यामुळे 55 लाख लोकांना रोजगार मिळेल.
  15. स्थानिक खाद्य उत्पादन कंपन्यांसाठी 10 हजार कोटी रुपयांची तरतूद – निर्मला सीतारमण

    अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे -

    • स्थानिक खाद्य उत्पादन कंपन्यांसाठी 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल.
    • स्थानिक उत्पादनांना जागतिक पातळीवर नेण्यासाठीची हा प्रयत्न.
    • याचा फायदा 2 लाख लघु खाद्य उत्पादन कंपन्यांना होईल.
    • प्रादेशिक पातळीवर महत्त्वाच्या खाद्यपदार्थासाठी ही योजना.
    • उदा. बिहारसाठी मखाणा, कर्नाटकात नाचणी. आंध्रात मिरची इत्यादी.
    • या योजनेच्या केंद्रस्थानी महिला असतील.
  16. नाबार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 30 हजार कोटी रुपयांचा आपात्कालीन निधी – निर्मला सीतारमण

    अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे -

    • नाबार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 30 हजार कोटी रुपयांचा आपात्कालीन निधी देणार.
    • 560 लीटर प्रतिदिन दुधाची निर्मिती सहकारी संस्थांकडून झाली. साधारणपणे ती 360 लीटर असते.
    • किमान आधारभूत किमतीसाठी 74300 कोटी रुपयांची तरतूद केली गेली.
    • या दुग्ध उत्पादनामुळे 2 कोटी शेतकऱ्यांना 5000 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.
    • 1 लाख कोटी शेतीच्या मुलभूत सुविधांच्या विकासासाठी
  17. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची पत्रकार परिषद : भाग 3 - पाहा LIVE

    अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज काय घोषणा करणार?

    YouTube पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

    YouTube पोस्ट समाप्त

  18. आज घोषणांचा तिसरा टप्पा शेती आणि इतर क्षेत्राशी संबंधित – निर्मला सीतारमण

    अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे -

    • आज घोषणांचा तिसरा टप्पा शेती आणि इतर क्षेत्राशी असतील.
    • भारताची मोठी लोकसंख्या शेतीवर अवलंबून
    • भारत दुधाचा सर्वात मोठा उत्पादक आहे.
    • डाळींच्या उत्पादनात भारताचा तिसरा क्रमांक
    • आज 11 घोषणा करणार आहोत.
  19. अमोल कोल्हे यांची नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका

  20. मुख्यमंत्र्यांनी बैठकीत घेतला लॉकडाऊनमधली आव्हाने, अर्थचक्र गतिमान करणे यावर आढावा

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

    लॉकडाऊनची सध्याची परिस्थिती, आणि त्याच्या पुढील टप्प्यातील नियोजन तसेच राज्यात काही ठिकाणी आर्थिक व्यवहार सुरु करणे याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दादर येथे एका बैठकीत आढावा घेतला.

    यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, तसेच मुख्य सचिव अजोय मेहता व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    17 मे रोजी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपत असून केंद्र शासन कशा स्वरूपात लॉकडाऊनचा चौथा टप्पा ठरविते ते पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल. मात्र राज्याला ज्या महत्वपूर्ण सूचना करायच्या आहेत त्याचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला.

    गेल्या सुमारे 55 दिवसांपासून सुरु असलेल्या लॉकडाऊनचा बैठकीत संपूर्ण आढावा घेण्यात आला. राज्यातील आरोग्य स्थिती, वैद्यकीय यंत्रणा कोरोनाशी कशा रीतीने मुकाबला करीत आहे.

    राज्यातील कायदा व सुव्यवस्था, परराज्यातील मजुरांचे त्यांच्या राज्यात ने आण करण्याची व्यवस्था, त्यातील येणाऱ्या अडचणी याविषयी सविस्तर चर्चा झाली.

    राज्यात 20 एप्रिलनंतर ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणून उद्योग- व्यवसायांना सुरु करण्यात आले होते. 65 हजार उद्योगांना सुरु करण्यास मान्यता देण्यात आली असून 35 हजार उद्योग सुरु झाले आहेत तसेच 9 लाख कामगार रुजू झाल्याचेही सांगण्यात आले.

    परराज्यातील मजुरांना पाठविण्याचे काम सुरु असून पश्चिम बंगालचा अपवाद वगळता इतर राज्यांमध्ये रेल्वे पाठविणे सुरु आहे.

    उद्योग सुरु झाल्याने औद्योगिक घटकाकडून विजेचा वापर ५० टक्के पर्यंत वाढला गेला आहे. तसेच परार्ज्यातील कामगार परत गेल्याने उद्योगांना कामगार पुरविण्यासाठी कामगार ब्युरो कार्यरत करण्यात आला आहे अशी माहितीही देण्यात आली.