You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

महाराष्ट्रात एका दिवसात 552 रुग्ण वाढले

कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स

लाईव्ह कव्हरेज

  1. कोरोना लढ्यासाठी स्टार्सचं ऑनलाईन कॉन्सर्ट

    कोरोनाचा सामना करण्यात सगळ्यात पुढे असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जगभरातील कलाकार एका ऑनलाईन कॉन्सर्टसाठी एकत्र आले.

    आठ तासांच्या या कॉन्सर्टमध्ये एकूण 100 कलाकारांनी सहभाग नोंदवला. यात लेडी गागा, पॉल मॅकार्टने आणि बिली ईलिश सारख्या दिग्गजांचा समावेश होतो.

    कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन असल्याकारणानं त्यांनी आपापल्या घरांमधूनच गाणी गायली.

    The Rolling Stones या ब्रिटिश बँडच्या सदस्यांनी चार वेगवेगळ्या ठिकाणांवरून एकत्र येत गाणंं म्हटलं आहे.

    आठ तासांच्या या शोमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आयुष्यातील खऱ्या गोष्टीही दाखवण्यात आल्या आहेत.

    लेडी गागाने या इव्हेंटला"A love letter to the world"असं नाव दिलं आहे.

  2. स्पेनमधील लॉकडाऊन 9 मे पर्यंत वाढवला

    स्पेनमधील लॉकडाऊन 9 मे पर्यंत वाढवण्याची घोषणा पंतप्रधान पेद्रो सँचेझ यांनी केली आहे.

    देशातील सद्यस्थिती पाहता लॉकडाऊन अजून 15 दिवस वाढवावं लागणार आहे. असं असलं तरी, लहान मुलांना खेळण्यासाठी काही अटींच्या अधीन राहून 27 एप्रिलनंतर बाहेर सोडण्याची परवानगी देण्यात येईल, असं सँचेझ यांनी म्हटलं.

    अनेक दिवसांपासून आपल्या देशातील मुलं नऊ दिवसांनंतर बाहेर पडू शकतील, असंही ते म्हणाले.

    स्पेन 14 मार्चपासून संपूर्णरीत्या लॉकडाऊन करण्यात आला आहे.

  3. कोण आहे एजाझ खान, ज्याच्या मुंबईत अटकेवरून पेटलंय ट्विटर

  4. नागपूरमध्ये कोरोनाचे 9 नवीन रुग्ण

    नागपूरमध्ये कोरोनाचे 9 नवीन रुग्ण सापडले आहेत. यामुळे शहरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 72 वर पोहोचली आहे.

    दरम्यान, कोरोनाच्या काळातील सावधगिरीच्या उपायांची माहिती देणारे प्रतीकात्मक पुतळे नागपूर पोलिसांनी शहरातील शांती नगर परिसरात लावले आहेत.

  5. पुण्यात कोरोनाचे 47 नवीन रुग्ण

    पुण्यात कोरोनाचे 47 नवीन रुग्ण आढळल्यामुळे शहरातील एकूण रुग्णांची संख्या 612 वर पोहोचली आहे.

    कोरोनामुळे आतापर्यंत पुण्यातील 51 जणांचा मृत्यू झाला आहे.

  6. मध्य प्रदेशच्या वाईट स्थितीला कोण जबाबदार?

    मध्य प्रदेशमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 1408 वर पोहोली आहे, तर 62 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे सरकारच्या चिंतेत वाढ झाली आहे.

    राज्यातील इंदूरमध्ये सर्वाधिक 892 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत, तर शहरातील 47 जणांचा कोरोनानं बळी घेतला आहे. दुसऱ्या क्रमांकावर राजधानी भोपाळ आहे. भोपाळमध्ये आतापर्यंत 207 जणांना कोरोनाची लागण झालीय, तर 6 जणांचा मृत्यू झाला. असं असलं तरी मृत्यू झालेल्या लोकांना इतर आजार होते, असं प्रशासनानं म्हटलं आहे.

    पण, मध्य प्रदेशमधील कोरोनाग्रस्तांची संख्या इथपर्यंत कशामुळे गेली, यासाठी कोण जबाबदार आहे, हे समजून घ्यायचा प्रयत्न बीबीसीनं केला आहे.

  7. ‘...तर लॉकडाऊनमुळे झूमधले प्राणी एकमेकांना खायला घालावे लागतील’

  8. गुजरातमधल्या पहिल्या कोरोना रुग्णाला दवाखान्यातून सुटी

    गुजरातमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेल्या पहिल्या रुग्ण नियोमी शाह यांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.

    त्यांनी म्हटलं की,"मला 17 मार्चला दवाखान्यात भरती करण्यात आलं होतं.कोरोनाची चाचणी दोनदा निगेटिव्ह आल्यानंतर मला घरी सोडण्यात आलं आहे. हा एक मोठा प्रवास राहिला आहे."

  9. मुख्यमंत्र्यांची खुर्ची धोक्यात? विधान परिषदेवर नियुक्तीला कोर्टात आव्हान

  10. चीनमध्ये 17 मार्चनंतर आढळले कोरोनाचे सर्वांत कमी रुग्ण

    चीनच्या नेशनल हेल्थ कमिशननं म्हटलं आहे की, चीनमध्ये 18 एप्रिलला कोरोनाचे 16 नवीन रुग्ण आढळले आहेत आणि 17 मार्चनंतर हा रुग्णांचा सगळ्यात कमी आकडा आहे.

    17 एप्रिलला कोरोनाचे 27 नवीन रुग्ण आढळले होते. चीनमध्ये आतापर्यंत 82 हजार 735 जणांना कोरोनाची लागण झाली असून 4 हजार 632 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

  11. भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा 15 हजारांवर

    केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 1 हजार 334 नवीन रुग्ण आढळले असून 27 जणांचा मृत्यू झाला आहे.

    त्यामुळे भारतात आतापर्यंत 15 हजार 712 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर 2230 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

  12. बर्थडे पार्टीला गेलेले 10 जण कोरोनाची लागणच घेऊन आले

  13. स्वित्झर्लंडमधील मॅटरहॉर्न पर्वतावर तिरंगा झळकला

    स्वित्झर्लंडमधील अॅल्प्स पर्वतरांगेतील मॅटरहॉर्न शिखरावर तिरंगा झळकवण्यात आला आहे. कोरोनाविरोधात भारताच्या लढ्यात आम्ही सोबत आहोत, अशी भावना या माध्यमातून व्यक्त करण्यात आली आहे.

  14. ब्रेकिंग, ट्रंप - ... तर चीनला गंभीर परिणाम भोगावे लागतील

    व्हाईट हाऊसमधील कोरोनाविषयक पत्रकार परिषदेत ट्रंप यांनी म्हटलं की, कोरोना व्हायरसचा प्रसार होण्यापूर्वीच चीन याला थांबवू शकला असता, पण चीननं असं केलं नाही, त्यामुळे आता संपूर्ण जगाला कोरोनाचा फटका बसला आहे.

    ट्रंप यांना विचारण्यात आलं होतं की, गेल्या वर्षी डिसेंबरपासून कोरोना व्हायरसच्या संसर्गाची सुरुवात झाली आणि आतापर्यंत जगभरात 1 लाख 57 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. यासाठी चीनला गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल?

    या प्रश्नाच्या उत्तरात ट्रंप यांनी म्हटलं की, "चीननं जर जाणूनबुजून असं काही केलं असेल, तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील. चूक असेल तर ती चूकच असते. पण, त्यांनी माहिती असतानाही हे केलं असेल, तर त्यांना परिणाम भोगावे लागतील."

    ट्रंप यांनी पुढे म्हटलं, "चीनकडून चूक झाली असेल किंवा त्यांना कोरोनावर नियंत्रण मिळवता आलं नसेल आणि त्यांनी मुद्दामून असं केलं असेल, तर या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे. सध्या आम्ही शांत असलो, तरी याविषयीची चौकशी करत आहोत."

  15. सैफ, तैमूर आणि करीनाचा लॉकडाऊन

    आधीच लॉकडाऊन, आणि त्यातच वीकेंड म्हटलं की निवांत वेळ.

    करीना कपूर-खान तिच्या घरी तयार होत असलेल्या दोन कलाकारांना कॅमेऱ्यात कैद करत आहे.

    सैफ अली खान चांगला गिटारिस्ट आहे, वाचन करतो, हे आपल्याला माहिती आहेच. पण त्याच्या हातात ब्रश कदाचित पहिल्यांदाच पाहिला असेल.

    आता बापासारखंच लेकरूही. तैमूरनेही आपली ‘कलाकारी’ घरातल्या एका भिंतीवर दाखवली.

    मग आज संडे आहे तर तुम्ही काय करताय?

  16. दक्षिण कोरियात कोरोनाचे केवळ 8 नवीन रुग्ण

    दोन महिन्यांनंतर दक्षिण कोरियातील कोरोनाग्रस्तांचा आकडा सिंगल-डिजिटमध्ये आला आहे. देशात शनिवारी कोरोनाचे केवळ 8 रुग्ण आढळले आहेत.

    दरम्यान, दक्षिण कोरियातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10 हजार 653 झाली असून आतापर्यंत 232 जणांचा मृत्यू झाला आहे.

  17. पुण्यात अडकलेले बहरीनचे 125 नागरिक मायदेशी रवाना

    कोरोना व्हायरसदरम्यानच्या लॉकडाऊनमुळे बहरीन येथील 125 नागिरक पुण्यात अडकले होते. शनिवारी त्यांना विशेष विमानानं मायदेशी परत पाठवण्यात आलं.

  18. लॉकडाऊन काळात ‘लाल डब्बा’ पावला, औषधांच्या डिलिव्हरीसाठी पोस्टमनच धावला

  19. ट्रंप - कोरोनामुळे अमेरिकेत नाही तर चीनमध्ये सर्वाधिक मृत्यू

    अमेरिकेत कोरोनाचा मृत्युदर हा युरोपीय देशांपेक्षा कमी आहे, असं कोरोना व्हायरसविषयक पत्रकार परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं आहे.

    ते पुढे म्हणाले, "ब्रिटन, स्वित्झर्लंड, बेल्जियम आणि फ्रान्सच्या तुलनेत अमेरिकेतील कोरोनाचा मृत्युदर कमी आहे.

    "स्पेनचा मृत्युदर तर अमेरिकेहून चार पट अधिक आहे. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये अमेरिका पहिल्या क्रमांकावर नसून चीन आहे. आम्ही तर चीनच्या जवळपासही नाही आहोत. ही गोष्ट तुम्हाला-आम्हाला आणि त्यांनाही माहिती आहे."