You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

मुंबईत एकाच दिवसात 184 नवे रुग्ण, राज्यातल्या रुग्णांची संख्या 3648 वर

कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स

लाईव्ह कव्हरेज

  1. कोरोनामुळे लोकांचं घर खरेदी करण्याचं स्वप्न भंगलं?

  2. स्थलांतरित मजूरांना घरी जाऊ देण्याच्या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका

    देशाच्या विविध भागात अडकून पडलेल्या स्थलांतरित मजूरांना घरी जाऊ देण्यात यावं, या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

    कोव्हिड-19 चा चाचणी अहवाल निगेटिव्ह आलेल्या मजूरांना त्यांच्या गावी परतण्याची परवानगी देण्यात यावी, सरकारनेच या मजूरांच्या घरपर्यंतच्या सुरक्षित प्रवासाची सोय करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

  3. सोलापुरात आणखी एक रुग्ण वाढला, संख्या 14 वर

    सोलापुरात कोरोना व्हायरसची लागण झालेला आणखी एक रुग्ण आढळून आला. त्यामुळे शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 14 वर पोहोचली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

    सदर रुग्ण सोलापुरातील पाच्छा पेठ परिसरातील रहिवासी आहे. शहरातील पहिला रुग्ण यााच भागात आढळलेला होता. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी पाच्छा पेठ परिसर यापूर्वीच कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केला आहे.

  4. लॉकडाऊनमध्ये तरुणांना कामावर जाऊ द्यायला हवं का?

    लॉकडाऊन काढला तर काय होईल? लॉकडाऊन संपला नाही तर मग काय होईल? जगात कोणते देश काय करत आहेत? आणि 'ढालीचं धोरण' हा लॉकडाऊनला पर्याय असू शकतो का? हे धोरण काय भानगड आहे? पाहूया गोष्ट लॉकडाऊनची आणि ढालीच्या धोरणाची.

  5. लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात कुठल्या जिल्ह्यात कोणत्या उद्योगांना परवानगी?

  6. अमरावतीत आणखी एक तरुण पॉझिटिव्ह, नीतेश राऊत यांचा वृत्तांत

    अमरावती शहरातील नूराणी चौकात दोन दिवसांपूर्वी एक ऑटो चालक मरण पावला होता. आत त्याच्या 17 वर्षीय मुलाचा चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

    अमरावतीत आता कोरोनाचे एकूण सहा रुग्ण असून, एकाचा मृत्यू झाला आहे. तर पाच जणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.

  7. अमेरिकेत लॉकडाऊनविरोधात आंदोलनं

    अमेरिकेत विविध राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र काही प्रांतांमध्ये या लॉकडाऊनला विरोध होऊ लागला आहे.

    विशेष म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी लॉकडाऊन विरोधी समर्थकांना पाठिंबा देणारे ट्वीट केले आहेत.

    मिनेसोटा, मिशिगन आणि व्हर्जिनियात लागू करण्यात आलेलं लॉकडाऊन अत्यंत कठोर आहे, अशी भूमिका ट्रंप यांनी शुक्रवारी मांडली होती.

    मिनेसोटाला स्वतंत्र करा, मिशिगनला स्वतंत्र करा, व्हर्जिनियाला स्वतंत्र करा, अशा आशयाचे ट्वीट त्यांनी केले होते.

    कोरोना विषाणूचा संसर्ग कमीत कमी व्हावा यासाठी अमेरिकेच्या आरोग्य विभागाने कठोर लॉकडाऊन लागू केलं आहे. मात्र मिशिगन, ओहियो, उत्तर कॅरोलिना, मिनेसोटा, व्हर्जिनिया, केंटली या भागांमध्ये लॉकडाऊनविरोधी आंदोलन झालं. ट्रंप यांनी ट्वीट केलेल्या राज्यांमध्ये डेमोक्रॅट्स पक्षाचं सरकार आहे. ओहियो आणि युटा या भागात रिपब्लिकन पक्षाचं सरकार आहे.

    गुरुवारी कोरोनामुळे अमेरिकेत 4,591 लोकांचा मृत्यू झाला. मृतांच्या संख्येत वाढ होण्याचं आणखी एक कारण समोर आलं आहे. अन्य आजारपणामुळे मृत्यू झालेल्या मात्र कोरोनाचा संसर्ग झालेला असण्याची शक्यता असणाऱ्या व्यक्तींची नोंद कोरोना मृतांमध्ये करण्यात येत आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठातर्फे ही आकडेवारी प्रसिद्ध केली जात आहे.

  8. पुण्यात पोलीस काँन्स्टेबल आणि पत्नीला कोरोना

    पुण्यात 42 वर्षीय पोलीस काँन्स्टेबल आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. पुणे शहराचे जॉइंट कमिशनर डॉ. रवींद्र शिसवे यांनी ही माहिती दिली.

  9. नायजेरियात राष्ट्राध्यक्षांच्या चीफ ऑफ स्टाफचा मृत्यू

    नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष मुहम्मद बुहारी यांचे चीफ ऑफ स्टाफ अब्बा क्यारी यांचा शुक्रवारी कोरोनामुळे मृत्यू झाला.

    चिलीमध्ये 45 दिवसानंतर लॉकडाऊन हटवण्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष सेबॅस्टियन पिनइरा यांनी केली.

    ब्राझीलमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 2,100 जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी 217 जणांचा मृत्यू झाला.

  10. कोरोनाबद्दल जनजागृतीसाठी पोलीस बनला यमदूत

    कोरोना विषाणूसंदर्भात लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी मध्य प्रदेशात पोलीस काँस्टेबलने यमराजाचं रूप धारण केलं. लोकांनी घरीच राहावं आणि या विषाणूला परतावून लावावं असा संदेश या यमराजाने दिला.

  11. INS आंग्रे लॉकडाऊन - भारतीय नौदल

    "7 एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मात्र त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळलेली नाहीत," असं नौदलाने स्पष्ट केलं आहे.

    ते राहत असलेला लिव्हिंग ब्लॉक क्वारंटाईन करण्यात आला असून, INS आंग्रे कंटेनमेंट झोन घोषित करून तिथे लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे, असंही नौदलाने सांगितलंय.

    कोरोनासंदर्भात नियमावलीचं पालन करून कार्यवाही करण्यात आली आहे. जहाजावर तसंच पाणबुडीवर कार्यरत कोणालाही कोरोनाचा संसर्ग झालेला नाही, असं ते पुढे म्हणाल्याचं ANI ने ट्वीट केलं आहे.

  12. धनंजय माने लॉकडाऊन संपेपर्यंत इथेच राहणार आहेत!

    कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांनी घरातच राहावं या जनजागृतीसाठी राज्य पोलिसांनी भन्नाट शक्कल लढवली आहे.

    अशी ही बनवाबनवी या विनोदी चित्रपटातलं धनंजय माने इथेच राहतात का? हे वाक्य चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. त्यावरून सोशल मीडियात मीम्सही व्हायरल होत असतात. या वाक्याचा आधार घेऊन राज्य पोलिसांनी 'हो! आणि लॉकडाऊन संपेपर्यंत इथेच राहणार आहेत' असं ट्वीट करत त्या सीनचा फोटो शेअर केला आहे.

    नेटिझन्सनी राज्य पोलिसांच्या या हजरजबाबीपणाला जोरदार प्रतिसाद दिला आहे.

    तीन दशकांनंतरही 'अशी ही बनवाबनवी' चित्रपटाची जादू चाहत्यांवर कायम आहे. त्यानिमित्ताने गेल्या वर्षी बीबीसी मराठीनेही स्मरणरंजन केलं होतं. इथे वाचा- धनंजय माने आमच्या मनात राहतात.

  13. पालघरमध्ये चोर समजून जमावाने केली तिघांची हत्या

  14. मुंबईतल्या भायखळा भाजीबाजारची दृश्यं

    भायखळा भाजीमार्केट परिसरात सोशल डिस्टन्सिंग पाळत व्यवहार सुरू आहेत.

  15. कोरोना आव्हानाचं संधीत रुपांतर करूया- राहुल गांधी

    "कोरोना विषाणूचं संकट खडतर आणि आव्हानात्मक आहे. पण आपण त्याकडे संधी म्हणूनही पाहायला हवं. या महासंकटाचा मुकाबला करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान उपयोगात आणत उपाययोजनांसाठी देशभरातील शास्त्रज्ञ, डेटा एक्सपर्ट, इंजिनियर्स यांना प्रोत्साहित करायला हवं", असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

  16. देशात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 14,000

    देशभरात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 14, 378 एवढी झाली आहे. 480 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 1,991 लोक कोरोनाच्या प्रादुर्भावातून मुक्त झाले आहेत.

    आरोग्य आणि कुटंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली.

  17. वुहानमध्ये कोरोना मृत्यूचं प्रमाण 50 टक्क्यांनी वाढलं

    कोरोनाचं केंद्र असलेल्या चीनमधील वुहान शहरातील कोरोना मृतांचा आकडा जाहीर करण्यात आला. आधीच्या आकडेवारीच्या तुलनेत हे प्रमाण 50 टक्क्यांनी वाढलं आहे.

    वुहानमध्ये कोरोनामुळे 2,579 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र नव्या आकडेवारीनुसार हा आकडा 3,869 आहे. आधीच्या आकडेवारीत 1,290 मृतांची भर पडली आहे.

    चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनने ही आकडेवारी जाहीर केली. नव्या अहवालानुसार वुहान शहरात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांचं प्रमाण 325 टक्क्यांनी वाढल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

    आधीच्या आकडेवारीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याची चार कारणंही देण्यात आली आहेत. त्यानुसार कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर रुग्णांची संख्याही वेगाने वाढू लागली. अनेकांना हॉस्पिटलमध्येही दाखल करण्यात आलं नाही. त्यांचा घरीच मृत्यू झाला.

    काही हॉस्पिटल्समध्ये कोरोनाबाधितांच्या आकडेवारीची डेटाबेसवर नोंद झाली नाही. काही मृतांची माहिती अपुरी होती. काही ठिकाणी नोंदणीत चुका होत्या.

  18. लॉकडाऊनमुळे कोरोनाचा प्रसार खरंच रोखला जातोय का?

  19. मुंबईत नौसैनिकांना कोरोना

    मुंबईतील नौदलाच्या तळावरील 20 नौसैनिकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

    मुंबईच्या किनाऱ्यावर नौदलाचा INS आंग्रे हा तळ आहे. INS आंग्रेवरून पश्चिम नौदल कमांडच्या ऑपरेशन्ससाठी रसद पुरवली जाते.

    7 एप्रिलला याच तळावर पहिल्या कोरोना रुग्णाची नोंद झाली होती. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्वांची चाचणी घेण्यात आली होती असं नौदल अधिकाऱ्यांनी सांगितलं.

  20. कालपर्यंतचे अपडेट्स पाहा इथे...

    तुम्हाला माहितीये, आम्ही हे लाईव्ह कव्हरेज दररोज असंच करतोय...

    काल, म्हणजेच शुक्रवारी महाराष्ट्रापासून जगभरात काय काय घडलं कोरोना व्हायरस संदर्भात, ते सारंकाही वाचण्यासाठी इथे क्लिक करा