मुंबईत आता मृतांचा आकडा 101, एकूण रुग्णांची संख्या 1,703
कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स
लाईव्ह कव्हरेज
कोव्हिड मृत्यूंचं महाराष्ट्र सरकार ऑडिट करणार
कोव्हिड मृत्यूंचं महाराष्ट्र सरकार ऑडिट करणार आहे. ही जबाबदारी आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. अर्चना पाटील यांच्यावर देण्यात आलीय.
कोव्हिडमुळे मृत्यू कसे झाले? त्याची कारणं? विभागवार आकडेवारी, रुग्णालयात दाखल झाल्यापासून किती दिवसात मृत्यू, कोव्हिड रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यापासूनची मृत्यूपर्यंतची माहिती, अशी सर्व माहिती या ऑडिटमध्ये अपेक्षित आहे.
विद्यापीठांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला नाही - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री
कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव पाहता दहावीचा भूगोलाचा पेपर आणि अकरावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या परीक्षाही रद्द झाल्या आहेत, असे संभ्रमाचे वातावरण विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेआहे.
मात्र, विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या कोणत्याही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतलेला नाही, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
परीक्षा कधी, कशा आणि कोणत्या कालावधी मध्ये घ्याच्या यासाठी कुलगुरूंची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अहवाल आल्यानंतर राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव याचा विचार करून पुढील निर्णय घेण्यात येईल. तसेच या संबंधित समितीने केलेल्या शिफारशी राज्यपाल महोदयांकडे गेल्यानंतर त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.
बोरीस जॉन्सन आता कोरोनामुक्त
यूकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची कोरोना व्हायरसची चाचणी निगेटिव्ह आलीय.
जॉन्सन हे आता चेकर्स या त्यांच्या शासकीय निवासस्थानी असून, ते बरे होत आहेत, अशी माहिती यूके सरकारच्या प्रवक्त्यांनी दिली.
'नंबर 10' या निवासस्थानाऐवजी जॉन्सन शासकीय निवासस्थानी का आहेत, असं विचारल्यावर प्रवक्त्यांनी सांगितलं, "ते ठिकाण त्यांच्यासाठी योग्य आहे"
बोरिस जॉन्सन त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष देत आहेत. त्यामुळं सरकारी कामं सध्या ते पाहत नाहीत, अशीही माहिती प्रवक्त्यांनी दिली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
'या' देशामध्ये आढळला नाही कोरोनाचा एकही रुग्ण
शेतमालाच्या वाहतुकीसाठी केंद्र सरकार सरसावलं
शेतमालाची वाहतूक व्हावी म्हणून आंतरराज्यीय समन्वयासाठी कॉल सेंटर सुरु करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय.
फोटो स्रोत, Twitter/PTI
विषाणूची लागण झाल्याचं लपवल्यास कारवाई
कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती असूनही 'मुद्दामहून' विषाणू पसरवताना कुणी सापडलं, तर त्यांच्याविरोधात कारवाई करा, असे आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
कोरोनाला आळा घातला, या चीनच्या दाव्यावर खरंच भरवसा करायचा का?
भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या 9325 वर पोहोचली
भारतातील कोरोनाची आताची स्थिती :
एकूण रुग्ण - 9352
बरे झालेले रुग्ण - 980
मृत्यू - 324
(केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं ही आकडेवारी दिली.)
अफवा पसरवणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र सायबर विभागाची कारवाई
कोरोना व्हायरसबाबत खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांविरोधात महाराष्ट्राच्या सायबर विभागानं कारवाई करण्यास सुरुवात केलीय.
लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून म्हणजे 22 मार्चपासून सोशल मीडियावर अफवा पसरवणे, खोट्या बातम्या पसरवणे आणि द्वेष निर्माण करणारी भाषणं केल्याप्रकरणी महाराष्ट्रात 183 गुन्हे दाखल झाले आहेत.
37 आरोपींना अटक करण्यात आलंय, तर 114 जणांची ओळख पटलीय.
या दाखल गुन्ह्यांमधील 83 प्रकरणं द्वेष निर्माण करणाऱ्या भाषणांबद्दलच आहेत.
महाराष्ट्र सायबर विभागाचे एसपी डॉ. बालसिंग राजपूत यांनी ही माहिती दिली.
कोरोना संकटानंतर अर्थव्यवस्था मुसंडी मारेल, असं टाटा खरंच म्हणालेत?
रशियात गेल्या 24 तासात 2550 रुग्ण आढळले
रशियामध्ये गेल्या 24 तासात कोरोना व्हायरसचे 2550 रुग्ण आढळले. रशियात एका दिवसात झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे.
युरोपियन देशांच्या तुलनेत रशियामध्ये कोरोनाचे कमी रुग्ण आढळले असले, तरी रशियन सरकारनं खबरदारीसाठी मोठी पावलं उचलली आहेत. अनेक प्रांतांमध्ये पूर्ण लॉकडाऊन केलंय.
फोटो स्रोत, AFP
सोनिया गांधींचं नरेंद्र मोदींना पत्र
लॉकडाऊनचा परिणाम झालेल्या लोकांच्या अन्नसुरक्षेबाबत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
व्हिसाच्या मुदतीत 30 एप्रिलपर्यंत वाढ
लॉकडाऊनमुळे भारतात अडकलेल्यांचे नियमित व्हिसा, परदेशी नागरिकांसाठीचे ई-व्हिसा 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आले - केंद्रीय गृहमंत्रालय
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
लॉकडाऊनचा फटका बसलेल्यांना केंद्राकडून आतापर्यंत 28,256 कोटी रुपयांची मदत
लॉकडाऊनचा
फटका बसलेल्यांना केंद्राकडून आतापर्यंत 28,256 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे, अशी माहिती लव अग्रवाल यांनी दिली.
19.86 कोटी जनधन योजनेतील महिला खातेधारकांना 9930 कोटी
रुपये
6.93 कोटी शेतकऱ्यांना 13855 कोटी
रुपये
2.82 कोटी विधवा,
ज्येष्ठ आणि विकलांग
नागरिक 1405 कोटी
बांधकाम मजुरांना 2.16 कोटी 3046 कोटी रुपये
गेल्या 24 तासात 796 नवे रुग्ण, 35 मृत्यू
आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त
सचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार...
भारतात आतापर्यंत 9,152 पॉझिटिव्ह रुग्ण, 308 मृत्यू तर 857 लोक बरे झाले आहेत
गेल्या 24 तासात 796 नवे रुग्ण, 35 मृत्यू तर एकाच दिवसात 141 केसेस बऱ्या झाल्या आहेत.
गेल्या 14 दिवसात
15 राज्यातील 25 जिल्ह्यात नवा रुग्ण सापडला नाही – यात महाराष्ट्रातील गोंदियाचाही
समावेश.
प्रयत्न हाच असेल की या जिल्ह्यांमध्ये एकही नवा रुग्ण आढळणार नाही. यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे
एनएसएस, एसीसी, रेड क्रॉस, स्वयंरोजगार क्षेत्रातल्या महिला इत्यादींची मदत सरकार घेतंय
ICMR प्रमुख गंगाखेडकर यांनी सांगितलं की...
कालपर्यंत भारतात
2 लाख 212 टेस्ट झाल्या आहेत. भारताकडे चाचणीसाठी असलेल्या साधनांमधून सहा आठवडे सहज
टेस्टिंग होऊ शकतील, त्यामुळं आपल्याला घाबरण्याची
गरज नाही.
वेगवेगळ्या ठिकाणी
नव्या प्रयोगशाळा, प्रशिक्षण संस्था, चाचण्या इत्यादींसाठी 14 मेंटॉर इन्स्टिट्युट तयार
करण्यात आल्यात -
केंद्र सरकारची पत्रकार परिषद सुरू
केंद्र सरकारची दैनंदिन स्थिती सांगणारी पत्रकार परिषद सुरू झाली आहे. यात केंद्रीय गृहमंत्रालय, आरोग्य मंत्रालय आणि ICMRचे प्रतिनिधी माहिती देत आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.
YouTube पोस्ट समाप्त
मध्य प्रदेशात आणखी एक IAS अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह
मध्य
प्रदेशात आणखी एक IAS अधिकारी
कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं कोरोनाग्रस्त IAS अधिकाऱ्यांची
संख्या 4 वर
पोहोचलीय.
संपूर्ण
मध्य प्रदेश राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 542 वर पोहोचली आहे.
फोटो स्रोत, Shuraih Niyazi/ BBC
15 एप्रिलपासून APMC मधील कांदा, बटाटा मार्केट उघडणार
मुंबईतील
कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील (APMC) कांदा, बटाटा मार्केट 15 एप्रिलपासून उघडले जातील. मात्र, फक्त 100 ट्रक आणि खरेदी करण्यासाठी 300
व्यक्तींनाच आत येण्यास
परवानगी दिली जाईल. 1200 टन मालाची विक्री केली जाईल. एपीएमसीचे
सभासद अशोक वाळुंज यांनी ही माहिती दिली.
दक्षिण आशियाचा आर्थिक विकास घसरण्याचा जागतिक बँकेचा इशारा
गेल्या
40 वर्षातील सर्वात बिकट आर्थिक स्थितीला दक्षिण आशियाला तोंड
द्यावा लागेल, असा इशारा जागितक बँकेनं दिलाय. गेल्या अनेक दशकांपासून दक्षिण
आशिया गरिबीविरोधात लढतेय, त्यावरही या स्थितीचा परिणाम होईल.
भारत,
बांगलादेश, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांमध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये
आता आता वाढ व्हायला लागलीय. मात्र, हे देश कोरोना व्हायरसचे पुढचे हॉटस्पॉट
असतील, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केलीय.
दक्षिण
आशियाची लोकसंख्या जवळपास 180 कोटींच्या घरात आहे. जगातील
सर्वाधिक लोकसंख्येची शहरं सुद्धा दक्षिण आशियात आहेत.
“कोरोनाच्या या वादळात
दक्षिण आशिया सापडलीय. पर्यटन क्षेत्र पूर्णपणे ठप्प पडलंय, पुरवठा साखळी
कोलमडलीय, कपड्यांची मागणी थांबलीय आणि ग्राहकांसह गुंतवणूकदारांची स्थिती बिगडत
चाललीय,” असं जागतिक बँकेच्या अहवालात म्हटलंय.
दक्षिण आशियाचा या वर्षीचा
विकासदर 6.3 असेल, असा अंदाज बांधण्यात येत होता. मात्र, तो आताच 1.8 ते 2.8 वर आलाय. दक्षिण आशियातल्या निम्म्या
देशांवर मंदीचं संकट कोसळेल.
सगळ्यात
मोठा मलेशिया देशाला बसण्याची शक्यता जागतिक बँकेनं वर्तवलीय.
फोटो स्रोत, Getty Images
14 एप्रिलला पंतप्रधान मोदी देशाला उद्देशून भाषण करणार
भारताचे
पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 एप्रिलला सकाळी 10 वाजता देशाला उद्देशून भाषण करणार आहेत. पंतप्रधान
कार्यालयाच्या ट्विटर हँडलवरून यासंदर्भात माहिती देण्यात आलीय.