You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

महाराष्ट्रातील आज 221 नवे रुग्ण, एकूण आकडा 1982 वर

कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स

लाईव्ह कव्हरेज

  1. लक्षणं नसताना कोरोना पॉझिटिव्ह

    "मुंबईतल्या आमच्या हॉटेलांमधील साधारणत: 500 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. चाचणी पॉझिटिव्ह आढळलेल्या बहुतांशी कर्मचाऱ्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणं जाणवली नव्हती. पॉझिटिव्ह आढळलेल्या कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटीन करण्यात आलं आहे", असं इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडनं म्हटलं आहे.

  2. त्रिपुरातल्या अगरतळा येथे भाजी मार्केटमध्ये मोठी गर्दी

    त्रिपुरातील अगरतळा येथील भाजी मार्केटमध्ये लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. याच भागात कोरोना व्हायरसचे दोन रुग्ण आढळल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिली.

  3. कोरोनाचा प्रसार रोखणारा 'इस्लामपूर पॅटर्न' काय आहे?

    'इस्लामपूर पॅटर्न' नेमका काय आहे ते जाणून घेण्यासाठी सांगलीचे पालकमंत्री आणि इस्लामपूरचे आमदार जयंत पाटील यांच्याशी बीबीसी मराठीचे प्रतिनिधी नीलेश धोत्रे यांनी स्काईपवरून चर्चा केली.

  4. कोल्हापुरात 33 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

    कोल्हापुरात 33 जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. चार जणांचे अहवाल येणं बाकी आहे. शनिवारी चाचणी घेण्यात आली होती. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 6 आहे.

  5. गुजरातमध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 493 वर पोहोचली

    गुजरातमध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 25 ने वाढून, 493 वर पोहोचलीय. नव्यानं वाढलेल्या रुग्णांमधील 23 जण एकट्या अहमदाबादेतील आहेत. गुजरातच्या आरोग्य मंत्रालयानं ही आकडेवारी जाहीर केलीय.

  6. तामिळनाडूत मजुरांचा मोर्चा

    जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी पुरेसे पैसे नसल्याचं सांगत तामिळनाडूमधील मदुराई इथल्या यागप्पा नगर एमजीआर रस्ता इथं मजुरांनी मोर्चा काढला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. एमजीआर रस्ता परिसराला कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलं आहे.

  7. भोपाळच्या डॉक्टरांनी कारमध्येच राहाण्याचा निर्णय का घेतला?

  8. मध्य प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या पाचशेच्या पलीकडे

    शुरैह नियाजी,

    भोपाळहून, बीबीसी हिंदीसाठी

    मध्य प्रदेशात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 518 झाली आहे.

    शनिवारी एक आयएएस अधिकारी आणि त्यांच्या मुलाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं. कोरोनाचा संसर्ग होणारे ते तिसरे आयएएस अधिकारी आहेत.

    भोपाळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 133 झाली आहे.

    इंदूरमध्ये गेल्या 24 तासात कोरोना रुग्णांची संख्या 49 झाली आहे. मध्य प्रदेशातील 20 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

    राज्यातील कोरोनाचं वाढतं संक्रमण प्रशासनासाठी आव्हानात्मक ठरत आहे. मध्य प्रदेशात प्रशासनाची कमान नवनियुक्त मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे आहे. मंत्रिमंडळात एकाही मंत्र्याला समाविष्ट करण्यात आलेलं नाही.

    आरोग्य विभागातील 50 कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

  9. भारतात स्थिती सुधारत नाही तोपर्यंत नेपाळमध्येही लॉकडाऊन

    भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत नाही तोपर्यंत लॉकडाऊन रद्द करण्याचा विचार करू शकत नाही असं नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी म्हटलं आहे.

    शनिवारी ओली यांनी नेपाळमधील विविध प्रांतांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. नेपाळमध्ये कोरोनाचे 9 रुग्ण आढळले असून, 8 जणांवर उपचार सुरू आहेत.

  10. 22,073 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना-WHO

    कोरोनाविरुद्धच्या लढाईत रुग्णांवर उपचार करणाऱ्या जगभरातील 22,073 आरोग्य कर्मचाऱ्यांना या आजाराचा संसर्ग झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटलं आहे.

    आरोग्य क्षेत्रात कार्यरत विविध स्तरातील व्यक्तींना झालेल्या संक्रमणाची ठोस आकडेवारी काही देशांकडून मिळालेली नाही. त्यामुळे हा आकडा वाढूही शकतो असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.

    वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येक टप्प्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोरोना लढाईत निर्णायक भूमिका आहे. रुग्णांची सेवासुश्रुषा करतानाच आपल्याला या आजाराचा संसर्ग होऊ नये यासाठीही ते सर्वतोपरी काळजी घेत आहेत असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.

  11. राजधानी दिल्लीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या हजारच्या पुढे

    रविवारी सकाळपर्यंत राजधानी दिल्लीतील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या हजारच्या पुढे गेली आहे. दिल्लीत 1,069 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

  12. कोरोनाचं संकट कधी संपेल? - पाहा व्हीडिओ

    दररोज तुम्ही कोरोना व्हायरसविषयक बातम्या पाहत असाल. तेव्हा हे संकट कधी संपेल असा विचार तुमच्या मनात येत असेल.

  13. नागपुरात कोरोना हॉटस्पॉट ठिकाणची दृश्यं

    राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरातील सतरंजपुरा आणि मोमीनुपरा भागात हे भाग कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. या दोन्ही ठिकाणी अत्यंत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या दोन्ही भागांमध्ये नागरिकांच्या जाण्यायेण्यावर कठोर प्रतिबंध आहेत.

  14. महाराष्ट्राचा लॉकडाऊन प्लान - जिल्हे तीन झोन्समध्ये विभागले जाणार

  15. लाॅकडाऊननंतर कोरोनाशी लढण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा प्लॅन काय?

  16. धारावीमध्ये 15 जणांना कोरोनाची लागण

  17. कोरोनानंतरच्या आर्थिक मंदीचा भारत आणि जग कसा सामना करणार?

    पाहा व्हीडिओ-

  18. धारावीत कडेकोट पोलीस बंदोबस्त

    आशिया खंडातील सगळ्यात मोठी लोकवस्ती असं वर्णन होणाऱ्या धारावीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. धारावीत आतापर्यंत 4जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 28 एवढी आहे.

  19. कोरोनाविरुद्ध लढायला गुगल-अॅपल कसे आले एकत्र?

  20. पाकिस्तानातही कोरोनाचं थैमान; 86 जणांचा मृत्यू

    पाकिस्तानमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. विविध उर्दू वृत्तपत्रांनी दिलेल्या बातम्यांनुसार शनिवारी रात्री 12 वाजेपर्यंत पाकिस्तानात कोरोनामुळे 86 जणांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानमध्ये 5,031 लोकांना याची लागण झाली आहे. 786 जण बरेही झाले आहेत. दरम्यान कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी पुरेशी साधनसामग्री नसल्याचं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटलं आहे.