पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाजपा स्थापना दिनी कार्यकर्त्यांशी संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप स्थापना दिनानिमित्त कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. कोरोनाविरोधात भारताने उचललेल्या पावलांबद्दल ते बोलत आहेत.
You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाहा कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स एकाच ठिकाणी...
पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप स्थापना दिनानिमित्त कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. कोरोनाविरोधात भारताने उचललेल्या पावलांबद्दल ते बोलत आहेत.
दिल्लीमध्ये तबलीगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी देण्याची गरज नव्हती असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. महाराष्ट्रात अशाच एका कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी परवनगी नाकारल्याचा उल्लेखही त्यांनी फेसबूक लाईव्हमध्ये केला.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर वाशी एपीएमसी पूर्ण बंद ठेवणं योग्य होणार नाही परंतु योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे- शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
आर्थिक स्थिती आणि शेतीची स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारनं राज्याला पॅकेज द्यावे- शरद पवार
संपूर्ण देशाचं अर्थकारण आणि समाजाचं आरोग्य यावर परिणाम झालेले दिसून येतील. या साथीमुळे देशाच्याच नव्हे तर प्रत्येक व्यक्तीच्या अर्थकारणावर परिणाम होईल असे दिसते. रघुराम राजन यांनी रोजगार कमी होण्याचे संकेत दिले आहेत. या संकटाला कसं तोंड द्यायचं याचा विचार तज्ज्ञांनी केला पाहिजे. जाणकार लोकांना एकत्र बोलावून आपण सल्ला घेऊ, महाराष्ट्रात पुढची सहा महिने कशी पावलं टाकायची, बेरोजगारीच्या प्रश्नातून कसं बाहेर पडायचं याचा विचार करु अशी विनंती मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेसबूकवरुन संवाद
विषारी वायूंचे प्रमाण, प्रदूषण कमी झाल्यामुळे नक्की काय होईल?इतिहासातील उदाहरणं काय सांगतात? पाहा व्हीडिओ-
सहावी चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर गायिका कनिका कपूरला लखनौच्या संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमधून घरी सोडण्यात आले आहे,
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये 8 एप्रिलपर्यंत 7 लाख रॅपिड अॅंटिबॉडी टेस्टिंग किट्स उपलब्ध होणार आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना व्हायरसबद्दल नवी आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार भारतात रुग्णांची संख्या 4079 झाली आहे.कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 109 झाली आहे. आतापर्यंत 291 लोक बरे झाले आहेत.
भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिलेल्या सुचनांचे पालन करावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
भाजपा आमदार दादारान केचे यांच्या वाढदिवसानिमित्त रेशन वाटप होत असल्याची कथित बातमी सर्वत्र पसरल्यामुळे त्यांच्या घरासमोर लोकांनी गर्दी केली. त्यामुळे कोरोना व्हायरसचाप्रसार रोखण्यासाठी घातलेल्या निर्बंधांचे उल्लंघन झाल्याची चर्चा सुरु झाली.यावर दादाराव केचे यांनी आपण शुभेच्छांसाठी येऊ नये असे आधीच जाहीर केले होते. विरोधकांनी आपली बदनामी करण्यासाठी षडयंत्र रचून ही अफवा पसरवली अशी आपली बाजू मांडली आहे.
कोरोना व्हायरसचा महाराष्ट्र आणि मुंबईत झालेला प्रसार लक्षात घेऊन आता मंत्रालयात येणारे लोक, कर्मचारी, अधिकारी यांना मास्क वापरणे बंधनकारक असेल. येत्या काही महिन्यांसाठी हा निर्णय लागू असेल. तसेच मास्क न वापरल्यास मंत्रालयात प्रवेश करता येणार नाही.
दिल्लीतील निजामुद्दीन परिसरात झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील अनेक तबलीगी संघटनेतील लोकांचा सहभाग होता. मात्र राज्यातील अनेक लोक आरोग्य तपासणीसाठी पुढे येत नसल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे, त्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या घरी रात्री तबलीगी समाजाच्या नेत्यांची बैठक झाली, या बैठकीत आरोग्य मंत्र्यानी या नेत्यांना समाजातील लोकांनी तपासणीसाठी प्रतिसाद द्यावा आणि अफवा न पसरविण्याबाबत आवाहन करण्यास सांगितले आणि या नेत्यांनीही आवाहन केले आहे.
अमेरिकेत गेल्या 24 तासांमध्ये 1200 लोकांनी कोरोना व्हायरसमुळे प्राण गमावल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
न्यू यॉर्कमधील ब्रॉंक्स झू मधील एका वाघाला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दादरा आणि नगर हवेलीच्या एका व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याला क्वारंटाईनमध्ये ठेवून उपचार सुरु करण्यात आले आहेत.