You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'वाधवान कुटुंबाला पत्र अमिताभ गुप्तांनी स्वतः दिलं होतं'- गृहमंत्री
कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स
लाईव्ह कव्हरेज
लॉकडाऊनमुळे सराफा बाजार ओस
आज अक्षयतृतीया असूनही दिल्लीच्या करोलबाग परिसरातील सराफांची दुकानं कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे बंद आहेत. त्यामुळे इथला परिसर आज ओस पडल्याचं पाहायला मिळालं.
केंद्रीय मंत्री, खासदारांकडून ममता बॅनर्जी यांचा निषेध
केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या खासदारांनी पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारविरोधात निषेध आंदोलन केलं.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी केंद्राला सहकार्य करत नसल्याच्या मुद्द्यावरून हा निषेध नोंदवण्यात आला आहे.
रॅपिड ॲंटीबाॅडी टेस्ट म्हणजे काय? तिचे काय फायदे आहेत? मुंबईत परवानगी मिळणार?
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचे मृत्यू का होत आहेत?
कपिल आणि धीरज वाधवान सीबीआयच्या ताब्यात
सीबीआयच्या पथकाने कपिल आणि धीरज वाधवान यांना ताब्यात घेतलं आहे.
सातारा पोलिसांनी त्यांना मुंबईला पोहोचवण्याची व्यवस्था केली आहे. अटकेची प्रक्रिया सुरू आहे, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं.
ब्रेकिंग, लॉकडाऊनमुळे कोरोनाचा वेग थांबवण्यात सरकार यशस्वी - उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी अक्षय तृतीया, तसंच रमजानच्या शुभेच्छा दिल्या.
उद्धव ठाकरे यांनी मांडलेले मुद्दे –
1.रमजानचा महिना सुरू झाला आहे. मुस्लीम बांधवांनी रस्त्यावर नमाज करण्याची ही वेळ नाही, घरीच प्रार्थना करावी.
2.देव आता मंदिरात नाही, आपल्यामध्ये आहे. डॉक्टर, पोलीस यांच्या रुपात देव आला आहे. त्यांचा आदर करणं गरजेचं आहे.
3.आपल्या दोन पोलीस कॉन्स्टेबलचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांना मी सगळ्यांच्या वतीनं आदरांजली वाहतो.
4.लॉकडाऊनमुळे कोरोनाचा वेग संथ ठेवण्यात आपण यशस्वी झालो आहोत.
5.लॉकडाऊन संपवण्यासाठी तत्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स नेमण्यात आला आहे. सरकार चहूबाजूनी काम करत आहे.
6.नितीन गडकरींना मला धन्यवाद द्यायचे आहेत. केंद्रात, राज्यात एकोपा असताना काही लोक राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या परिस्थितीत राजकारण न करता सगळ्यांनी महाराष्ट्र सरकारसोबत मिळून काम करावं, हे गडकरींनी आवाहन केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
7.मजूरांना लवकर गावी पाठवण्याची सोय करू. पण, अद्याप ट्रेन सुरू करण्यात येणार नाही.
8.कोटामध्ये राज्यातील विद्यार्थी आहेत, त्यांना तिथून वापस आणणार आहोत.
9.ग्रामीण भागात जिल्ह्याच्या वेशी बंदच राहणार आहेत. जिल्हा अंतर्गत वाहतूक मात्र सुरू राहिल.
10.राज्यात आतापर्यंत कोरोनाच्या 1 लाख 8 हजार 972 चाचण्या केल्या आहेत. 1 लाख 1 हजार 162 जणांचे नमुने निगेटिव्ह आलेत. जवळपास 7 हजार 628 नमुने पॉझिटिव्ह आले आणि 323 रुग्णांचा मृत्यू झालाय.
11.कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहे. कृषी माल वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे.
मुंबईतील पोलीस कॉन्स्टेबल यांचा कोरोनामुळे मृत्यू
मुंबई पोलीस दलातील कार्यरत पोलीस हवालदार संदीप सुर्वे (52) यांचं कोरोनाविषाणूच्या प्रादुर्भावानं निधन झालं आहे. मुंबई पोलिसांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.
दरम्यान, शनिवारीही वाकोला पोलीस ठाणे मधील हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत गणपत पेंदूरकर (57) यांचा कोरोनाव्हायरस मुळे मृत्यू झाला.
...तोवर कोरोनाविरुद्धच्या लढाईत यश नाही – मनमोहन सिंग
कोरोना व्हायरसची टेस्ट करण्यासाठीच्या सुविधा अपुऱ्या प्रमाणात आहेत आणि जोपर्यंत सरकार कोरोनाच्या टेस्टिंग मोठ्या प्रमाणावर वाढवणार नाही, तोवर या लढाईत विजय मिळवणं शक्य होणार नाही, असं माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे.
कोरोना व्हायरसच्या काळात क्यूबाची प्रशंसा का होतेय?
क्यूबा या देशानं शनिवारी दक्षिण आफ्रिकेत 216 आरोग्य कर्मचाऱ्यांची टीम पाठवली आहे. कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी क्यूबानं जगभरात 20 मेडिकल टीम पाठवल्या आहेत. काही जण याकडे समाजवादी एकता म्हणून पाहत आहेत, तर काहींना याला मेडिकल डिप्लोमसीचं नाव दिलं आहे.
क्यूबानं काही दिवसांपूर्वी आफ्रिका आणि कॅरेबियन देशांमध्ये जवळपास 1200 आरोग्य कर्मचाऱ्यांना पाठवलं आहे. इतकंच नाही तर युरोप आणि इटलीतही आरोग्य कर्मचारी पाठवले आहेत. डोनाल्ड ट्रंप यांनी मात्र क्यूबाची मदत स्वीकारू नका, असा आग्रह जगभरातल्या देशांना केला आहे.
असं असलं तरी ज्या देशांमध्ये क्यूबानं मदत पाठवली आहे, तिथं ती स्वीकारण्यात आली आहे. क्यूबामध्ये आतापर्यंत कोरोनाचे 1337 रुग्ण आढळले आहेत आणि 51 जणांचा मृत्यू झालाय. क्यूबात प्रति व्यक्ती डॉक्टरांची संख्या सर्वाधिक आहे. क्यूबाच्या हेल्थकेअर सिस्टीमची जगभरातल्या साथींचा निपटारा करण्याकरता प्रशंसा होते.
याविषयी दक्षिण आफ्रिकेचे आरोग्य मंत्री ज्वेली मखीज यांनी म्हटलं की, "क्यूबामध्ये सामुदायिक आरोग्य सेवा आहे आणि ही सगळ्यात चांगली बाब आहे, आम्हाला हे मॉडेल आवडतं."
कोरोना व्हायरस वटवाघळांमुळे पसरतोय का?
एखाद्या प्राण्याविषयी तुम्हाला भीती वाटते. पण तुमचं आयुष्य त्याच्यावरच अवलंबून असतं. त्या प्राण्यापासून तुम्हाला धोकाही असतो आणि खूप सारा फायदाही. माणूस आणि वटवाघळांचं नातं काहीसं असंच आहे. हा आगळावेगळा प्राणी कोरोना विषाणूच्या वैश्विक संकटाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा चर्चेत आला आहे.
पण वटवाघळांना विषाणूच्या प्रसारासाठी जबाबदार ठरवणं योग्य आहे का? विषाणूविरुद्धच्या लढाईत वटवाघुळं निर्णायक भूमिका बजावू शकतात? - पाहा व्हीडिओ
टाळी, थाळी, मेणबत्ती यांनी सगळ्यांना प्रेरणा दिली - नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मन की बात' कार्यक्रमातून देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनीजनतेला अक्षय तृतीया आणि रमजानच्या शुभेच्छा दिल्या.
मोदींना या कार्यक्रमात मांडलेले प्रमुख मुद्दे –
1.भारतातील प्रत्येक नागरिक आज कोरोनाचा सामना करत आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईचं नेतृत्व करत आहे. भारतात कोरोनाची लढाई पीपल ड्रिव्हन आहे.
2.टाळी, थाळी, मेणबत्ती यांमुळे सगळ्यांना प्रेरित केलं आहे. यामुळे देशात यज्ञ सुरू आहे, ज्यात सगळे आपापलं योगदान देण्यासाठी आतुर आहेत.
3.शेतकरी शेतात काम करून आपल्याला अन्न पुरवत आहेत. कुणी शेतातील भाजीपाला मोफत देत आहे, तर कुणी मास्क पुरवत आहेत. काही मजूर लोक ज्या शाळेत थांबलेत तिथं रंगरंगोटी करत आहेत. हीच ती पीपल ड्रिव्हन लढाई.
4.Covidwarriors.gov.in या व्यासपीठाच्या माध्यमातून सरकारनं डॉक्टर, आशा, NCC यांना एकत्र जोडण्यात आलं आहे. तुम्हीही कोव्हिड वॉरियर बनू शकता.
5.देशातल्या सगळ्या भागात औषधीपुरवण्यासाठी 'लाईफलाईन उडान' हा कार्यक्रम सुरू आहे. त्याअंतर्गत 500 टनांहून अधिक औषधी देशाच्या वेगवेगळ्या भागात पुरवण्यात आली आहे.
6.भारतातील रेल्वे 60 रेल्वे मार्गांवर 100हून अधिक पार्सल सेवा पुरवत आहे.
7.पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत गरिबांच्या खात्यात पैसे जमा केले जात आहेत.
8.कोरोनाच्या काळात आरोग्य कर्मचाऱ्यांना इजा पोहोचवल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
9.आता आरोग्य आणि पोलीस कर्मचाऱ्यांविषयीच्या आपल्या मानसिकतेत बदल होत आहे. कोरोनाच्या लढाईत लोक पोलिसांशी भावनात्मक पातळीवर जोडले गेले आहेत.
10.इतर देशांचे राष्ट्राध्यक्ष आज भारताचे आभार मानत आहेत. तेव्हा मान अभिमानानं उंचावते.
11.कोरोनाच्या काळात आयुष मंत्रालयानं रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेक निर्देश जारी केले आहेत. ज्यात गरम पाणी पिणे, काढा पिणे असे अनेक उपाय सांगितले आहेत. याचा अवलंब केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो.
12.जगानं योगाला ज्यापद्धतीनं स्वीकारलं, त्यापद्धतीनं लवकरच जग आयुर्वेदाचा स्वीकार करेल. तरुणांनी आजच्या भाषेत आयुर्वेद जगापर्यंत पोहोचवायला हवा.
13.आता मास्कविषयीची आपली मानसिकता बदलत आहेत. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याची सवय सोडली पाहिजे.
'मीही मास्क घालूनच बाहेर जायचो पण कोरोना झाला'
प्रसारमाध्यमं आणि त्यांचे प्रतिनिधी कोरोनाविरुद्धच्या लढाईतील महत्त्वाचे शिलेदार आहेत. गाव-खेड्यांपासून, शहरं, राज्य तसंच देशभरात कोरोनासंदर्भातील अपडेट्स देण्याचं काम प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी करत आहेत. काम करत असताना, नियमावलीचं पालन करूनही काही पत्रकारांना कोरोनाचा संसर्ग झाला. कोरोनाच्या बातम्या कव्हर करत असताना, या आजाराने त्यांनाच गाठलं. काय आहे त्यांचा अनुभव. वाचा इथे
पंतप्रधान नरेंद्र मोदी 'मन की बात' कार्यक्रमातून संवाद साधणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी सकाळी 11 वाजता 'मन की बात' कार्यक्रमातून देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत.
राजस्थानमध्ये कोरोनाचे नवीन 58 रुग्ण
राजस्थानमध्ये रविवारी कोरोनाचे 58नवीन रुग्ण आढळले आहेत. यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 2 हजार 141 वर पोहोचली आहे.
डोनाल्ड ट्रंप यांचा कोरोनाविषयक पत्रकार परिषद बंद करण्याचा निर्णय
अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 52 हजारांवर पोहोचली आहे.
त्यात आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी कोरोना व्हायरससंदर्भातील दररोजची पत्रकार परिषद इथून पुढे न करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानंतर ट्रंप प्रशासन आरोग्य सचिव एलेक्स अजर यांना हटवण्याची चर्चा सुरू आहे.
कोरोनाविषयी सुरुवातीच्या काळात झालेल्या गोंधळामुळे अशापद्धतीचा निर्णय घेतला जाऊ शकतो. असं असलं तरी अद्याप याला पुष्टी मिळालेली नाही.
व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जुड डीरे यांनी या बाबीचं खंडन केलं आहे, असं वृत्त संस्था रॉयटर्सनं म्हटलं आहे. ट्रंप यांच्या नेतृत्वात अजर त्यांचं कम पुढे चालू ठेवतील, असंही डीरे यांनी म्हटलंय.
व्हेंटिलेटर 1 लाखात बनवणारा गुजरातमधला कारखाना
भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1990 नवीन रुग्ण
भारतातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 26 हजार 496 वर पोहोचली आहे. आतापर्यंत देशात 824 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
गेल्या 24 तासांमध्ये देशात कोरोनाचे 1990 कोरोनाचे रुग्ण आढळले असून 49 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे.
किम जाँग-उन यांच्या तब्येतिविषयी उलटसुलट चर्चा
वॉशिंग्टनस्थित उत्तर कोरिया मॉनिटरिंग प्रोजेक्टनं एका सॅटेलाईट इमेजची समीक्षा करत म्हटलं आहे की, उत्तर कोरियामधील रिसॉर्ट टाऊन वोनसनमध्ये एक ट्रेन उभी आहे, जी किम जाँग-उन वापरत असलेली ट्रेन असण्याची शक्यता आहे. 21 एप्रिलला ही ट्रेन वोनसनमधील लीडरशीप स्टेशनवर पार्क करण्यात आली होती, असंही मॉनिटरिंग प्रोजेक्ट 38 नॉर्थचं म्हणणं आहे.
हे स्टेशन किम यांच्या कुटुंबीयांसाठी राखीव असतं, असंही त्यांनी म्हटलं आहे. यासंबंधीचा रिपोर्ट रॉयटर्समध्ये छापून आला आहे. मात्र मॉनिटरिंग ग्रूपच्या रिपोर्टची रॉयटर्सनं स्वतंत्रपणे पुष्टी केली नाही.
रिपोर्टमध्ये म्हटलंय की, "ट्रेनच्या उपस्थितीमुळे हे समजू शकलेलं नाही की, किम जाँग-उन कुठे आहेत, तसंच त्यांच्या तब्येतीविषयीची माहितीही समजू शकलेली नाही. पण, ते देशातल्या विशेष अशा पूर्वेकडच्या भागात असल्याचं दिसून येतं."
दक्षिण कोरियाची राजधानी सोलस्थित न्यूज वेबसाईट डेली एनकेच्या एक रिपोर्टनुसार, किम हे प्याँगयाँगच्या उत्तरेकडील रिसॉर्ट काउंटी ऑफ ह्यागसनमध्ये उपचार घेत आहे. त्यांनी एका अनामिक सूत्राच्या आधारे ही बातमी दिली आहे. दक्षिण कोरियामधील वृत्त संस्था न्यूजइजच्या मते, कोरोनापासून बचाव करण्यासाठी किम वोनसनमध्ये असण्याची शक्यता आहे.
चीनमध्ये 24 तासांत कोरोनाचे 11 नवीन रुग्ण
25 एप्रिलला चीनमध्ये कोरोनाचे 11 नवीन रुग्ण आढळले असून नवीन मृत्यूची नोंद झालेली नाही.यापूर्वी 24 एप्रिलला 12 रुग्ण आढळले होते.
चीनमध्ये आतापर्यंत कोरोनाचे 82 हजार 827 रुग्ण आढळले असून 4हजार 632 जणांचा मृत्यू झाला आहे.