You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'वाधवान कुटुंबाला पत्र अमिताभ गुप्तांनी स्वतः दिलं होतं'- गृहमंत्री
कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स
लाईव्ह कव्हरेज
2020-21 वर्षांत आयआयटीच्या ट्यूशन फीमध्ये वाढ नाही
आयआयटीच्या 2020-21 या वर्षासाठी ट्यूशन फीमध्ये वाढ करण्यात येणार नसल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी घोषित केलं आहे.
निशंक यांनी आयआयटी काऊन्सिलचे अध्यक्ष, स्थायी समिती आणि आयआयटी संचालकांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे.
यवतमाळमध्ये आणखी 9 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह, एकूण संख्या 50 वर
यवतमाळमध्ये आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या आणखी 9 जणांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहे.
सकाळी 7 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. आता 9 जणांचे पॉझिटिव्ह अहवाल वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाले.
त्यामुळे एकूण कोरोनाग्रस्तांच्या संख्येत 16 रुग्णांची भर पडली आहे. आता यवतमाळमधील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 50 झाली आहे. अद्यात 264 नमुन्यांचे अहवाल मिळणं बाकी असल्याचं जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संवादातील महत्त्वाचे मुद्दे :
- वाधवान कुटुंबीयांचा ताबा आता सीबीआयकडे
- वाधवान कुटुंबाला पत्र देण्यासाठी अमिताभ गुप्तांवर कुणाचाही दबाव नव्हता
- अमिताभ गुप्ता यांनी स्वत:च वाधनाव कुटुंबीयांना पत्र दिल्याचं कबूल केलंय
- अमिताभ गुप्ता यांच्या चौकशीचा अहवाल सार्वजनिक करण्यात येईल
अमिताभ गुप्ता प्रकरणाची चौकशी पूर्ण- गृहमंत्री
'बातमीसाठी फिल्डवर गेलो, तिकडेच कोरोनाची लागण झाली, पण पर्याय नव्हता'
'सावधानी हटी तो दुर्घटना घटी'; मोदींच्या 'मन की बात' मधील 15 मुद्दे
कोरोना व्हायरसमुळे संघाचे जूनपर्यंतचे सगळे कार्यक्रम रद्द
संघाचे स्वयंसेवक घरात राहून प्रार्थना करत आहेत. कोरोना व्हायरसमुळे संघाचे जूनपर्यंतचे सगळे सार्वजनिक कार्यक्रम सध्या रद्द केल्याची माहिती सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिली.
एकांतात राहून देशाची सेवा करूया. महामारीला घाबरण्याची गरज नाही. आपल्या चांगुलपणाने जगाला चांगलं बनवू, असं सरसंघचालक म्हणाले.
अडचण असूनही भारताने इतर देशांना औषधं पुरवली आहेत. हाच आपला स्वभाव आहे. आपलेपणाच्या भावनेतून सर्वांनी मिळून काम केलं पाहिजे, सामाजिक कार्य करताना स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेणं गरजेचं आहे, असं भागवत यांनी सांगितलं.
संन्यासींची काहीही चूक नसताना त्यांची मारहाण करून हत्या करण्यात आली. अशा घटना होता कामा नये. माथी भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांपासून जनतेनं दूर राहावं.
संन्यासींच्या मृत्यूचं दुःख आपल्या सर्वांच्या मनात आहे. 28 एप्रिलला त्यांना श्रद्धांजली देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी विश्व हिंदू परिषदेने काही सूचना दिली आहे. त्याचं सर्वांनी पालन करूया, असं भागवत म्हणाले.
मुंबईतील 31 पत्रकारांना डिस्चार्ज
काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या पत्रकारांपैकी 31 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
या पत्रकारांची दुसऱ्यांदा करण्यात आलेली चाचणी निगेटिव्ह आली. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या सर्वांना 14 दिवस होम क्वारंटाईन होण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने दिली.
मोदींनी म्हटल्याप्रमाणे गरम पाणी किंवा काढा प्यायल्याने रोग प्रतिकारशक्ती खरंच वाढते का?– फॅक्ट चेक
कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे भारतातला बेरोजगारीचा दर 23 टक्क्यांवर पोहोचला
उत्तर प्रदेशात 1843 कोरोना पॉझिटिव्ह
उत्तर प्रदेशातील कोरोना व्हायरसग्रस्तांची संख्या 1843 वर पोहोचली आहे.
राज्यातील 289 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 29 जणांचा कोव्हिड-19 मुळे मृत्यू झाल्याची माहिती उत्तर प्रदेशचे मुख्य आरोग्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी दिली आहे.
कोरोनाचा परिणाम महिला आणि पुरुषांवर वेगवेगळा का होतो?
'कोरोना' संकटावर मात करण्यासाठी महात्मा बसवेश्वरांच्या क्रांतिकारी संकल्पना प्रेरणादायी- उपमुख्यमंत्री अजित पवार
समाजातील गरिबी, विषमता दूर करून आर्थिक समृद्धी आणण्यासाठी महात्मा बसवेश्वरांनी श्रमप्रतिष्ठेबरोबरच कमावलेले धन समाजासाठी वापरण्याच्या क्रांतिकारक संकल्पना मांडल्या. त्यांनी मांडलेल्या या संकल्पनाच आजच्या 'कोरोना' संकटावर मात करण्यासाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार काढत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महात्मा बसवेश्वरांना जयंतीनिमित्त अभिवादन केले.
'आम्हाला प्यायला, वापरायलाच पाणी मिळत नाही तर हात धुवायला कुठून मिळणार?'
चीनने कोरोना व्हायरस मृतांची आकडेवारी लपवली का? – सोपी गोष्ट
इजरायलमध्ये दुकानं उघडण्यास परवानगी, शाळा उघडण्याबाबत विचार सुरू
इजरायलमध्ये दुकानं उघडण्यास रविवारी परवानगी देण्यात आली. पण फक्त रस्त्यावरील दुकानं उघडण्यासाठी ही परवानगी देण्यात आली आहे. शॉपिंग मॉल आणि बाजारपेठा यापुढेही बंद राहतील. रेस्टॉरंटना जेवण पार्सल देण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर शाळा उघडण्याबाबत विचार सुरू आहे.
इजरायलमध्ये आतापर्यंत 15 हजार 398 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले असून त्यापैकी 199 जणांचा मृत्यू झाला आहे.
युकेतील 10 टक्के लोकांना कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज
युकेमधील 10 टक्के लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची शक्यता आहे, असा अंदाज ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक ख्रिस्तोफ फ्रेजर यांनी वर्तवला आहे.
युकेमधील 3 ते 10 टक्के लोकांना कोरोनाची बाधा झालेली असू शकते, ही संख्या 60 लाखांपर्यंत असू शकते, असा अंदाज फ्रेजर यांनी वर्तवला.
आंध्र प्रदेशातील रुग्णसंख्या 1097
आंध्रप्रदेशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढून 1097 वर पोहोचली आहे.
गेल्या 24 तासांत 81 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले. राज्यात आतापर्यंत 31 जणांचा मृत्यू झालेला असून 231 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती आंध्र प्रदेश प्रशासनाने दिली आहे.
ब्रेकिंग, राजस्थानातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2152 वर
राजस्थानात आज कोरोना व्हायरसची लागण झालेले 69 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2152 वर पोहोचली आहे.
आतापर्यंत राज्यात 36 मृत्यू झाले असून 518 लोक बरे झाले आहेत, अशी माहिती राजस्थान आरोग्य विभागाने दिली आहे.