You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

मुंबईत एकाच दिवसात 184 नवे रुग्ण, राज्यातल्या रुग्णांची संख्या 3648 वर

कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स

लाईव्ह कव्हरेज

  1. राज्यात कोरोनाग्रस्तांवरील उपचारासाठी 55 विशेष रुग्णालये, 6660 खाटांची उपलब्धता

    राज्यात कोरोनाग्रस्तांवरील उपचारासाठी विशेष रुग्णालयांची संख्या वाढवून 55 करण्यात आली आहे, त्यामुळे सध्याच्या स्थितीत कोरोनाग्रस्तांसाठी 6660 खाटांची उपलब्धता असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

    कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने यापूर्वी राज्यातील 30 शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषित केली होती. त्यानंतर आरोग्य विभागाने पुन्हा आठ रुग्णालये तर वैद्यकीय शिक्षण विभागाने 17 रुग्णालये त्यासाठी अधिसूचित केली आहेत. त्यामुळे रुग्णालयांची संख्या वाढून55 झाली आहे.

    त्यामुळे पूर्वी घोषित केलेल्या 30 रुग्णालयातील 2305 खाटा आणि आताच्या ४३५५ खाटा अशा राज्यात एकूण 6660 खाटा कोरोनाबाधीतांच्या उपचारासाठी उपलब्ध आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

    दोन्ही विभागांनी काढलेल्या अधिसूचनांमुळे या रुग्णालयांना संशयित आणि कोरोना निदान झालेल्या रुग्णांना केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार करणे बंधनकारक असणार आहे. असंही आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितलं.

  2. 'कोरोनाग्रस्त मुस्लीम म्हणून लोकांनी वाळीत टाकल्याने भावाने आत्महत्या केली'

  3. मुंबईत INS आंग्रेवरील 21 नौसिकांना कोरोनाची लागण

  4. डोनाल्ड ट्रंप अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलतील का?

  5. राज्यातील सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत सुरू होणार कोव्हिड-19 तपासणी केंद्र

    कोव्हिड-19 चा वाढता प्रसार लक्षात घेता स्थानिक पातळीवर चाचणी होण्याच्या दृष्टीने राज्यातील सहा सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोविड-19 चाचणी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली.

    या चाचणी केंद्रासाठी आवश्यक असणारी यंत्रसामग्री, साधन सामग्री तसेच अन्य बाबी संबधित जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित करण्यात आलेल्या समितीच्या मान्यतेने व शिफारशीनुसार करण्यात याव्यात असे आदेशही देण्यात आले आहेत.

    कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बीडच्या अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा यामध्ये समावेश आहे.

  6. हायड्रॉक्सिक्लोरोक्विनसंदर्भात आयसीएमआरचा अभ्यास सुरू

    इंडियन काऊन्सिल फॉर मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) हायड्रॉक्सिक्लोरोक्विनसंदर्भात अभ्यास सुरू केला आहे. हा अभ्यास ऑब्झर्वेशन स्वरूपाचा आहे. यामध्ये ४८० रुग्णांवर अभ्यास केला जाईल. आठ आठवड्यांपर्यंत हा अभ्यास सुरू राहील. याची पूर्ण माहिती येण्यासाठी २ महिने लागतील, अशी माहिती आयसीएमआरचे प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिली.

    एक नवीन संशोधन सुरू करण्यात येणार आहे. काही आरोग्य कर्मचाऱ्यांनी हायड्रॉक्सिक्लोरोक्विन घ्यायला सुरूवात केली आहे. याचे साईड इफेक्ट काय आहेत याच्या अभ्यासासाठी एक संशोधन करण्यात येत आहे.

    या अभ्यासातील व्यक्तीचं साधारण वय ३५ वर्ष. १० टक्के लोकांनी अॅबडॉमिनल पेन (ओटीपोटाचं दुखणं) झाल्याबाबत माहिती दिली. ६ टक्के लोकांना उलटी झाल्यासारखं वाटलं.१.३ टक्के लोकांना हायपो ग्लॅसिमिया (शरीरात साखरेचं प्रमाण कमी होणे). एम्समध्ये दोन्ही क्लोरोक्विनवर अभ्यास करण्यात येतो. प्रतिबंधक आणि उपचार म्हणूनही अभ्यास केला जात असल्याचं डॉ. गंगाखेडकर यांनी सांगितलं.

  7. 'युद्धनौका, पाणबुड्या, विमानांवर कोरोनाचा परिणाम नाही'

    देशाच्या नौदलातील युद्धनौका, पाणबुड्या, विमानांवर कोरोनाचा परिणाम नाही, त्या यापुढेही कार्यरत राहतील, असं भारतीय नौदलाचे व्हाईस अॅडमिरल एम. एस. पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

    कुलाब्यातील आयएनएस आंग्रेच्या डेपोमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेले 20 जवान आढळून आले होते. त्यानंतर व्हाईस अॅडमिरल पवार यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं. तसंच सध्याच्या स्थितीत शेजारी देशांना काही मदत लागल्यास भारतीय नौदल तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

  8. कोरोनाग्रस्त जवानांच्या संपर्कातील 130 जण क्वारंटाईन

    कुलाब्यातील आयएनएस आंग्रेच्या डेपोमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेले 20 जवान आढळून आले होते. त्यांच्या संपर्कातील 130 जणांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं आहे, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली.

    रुग्णांना भारतीय नौदलाच्या रुग्णालयात पाठवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत, असं नाईक यांनी सांगितलं.

  9. ‘रमजानचं नमाज पठण घरच्या घरीच करावं’

    कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात सुरु होणाऱ्या रमजान महिन्यामध्ये मुस्लिम बांधवांनी मशिद किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी न जमता घरातच नियमित नमाज, तरावीह पठण व इफ्तार इत्यादी धार्मिक कार्यक्रम करावेत, असं आवाहन राज्याच्या अल्पसंख्याक विकास विभागाने केलं आहे.

  10. बबिता फोगाटच्या शाब्दिक हल्ल्यावरून ट्विटरवर पडले दोन गट

  11. माहे, कोडुगू जिल्ह्यांमध्ये गेल्या 28 दिवसांत एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही

    पुडुच्चेरीच्या माहे आणि कर्नाटकमधील कोडुगू जिल्ह्यात गेल्या 28 दिवसांमध्ये एकही कोरोनाची लागण झालेला रुग्ण सापडला नसल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. तसेच 45 जिल्ह्यांत गेल्या 14 दिवसांमध्ये एकही नवा रुग्ण सापडला नसल्याचेही ते म्हणाले.

  12. कोरोनामुळे मृत्यू होण्याचे भारतातले प्रमाण 3.3 टक्के

    कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण एकूण कोरोना रुग्णांच्या 3.3 टक्के असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली. 0 ते 45 वयोगटात 14.4 टक्के रुग्णांचा मृत्यू, 45 ते 60 वयोगटात 10.3 टक्के मृत्यू, 60 ते 75 वयोगटात 33.1 टक्के मृत्यू तर 75 वर्षांच्या पुढील रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण 42.2 टक्के इतकं आहे, असं अगरवाल यांनी सांगितलं.

  13. देशांतर्गत ठराविक मार्गांसाठी एअर इंडियाचे बुकिंग सुरु

    1 जून 2020 च्या पुढे ठराविक देशांतर्गत मार्गांसाठी एअर इंडियाने बुकिंग सुरु केल्याची बातमी एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

  14. देशात 1992 रुग्ण झाले बरे

    भारतात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 14378 वर पोहोचली आहे, त्यापैकी 1992 रुग्ण बरे झाले तर कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 480 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी दिली.

  15. कुमारस्वामी यांच्या मुलाच्या विवाहाबद्दल चर्चा करण्याची गरज नाही- येडीयुरप्पा

    एच. डी. कुमारस्वामी यांच्या मुलाचा विवाह लॉकडाऊनच्या काळात थाटामाटात पार पडल्यानंतर सर्व स्तरांतून टीका होत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी यावर चर्चा करण्याची गरज नाही असे सांगितले. हा विवाह साध्या पद्धतीने पार पडला असेही त्यांनी

  16. आरोग्य मंत्रालयाची पत्रकार परिषद सुरु

  17. आदेशांच्या काटेकोर पालनाच्या अटींवर काही बाबींना 20 एप्रिलपासून अंशतः परवानगी – अजित पवार

    लॉकडाऊनच्या काळात रेल्वे, मेट्रो,सार्वजनिक वाहतूक, सण,उत्सव, जाहीर कार्यक्रमासारखे बहुतांश व्यवहार बंदच राहतील, पण कोरोना व्हायरसशी संबंधितसंदर्भातील मार्गदर्शक नियमावली, आदेशांचे काटेकोर पालन करण्याच्या अटींवर काही बाबींना 20 एप्रिलपासून मर्यादित स्वरुपात परवानगी देण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

  18. मराठवाडा, खानदेशात कापूस खरेदीला सुरुवात होणार

  19. महाराष्ट्रात सोमवारपासून कापूस खरेदी सुरू

    महाराष्ट्रातील कापूस खरेदी केंद्रांमध्ये २० एप्रिलपासून कापूस खरेदी सुरू होणार आहे. लॉकडाऊनच्या सूचनांचं पालन करून कापूस खरेदीचे व्यवहार होतील, अशी माहिती सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.

  20. बांधकाम कामगारांना दोन हजार रुपयांची आर्थिक मदत, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांची माहिती

    कोरोना व्हायरसमुळे सरकारने लॉकडाऊन केल्यानंतर बांधकाम कामगार संकटात सापडले आहेत. त्यामुळे शासनाकडे नोंदणीकृत सक्रीय बांधकाम कामगारांना दोन हजार रुपयांची आर्थिक मदत थेट बँक खात्यात DBT पद्धतीने जमा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कामगार मंत्री व संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील 12 लाखापेक्षा जास्त बांधकाम कामगारांना याचा लाभ मिळेल, अशी माहिती कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे.