केरळमध्ये माणसं घरी, हत्तीचा वॉक
केरळमधील मुन्नरमध्ये लॉकडाऊनमुळे नागरिक घरात असताना, एका हत्तीने शहराची सैर केली.
रिकाम्या रस्त्यांवरून या हत्तीने फेरफटका मारला. सोशल मीडियावर हत्तीच्या वॉकची चांगलीच चर्चा आहे.
You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स
केरळमधील मुन्नरमध्ये लॉकडाऊनमुळे नागरिक घरात असताना, एका हत्तीने शहराची सैर केली.
रिकाम्या रस्त्यांवरून या हत्तीने फेरफटका मारला. सोशल मीडियावर हत्तीच्या वॉकची चांगलीच चर्चा आहे.
कोरोना व्हायरसची निर्मिती कशी झाली याबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर चौकशीच्या मागणीला चीनने नकार दिला आहे. चीनने या विषाणूबाबत चुकीच्या बातम्या पसरवल्याचा आरोप युरोपियन युनियनच्या अहवालात करण्यात आला होता.
दरम्यान लॉकडाऊन असतानाही ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये Anzac Day निमित्ताने शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अनेकजण घराबाहेर पडले होते. पहिल्या महायुद्धात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचे अनेक सैनिक मारले गेले होते.
अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 50,000च्या पुढे गेला आहे. शुक्रवारी जॉर्जिया, अलास्का आणि ओक्लाहोमा या भागांमध्ये अनेक दुकानं उघडली.
जगभरात कोरोना संसर्ग होणाऱ्यांची संख्या 27 लाख एवढी झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या 1 लाख 90 हजार एवढी आहे.
अमेरिकन काँग्रेसने कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्याकरता 480 अब्ज डॉलर पॅकेजची घोषणा केली. हे पॅकेज छोट्या उद्योगांसाठी आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊननंतरही सोशल डिस्टन्सिंगचे नियम लागू केले जाऊ शकतात असे संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं आहे.
इंडोनेशियाने कोरोनाचा संसर्ग कमी करण्याकरता रमझान काळात आवश्यक नसलेल्या वाहतुकीवर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
जर्मनीत कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 148,046 एवढी झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 5,094 इतकी आहे. दुसऱ्या महायुद्धानंतरचं हे सगळ्यात मोठं संकट असल्याचं चॅन्सलर अँगेला मर्केल यांनी म्हटलं आहे.
लॉकडाऊन काळात कोणती दुकानं उघडी राहू शकतात, याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाने नवी नियमावली जाहीर केली आहे. यानुसार राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट कायद्याअंतर्गत सर्व प्रकारची दुकानं उघडू शकतात.
नगरपालिका क्षेत्राबाहेरील मार्केट कॉम्प्लेक्स खुले राहू शकतात. मात्र कुठेही मॉल्समधल्या दुकानांना अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही.
या दुकानांमध्ये केवळ 50 टक्के कर्मचारी असतील आणि त्यांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं लागेल.
दरम्यान, हॉटस्पॉट किंवा कंटेनमेंट झोनमध्ये दुकानं उघडण्यास परवानगी नाही.
गुड मॉर्निंग मंडळी,
घरीच आहात ना? मॉर्निंग वॉकला जाण्याचा हट्ट तर केला नाहीत ना? :)
कोरोनातून बरं होऊन घरी परतणाऱ्यांची संख्या वाढते आहे, ही आपल्याला दिलासा देणारी गोष्ट आहे. मात्र तरीही लॉकडाऊन काळात सरकारने सांगितलेल्या सगळ्या नियमांचं पालन करणं आपल्यासाठी अत्यावश्यक आहे. त्यामुळे काळजी घ्या.
बाहेर जाताना मास्क परिधान करायला विसरू नका. हात धुवायला, सॅनिटायझर लावायला विसरू नका. सोशल डिस्टन्सिंग राखा. कुठेही थुंकू नका. खोकला किंवा शिंक आल्यास आवश्यक ती काळजी घ्या.
बाकी तुम्हाला कोरोनाबाबत परभणी ते जर्मनी अशी जगभरातली माहिती तर आम्ही इथे देतच आहोत.
तेव्हा शेअर करायला विसरू नका हे पान.