लक्षणं दिसताच ताबडतोब रुग्णालयात दाखल व्हावं- राजेश टोपे

कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स

लाईव्ह कव्हरेज

  1. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 8,159 नवे कोरोना रुग्ण, 165 जणांचा मृत्यू

  2. कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या

  3. क्वारंटाईन, आयसोलेशन, विलगीकरण, अलगीकरण म्हणजे नेमकं काय?

  4. प्लाझ्मा थेरपीचा कोरोनाग्रस्तांना फायदा नाही - एम्स हॉस्पिटल

  5. आरोग्य सेतू अॅप सर्वांसाठी सक्तीचं आहे का?

  6. ... तर लॉकडाऊन उठवल्यानंतर परिस्थिती पुन्हा गंभीर होईल-राहुल गांधी

  7. मालेगावात नवे 7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

    मालेगावमध्ये आता एकूण 47 रुग्ण. नाशिक जिल्ह्याचा आकडा 55वर.

  8. कोव्हिड आजारातून बरं झाल्यावर भेदभावाविरोधातला आवाज बनली दक्षिण आफ्रिकेतील तरुणी

    कोरोना व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीसोबत भेदभाव होत असेल तर तेही विषाणूसारखंच आहे असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं होतं. आता दक्षिण आफ्रिकेतून भेदभावाची काही उदाहरणं समोर येतायत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आजारासोबतच शेजारी आणि समाजातून केला जाणारा छळ अशा दुहेरी संकटाला तोंड देत आहेत. बीबीसीच्या दक्षिण आफ्रिका प्रतिनिधी नोम्सा मासेको यांचा हा रिपोर्ट

    व्हीडिओ कॅप्शन, कोव्हिड आजारातून बरं झाल्यावर भेदभावाविरोधात लढणारी दक्षिण आफ्रिकेतील तरुणी
  9. कोरोनाच्या काळात नियमांचं पालन करत कसे रंगले लग्न सोहळे?

    सध्या सोशल डिस्टन्सिंग अत्यावश्यक झालं आहे. त्यामुळे सगळीकडे लग्न आणि इतर कार्यक्रम रद्द होत आहेत. अशावेळी आंध्रप्रदेशमध्ये मागच्या आठवड्यात काही लग्न पार पडली. पण, घाबरू नका सगळे नियम पाळून आणि खबरदारी घेऊन हे सोहळे झाले. त्यासाठी काय विशेष तयारी केली होती. आणि कसे झाले हे सोहळ याविषयीचा हा रिपोर्ट...

    व्हीडिओ कॅप्शन, इथं कोरोनाच्या काळात नियमांचं पालन करत कसे रंगले लग्न सोहळे
  10. आमचे हॉस्पिटल सील झाले, आता डायलिसिससाठी आम्ही जावं कुठे?

  11. 55 देशांना भारताकडून हायड्रॉक्सिक्लोरोक्विनचा पुरवठा

    भारत हायड्रॉक्सिक्लोरोक्विनचा पुरवठा एकूण 55 देशांना करत आहे. यामध्ये अमेरिकेसह युके, फ्रान्स, रशिया अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि इतर देशांचा समावेश आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  12. नागपुरात आतापर्यंत 24 लाख जणांचं सर्वेक्षण

    कोरोना व्हायरसच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेच्या वतीने सर्वेक्षण करण्यात येत आहे.

    आतापर्यंत 24 लाख नागरिकांचं आरोग्यविषयक सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलं आहे. या सर्वेक्षणात सुमारे 5 लाख 70 हजार घरांतील माहिती गोळा करण्यात आली आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  13. लॉकडाऊनचा नियम मोडणाऱ्यांना शिक्षा

  14. 'मी घरी थांबणार, कोरोनाला हरवणार' या ब्रीदवाक्याशिवाय पर्य़ाय नाही

    'मी घरी थांबणार, कोरोनाला हरवणार' या ब्रीदवाक्याशिवाय पर्य़ाय नाही, असं मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले. 20 एप्रिलपासून लॉकडाऊन काही प्रमाणात, केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार शिथिल करण्यात येईल मात्र कोणत्याही प्रकारे लोकांनी एकत्र येणे, धार्मिक कार्यक्रम, शाळा-कॉलेज यांना परवानगी नसेल असंही ते म्हणाले.

  15. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 3100 झाली आहे- राजेश टोपे

    महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 3100 झाली आहे. 300 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 194 जणांचा मृत्यू झाला आहे. लक्षणं आढळलेल्या लोकांनी घाबरून जाऊ नये असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

  16. प्लाझ्मा थेरपीसाठी प्रयत्न सुरु आहेत- राजेश टोपे

    कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीसाठी आयसीएमआरकडे परवानगी मागितलेली आहे असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

  17. प्रत्येक मृत्यू झालेल्या व्यक्तीचं ऑडीट होणार

    रुग्णालयात दाखल झाल्यापासून, उपचारांचं तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांचं ऑडीट होणार आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

  18. लक्षणं दिसताच ताबडतोब रुग्णालयात दाखल व्हावं- राजेश टोपे

    कोरोनाचे रुग्ण, लक्षणं आढळलेल्या रुग्णांनी घाबरुन जाऊ नये. कोरोनाबद्दलची माहिती घेणं आवश्यक आहे. सहा महिन्यांचं बाळ, 83 वर्षांचे वृद्धही यातून बाहेर पडलेले आहेत. लक्षणं दिसताच ताबडतोब दवाखान्यात दाखल झालं पाहिजे.

  19. तबलिगी जमातप्रमुख मौलाना साद यांच्या 4 नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल

    तबलिगी जमातप्रमुख मौलाना साद यांच्या 4 नातेवाईकांविरुद्ध उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अखिलेश सिंग यांनी दिली आहे.

    1 मार्चनंतर मर्कजमध्ये सहभागी झाले असल्यास तुमची ओळख लपवू नका, असं आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात आलं होतं. पण या 4 जणांनी मर्कजमध्ये सहभागी झाल्याची माहिती लपवली होती, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  20. स्थलांतरित मजूर आक्रमक का झालेत?