You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

महाराष्ट्रात कोरोनाचे 120 नवीन रुग्ण, एकूण 868 कोरोनाबाधित

पाहा कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स एकाच ठिकाणी...

लाईव्ह कव्हरेज

बोरिस जॉन्सन रुग्णालयात दाखल

इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तापासह काही लक्षण कायम राहिल्यामुळे त्यांना रविवारी संध्याकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या पंतप्रधानपदाचा भार त्यांच्याकडेच असला तरी आज होणाऱ्या कोरोना व्हायरसविषयक बैठकीचे अध्यक्षपद परराष्ट्रमंत्री सांभाळणार आहेत.

बोरिस जॉन्सन यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल केल्याचे 10 डाऊनिंग स्ट्रिटच्या प्रतिनिधीने सांगितलं आहे.