You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

महाराष्ट्रात एका दिवसात 552 रुग्ण वाढले

कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स

लाईव्ह कव्हरेज

  1. कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे लोकांनी पाळीव प्राण्यांना सोडून दिलं - पाहा व्हीडिओ

  2. प्लाझ्मा थेरपीमुळे कोव्हिड-19 चे रुग्ण बरे होणार?

    कोव्हिडचा बरा झालेला पेशंट कोरोनाची लागण झालेल्या दुसऱ्या पेशंटला बरं करू शकतो? जगातल्या अनेक देशांमध्ये याप्रकारे रुग्णांवर उपचार सुरू झालाय. याला प्लाझ्मा थेरपी असं म्हणतात.

    पण ही थेरपी काय आहे? हिचा वापर भारतात होतोय का? यामुळे कोरोनाचं संकट दूर व्हायला मदत होईल का? हे आपण समजून घेऊया. अधिक माहितीसाठी क्लिक करा- प्लाझ्मा थेरपी काय आहे?

  3. तरुणाईमुळे आरोग्य आणि समृद्ध भविष्याचा मार्ग सुकर – नरेंद्र मोदी

    जगभरात कोरोना व्हायरसविरुद्ध लढाई सुरू आहे. अशा स्थितीत भारतातील तरुणाईमुळे देशाचं आरोग्य आणि समृद्ध भविष्याचा मार्ग सुकर असेल, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

    यावेळी नरेंद्र मोदी यांनी लिंक्डीनवरची एक लिंकही शेअर केली.

  4. कोरोनासारख्या आरोग्य संकटांचा सामना करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातोय?

  5. माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद

    माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधत आहेत.

  6. देशात आतापर्यंत 3 लाख 86 हजार 791 लोकांची चाचणी

    आतापर्यंत भारतात कोरोना व्हायरसच्या तपासणीसाठी 3 लाख 86 हजार 791 लोकांची चाचणी करण्यात आल्या आहेत. काल एका दिवसात 37 हजार 173 चाचण्या करण्यात आल्या.

    यापैकी 29 हजार 287 चाचण्या इंडियन काऊंसिल फॉर मेडिकल रिसर्चशी (आयसीएमआर) निगडीत लॅबमधून करण्यात आल्या, अशी माहिती आयसीएमआरचे प्रमुख रमण गंगाखेडकर यांनी दिली आहे.

    एकूण चाचण्यांपैकी 7 हजार 886 चाचण्या खासगी लॅबमध्ये करण्यात आल्याची माहिती डॉ. गंगाखेडकर यांनी दिली.

  7. गोव्यात सर्व कोरोनाग्रस्त बरे, नवा एकही रुग्ण नाही

    गोव्यात कोरोना व्हायरसची लागण झालेले सर्व रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यात एकही कोरोनाग्रस्त नसल्याची माहिती माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

    गोव्यात 3 एप्रिल रोजी शेवटचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. त्यानंतर एकही नवीन रुग्ण गोव्यात आढळून आला नाही. त्या रुग्णावर आतापर्यंत उपचार सुरू होते. त्याची नुकतीच घेतलेली चाचणीही आता निगेटिव्ह आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.

  8. आरोग्य मंत्रालयाची पत्रकार परिषद

  9. देशात गेल्या 24 तासांमध्ये 1334 नवे रुग्ण

    देशात कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या 15, 712 वर गेली आहे. तर 507 जणांचे कोरोनामुळे प्राण गेले आहेत.

  10. 'त्या' प्रकरणानंतर काही लोकांना मुस्लिमांची भीती का वाटत आहे?

  11. 'कोरोनाच्या कचऱ्या'ची विल्हेवाट कशी लावली पाहिजे?

  12. स्थलांतरित मजुरांच्या प्रवासाला परवानगी नाहीच – केंद्रीय गृह मंत्रालय

    परराज्यात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करता येणार नाही. असं केंद्रीय गृह मंत्रालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केलं आहे.

    कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे विविध राज्यांमध्ये स्थलांतरित मजूर अडकून पडले आहेत. त्यांना आपापल्या स्वगृही परतण्याची सोय करण्यात यावी, अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती.

    स्थलांतरित मजुरांसाठी विशेष रेल्वे सुरू करण्याचीही मागणी करण्यात येत होती. पण गृहमंत्रालयाने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या आदेशानुसार कोणत्याही राज्यातील मजूरांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.

  13. हरयाणातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 246वर

    हरयाणात आतापर्यंत 246 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 24 जण परदेशी नागरिक आहेत. तर इतर राज्यांतील 64 व्यक्तींना हरयाणामध्ये कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.

  14. लोकांच्या अंगावर निर्जंतुकीकरणासाठी फवारणी धोक्याची

    लोकांच्या अंगावर निर्जंतुकीकरणासाठी फवारणी धोक्याची आहे, अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली आहे.

    एक व्यक्ती किंवा समुहावर निर्जंतुकीकरण योग्य नाही. यामुळे व्यक्तीला शारीरीक किंवा मानसिक इजा होण्याची शक्यता आहे. कोव्हिड-१९ ग्रस्त रुग्णाच्या शरीरावर निर्जंतुकीकरण फवारणीचा फायदा नाही. यामुळे कोरोना व्हायरस नष्ट होत नाही. कपड्यांवर निर्जंतुकीकरण केल्याचा काही फायदा होत असल्याचा पुरावा नाही.

    निर्जंतुकीकरण फवारणी केल्याने लोकांना स्किन किंवा डोळ्यांना त्रास होण्याची शक्यता असते. सोडियन हायपोक्लोराईडमुळे नाक, श्वसनसंस्थेता इजा होण्याची शक्यता असते. देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर देशातील अनेक शहरात निर्जंतुकीकरण टनल उभारण्यात आले होते.

  15. 'कोरोना व्हायरसमुळे बॉलीवूडला 750 कोटींचा फटका तर 25 लाख लोक बेरोजगार'

  16. सोलापुरात आढळला आणखी एक कोरोनाग्रस्त, रुग्णांची संख्या 15 वर

    कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत सोलापुरात आज एकने वाढ झाली. त्यामुळे सोलापुरातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 15 झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

    नव्याने आढळलेली महिला रुग्ण 69 वर्षांची होती. या महिलेमध्ये कोव्हिड-19ची लक्षणं दिसल्यानंतर तिची तपासणी करण्यात आली होती. आज या महिलेचा अहवाल प्राप्त झाला. पण त्यापूर्वीच महिला मृत्युमुखी पडली आहे.

    ही महिला इंदिरानगर परिसरातील रहिवासी होती. तिच्या संपर्कातील 8 जणांना तपासणीसाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं आहे.

    सोलापुरात कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला असून 13 जणांवर उपचार सुरू आहेत.

  17. कोरोनानंतर चीनची आर्थिक अस्थिरता आपल्यासाठी डोकेदुखी ठरणार का?

  18. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणातील 13 महत्त्वाचे मुद्दे

  19. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याशी संवाद साधत आहेत. पाहा लाईव्ह इथे -

  20. गरिबांना मोफत अन्नधान्य पुरवा – पी. चिदंबरम

    लॉकडाऊनमुळे गरिबांवर वाईट परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे देशातल्या गरिबांच्या खात्यावर पैसे जमा करावे आणि त्यांना मोफत अन्नधान्याचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारडे केली आहे.

    कोरोनाच्या काळात सरकारनं संवेदनशील राहणं गरजेचं आहे, असंही ते म्हणाले.