18 तारखेनंतर ऑरेंज झोनमध्ये कंटेनमेंट वगळून दुकानं खुली करता येतील - राजेश टोपे
गाड्यांची खरेदी विक्री सुरू करता येईल रजिस्ट्रेशनची कामं सुरू करता येतील ज्यामुळे सरकारला आर्थिक स्रोत सुरू होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
लाईव्ह कव्हरेज
भारतातील संरक्षण क्षेत्रातली FDI ची मर्यादा 74 टक्क्यांपर्यंत वाढवली
आजच्या प्रमुख घडामोडींचा थोडक्यात आढावा
नमस्कार मंडळी,
बीबीसी मराठीचं आजचं लाईव्ह कव्हरेज थांबवत आहोत.
जाता जाता एक नजर आजच्या प्रमुख घडामोडींवर...
- राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 29 हजार 100 वर, आतापर्यंत 1068 मृत्यू
- 18 तारखेनंतर ऑरेंज झोनमध्ये कंटेनमेंट वगळून दुकानं खुली करता येतील - राजेश टोपे
- 1 लाख कोटी शेतीच्या मुलभूत सुविधांच्या विकासासाठी- निर्मला सीतारमण
- आत्मनिर्भर शेतकरी पॅकेज निराशाजनक - शरद पवार
- रॅपिड अॅक्शन फोर्सची 1 कंपनी पुण्यात दाखल
- वर्ल्ड बँकेकडून भारतासाठी 1 अब्ज अमेरिकन डॉलर्सचं विशेष पॅकेज
कोरोना व्हायरसच्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी पुन्हा भेटूया उद्या बीबीसी मराठीच्या वेबसाईटवर.
शुभरात्री.

फोटो स्रोत, Getty Images
कोरोना संकट कसं हाताळतोय युद्धग्रस्त येमेन?
व्हीडिओ कॅप्शन, कोरोना संकट कसं हाताळतोय युद्धग्रस्त येमेन? वानखेडे स्टेडियममध्ये होऊ शकतं क्वारंटाईन सेंटर
मुंबई क्रिकेट असोसिएशन वानखेडे स्टेडियम मुंबई महापालिकेच्या ताब्यात देण्याचा विचार करत आहे. कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी याचा वापर करता येऊ शकतो.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 29 हजार 100 वर, आतापर्यंत 1068 मृत्यू
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची लागण झालेले 1576 नवे रुग्ण आज आढळून आले. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आता 29 हजार 100 वर पोहोचली आहे.
आज राज्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या संख्येत 49 ची वाढ होऊन ही संख्या 1068 इतकी झाली आहे.
तसंच आज राज्यात 505 रुग्ण बरे होऊन घरी परतले. बरे झालेल्यांची राज्यातील संख्या आता 6564 वर पोहोचली आहे.
राजधानी मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या आज 17 हजार 671 वर पोहोचली आहे. इथं आतापर्यंत 655 मृत्यू झाले आहेत. पाठोपाठ पुण्यात 3141 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यापैकी 172 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची पंजाब, उत्तर प्रदेशला नोटीस
लॉकडाऊनमुळे सगळं काही बंद असल्याने चालत जात असताना एका महिला आपल्या सुटकेसवरून नेत असल्याची दृश्य समोर आली होती.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने या प्रकाराची स्वतःहून दखल घेतली आहे. याप्रकरणी पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या मुख्य सचिवांन नोटीस पाठवण्यात आली आहे. तसंच आग्रा जिल्हाधिकाऱ्यांनाही याबाबत नोटीस देण्यात आली आहे.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
लॉकडाऊनमध्ये मुंबई - आग्रा हायवेवरून उत्तर भारताकडे निघालेत स्थलांतरीत मजूरांचे तांडे
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
ब्रेकिंग, आत्मनिर्भर शेतकरी पॅकेज निराशाजनक - शरद पवार
आत्मनिर्भर शेतकरी पॅकेज निराशाजनक असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. लॉकडाऊनमुळे झालेलं नुकसान लक्षात घेऊन पॅकेज देणं गरजेचं होतं. शेतकरी कर्जाची पुनर्रचना करण्याबाबत उल्लेखही करण्यात आला नाही. शेतकरी कर्जाचा व्याजदर कमी करण्याबाबत काहीच सांगण्यात आलं नाही, असं पवार म्हणाले.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
रॅपिड अॅक्शन फोर्सची 1 कंपनी पुण्यात दाखल

#CoronaPodcast : कोरोना व्हायरससंदर्भात आज काय-काय घडलं?
#CoronaPodcast :महाराष्ट्रात लाॅकडाऊन 4 कसं असेल? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी काय दिली माहिती? पुण्यात रॅपिड ॲक्शन फोर्सच्या तुकडीनं केला मार्च, शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांसोबत घेतली आढावा बैठक तर पंतप्रधानांना साखर उद्योगासाठी लिहीलं पत्र, केंद्र सरकारचं शेतकऱ्यांसाठी १ लाख कोटींचं पॅकेज. याबाबत सांगतायत बीबीसी मराठीचे संपादक आशिष दीक्षित आणि विनायक गायकवाड.
नियमावली दिल्यानंतरच दिल्ली मेट्रो सुरू होणार
लोकांना प्रवासाबाबतची नियमावली दिल्यानंतरच दिल्लीतील मेट्रो सेवा सुरू केली जाईल. ही नियमावली लोकांना माध्यमांद्वारे कळवली जाईल, असं दिल्ली मेट्रोचे कार्यकारी संचालक अनुज दयाल म्हणाले.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
कोरोना संकटात भारतीय मजूर अजूनही अडकलेत आखाती देशांमध्ये
व्हीडिओ कॅप्शन, कोरोना संकटात भारतीय मजूर अजूनही अडकलेत आखाती देशांमध्ये भारत सरकारने आता आखाती देशांसह जगभरात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणायला सुरुवात केलीये.
मोदी सरकारने या मोहिमेला 'वंदे भारत मिशन' असं नाव दिलंय. लोकांना आता विमानं आणि जहाजांद्वारे परत आणलं जातंय.
85 लाख भारतीय कामगार आखाती देशांमध्ये नोकरीला आहेत. यातल्या साडेतीन लाख कामगारांनी भारतात परतण्यासाठी नोंदणी केलीये. फैसल मोहम्मद अली यांचा हा रिपोर्ट
जगभरातल्या सेक्स वर्कर्स वाऱ्यावर, सरकारकडून कुठलीच मदत नाही
18 तारखेनंतर ऑरेंज झोनमध्ये कंटेनमेंट वगळून दुकानं खुली करता येतील - राजेश टोपे
ऑरेंज झोनमध्ये कंटेनमेंट झोनच्या बाहेर दुकानं खुली करता येतील. त्यांना नियोजित वेळात हळुहळु 18 तारखेनंतर सुरू करता येतील. ऑरेंज आणि ग्रीन झोनध्ये याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकार गाड्यांची खरेदी विक्री सुरू करता येईल रजिस्ट्रेशनची कामं सुरू करता येतील ज्यामुळे सरकारला आर्थिक स्त्रोत सुरू होईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन 4 असणार आहे कंटेनमेंट झोनबाहेर किती प्रमाणात काय खुलं करता येईल यावर मुख्यमंत्री आणि प्रशासकिय पातळीवर निर्णय घेतला जाईल. असं टोपे म्हणाले.

फोटो स्रोत, twitter
टिकटॉक विरुद्ध युट्यूब : ऐन लॉकडाऊनमध्ये पेटलेलं इंटरनेट युद्ध
इतर राज्यातून परतलेल्या मजुरांना कौशल्य प्रशिक्षण देणार - योगी आदित्यनाथ
कोराना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे इतर राज्यातून उत्तर प्रदेशात परतलेल्या मजुरांना सध्या क्वारंटाईन करण्यात आलं आहे. या कालावधीत त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे.
या मजुरांमध्ये क्षमता आणि अनुभव आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम क्षेत्रातील उद्योगांमध्ये त्यांचा उपयोग होऊ शकतो, असं आदित्यनाथ यांनी सांगितलं.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
आषाढी वारी पालखी सोहळ्याचा निर्णय 30 मेनंतर
ब्रेकिंग, रॅपिड अॅक्शन फोर्सची 1 कंपनी पुण्यात दाखल
पुण्यातील सहकारनगर परिसरात काढण्यात आला मार्च. रॅपिड अॅक्शन फोर्सचे 120 जवान मार्चमध्ये सहभागी रॅपिड एक्शनच्या 120 लोकांची 1 कंपनी पुण्यात दाखल
गोरेगावच्या कोव्हिड-19 केअर सेंटरची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोरेगाव येथील नेस्को मैदानावर उभारण्यात येत असलेल्या एक हजार खाटांच्या कोव्हिड-19 केअर सेंटरची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली आहे.