लॉकडाऊनसंदर्भात राज्य सरकारची नवी नियमावली

कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स

लाईव्ह कव्हरेज

  1. ब्रिटनमध्ये तीन आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढवला

    ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डोमनिक राब यांनी देशात अजून किमान तीन आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा केली आहे.

    गुरुवारी (17 एप्रिल) झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राब यांनी सांगितलं, की लॉकडाऊनचे निर्बंध शिथील केले, तर आरोग्य व्यवस्था आणि अर्थव्यवस्थेलाही मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

    सध्या पंतप्रधानपदाचीही जबाबदारी सांभाळत असलेल्या डोमिनिक राब यांनी स्पष्ट केलं, की पाच गोष्टींसंदर्भात सरकारची खात्री पटल्यावरच लॉकडाऊन हटविण्यात येईल.

    या पाच गोष्टी पुढीलप्रमाणे-

    1. राष्ट्रीय आरोग्य यंत्रणा संपूर्ण देशाला आवश्यक त्या आरोग्य सुविधा देण्यासाठी सक्षम आहे.

    2. कोरोनामुळे रोज होणाऱ्या मृत्यूंमध्ये घट झालीये.

    3. संसर्गाचं प्रमाण कमी झालंय.

    4. आवश्यक टेस्टिंग किट आणि पीपीई इक्विपमेंटचा पुरेसा साठा आहे.

    5. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या व्हायरसचा प्रादूर्भाव पुन्हा होणार नाही. ब्रि

    कोरोना

    फोटो स्रोत, Getty Images

  2. लॉकडाऊनमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांना रस्त्यावर बसण्याची शिक्षा

    लॉकडाऊन असतानाही बाहेर फिरणाऱ्या लोकांना पुणे पोलिसांनी चक्क रस्त्यावर बसवून ठेवलं. स्वारगेट परिसरात 200 हून अधिक जणांना गुरूवारी (16 एप्रिल) लॉकडाऊनचे नियम मोडल्याबद्दल रस्त्यावर चार तास बसवून ठेवलं गेलं.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  3. कोरोनाविषयीच्या महत्त्वाच्या घडामोडी

    सुप्रभात, बीबीसी मराठीच्या लाइव्ह पेजमध्ये स्वागत. कोरोनाविषयीच्या दिवसभरातल्या सर्व घडामोडी तुम्ही इथं एका क्लिकवर जाणून घेऊ शकता.

    आजच्या लाइव्हपेजला सुरुवात करताना सर्वात आधी काल घडलेल्या घटनांचा थोडक्यात आढावा-

    • मालेगावमध्ये आता एकूण 47 रुग्ण. नाशिक जिल्ह्याचा आकडा 55वर.
    • भारत हायड्रॉक्सिक्लोरोक्विनचा पुरवठा एकूण 55 देशांना करत आहे. यामध्ये अमेरिकेसह युके, फ्रान्स, रशिया अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि इतर देशांचा समावेश आहे.
    • 20 एप्रिलपासून लॉकडाऊन काही प्रमाणात, केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार शिथिल करण्यात येईल मात्र कोणत्याही प्रकारे लोकांनी एकत्र येणे, धार्मिक कार्यक्रम, शाळा-कॉलेज यांना परवानगी नसेल असंही ते म्हणाले.राजेश टोपे
    • महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 3100 झाली आहे. 300 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 194 जणांचा मृत्यू झाला आहे.
    • तबलिगी जमातप्रमुख मौलाना साद यांच्या 4 नातेवाईकांविरुद्ध उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अखिलेश सिंग यांनी दिली आहे.
    • कर्नाटक राज्यातील कोराना व्हायरस ग्रस्तांची संख्या 315 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 36 रुग्ण वाढले.गोव्यात मात्र गुरूवारी (16 एप्रिल) कोरोना व्हायरसची लागण झालेल्या एकाही नव्या रुग्णाची नोंद झाली नाही.

    अधिक माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा.

    कोरोना

    फोटो स्रोत, Getty Images