You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

'वाधवान कुटुंबाला पत्र अमिताभ गुप्तांनी स्वतः दिलं होतं'- गृहमंत्री

कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स

लाईव्ह कव्हरेज

  1. अमेरिकेत गेल्या 24 तासात 2,494 मृत्यू

    अमेरिकेत गेल्या 24 तासात कोरोनामुळे 2,494 जणांचा मृत्यू झाला आहे. एएफपी वृत्तसंस्थेनं जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.

  2. सरकारांनी लॉकडाऊन शिथिल करताना घाई करू नये- जागतिक आरोग्य संघटना

    जगभरातील सरकारांनी लॉकडाऊन शिथिल करताना इम्युनिटी पासपोर्ट तसंच रिस्क फ्री सर्टिफिकेट्स स्वत:ला देऊ नये असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. लॉकडाऊन शिथिल करण्याची घाई करू नये असंही संघटनेनं म्हटलं आहे.

    कोरोना विषाणूच्या संसर्गातून माणूस बरा झाल्यानंतर शरीरात पुन्हा त्याचं संक्रमण होऊ नये यासाठी अँटिबॉडी तयार होतात. मात्र हे अँटिबॉडी तयार होण्यासंदर्भात कोणताही पुरावा नाही असंही आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.

    अमेरिका, इटली, स्पेन, फ्रान्स यांच्यानंतर 20,000 अधिक कोरोना मृत्यूंची नोंद होणारा ब्रिटन पाचवा देश आहे.

    युरोपात सर्वाधिक कोरोना मृत्यू इटलीत झाले आहेत. इटलीमध्ये 26,384 लोकांनी कोरोनापायी जीव गमावला आहे.

    स्पेनमध्ये 378 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. फ्रान्समध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये घट झाली आहे. फ्रान्समध्ये आतापर्यंत 22,614 लोकांचा मृत्यू झाला आहे.

  3. गुड मॉर्निंग

    गुड मॉर्निंग मंडळी,

    कसे आहात? घरीच आहात ना? कोरोनाला पळवून लावण्यासाठी लॉकडाऊनच्या नियमांचं काटेकोर पालन करणं आवश्यक आहे. राज्य, देश तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवरील कोरोनाचे सगळे अपडेट्स तुम्हाला इथे मिळत राहतील. काळजी घ्या.

    जगभरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 28 लाखांच्या पुढे गेली आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या दोन लाखांच्या पुढे गेली आहे.

    अमेरिकेच्या अन्न आणि औषध विभागाने कोरोना रुग्णांसाठी हाइड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध देण्यासंदर्भात इशारा दिला आहे. या औषधाने रुग्णांच्या हृदयावर परिणाण होऊ शकतो असं या विभागाचं म्हणणं आहे.

    रॉयटर्स वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीनुसार, चीनने आपलं वैद्यकीय पथक उत्तर कोरियाला पाठवलं आहे. उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांची प्रकृती ठीक नसल्याच्या बातम्या येत होत्या.

    आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 779 एवढी झाली आहे. 24,942 जणांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे.

    कोरोना विषाणूच्या व्युत्पतीसंदर्भात स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी चीनने फेटाळून लावली आहे. ब्रिटनमधील चीनचे राजनयिक अधिकारी चेन वेन यांनी यामागे राजकीय हितसंबंध असल्याचं म्हटलं आहे.