You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

निकाल: युतीला बहुमत, मात्र 50:50 फॉर्मुल्यावरून रस्सीखेच

महाराष्ट्राचा निकाल युतीच्या बाजूने लागला असला तरी शिवसेना आणि भाजप यांच्यामधील '50:50' भागीदारीवरील रस्सीखेच पुन्हा सुरू झाली आहे.

लाईव्ह कव्हरेज

  1. परळी ते कणकवली: या 5 मतदारसंघांकडे राज्याचं लक्ष

  2. धनंजय मुंडे 24,537 मतांनी आघाडीवर

    मतमोजणीच्या 16व्या फेरीअखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे 24,537 मतांनी आघाडीवर आहेत. भाजपच्या पकंजा मुंडे या पिछाडीवर आहेत.

  3. काँग्रेसनं थोडा अधिक जोर लावला असता तर..., सुहास पळशीकर यांचं विश्लेषण

    या निकालानंतर काँग्रेस संपलं. या चर्चेला आता पूर्णविराम मिळू शकतो. काँग्रेस हा पक्ष धड उठून उभा राहत नाही आणि संपतही नाही, असं चित्र या पक्षाचं आहे.

    काँग्रेसनं 40 जागा कायम राखल्यास या पक्षाचं स्थानिक नेटवर्क कायम आहे, असा त्याचा अर्थ होतो. पण गेली 5 वर्षं राज्यातल्या काँग्रेसची अवस्था अनाथासारखी झाली होती. आता मात्र राज्यातल्या नेते पक्ष वाढू शकतो, ही आशा कार्यकर्त्यांना देऊ शकतात.

    काँग्रेसला ज्या काही जागा मिळतील, त्या फक्त स्थानिक पातळीवरच्या नेटवर्कमुळे मिळतील. काँग्रेसनं थोडा अधिक जोर लावला असता तर कदाचित वेगळं चित्र दिसलं असतं.

  4. नागपूरमध्ये भाजपची 4 जागांवर आघाडी

    1. देवेंद्र फडणवीस - नागपूर दक्षिण- पश्चिम - भाजप – 12,428

    2. विकास ठाकरे – नागपूर पश्चिम - काँग्रेस- 6,185

    3. कृष्णा खोपडे – नागपूर पूर्व – भाजप – 19,684

    4. नितीन राऊत – नागपूर उत्तर - काँग्रेस – 5,000

    5. विकास कुंभारे – नागपूर मध्य - भाजप – 7,701

    6. मोहन मते – नागपूर दक्षिण – भाजप – 3,792

  5. पुण्यातल्या कसबा मतदारसंघात मुक्ता टिळक आघाडीवर

    पुण्यातील कसबा मतदारसंघातून भाजपच्या मुक्ता टिळक यांना पाचव्या फेरीअखेर 30 हजारांचे मताधिक्य मिळाले आहेत. यापूर्वी गिरीष बापट या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते.

  6. रोहिणी खडसे 3 हजार मतांनी पुढे

    मुक्ताईनगर मतदारसंघातून भाजपच्या रोहिणी खडसे 3 हजारांनी पुढे आहेत. भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या त्या कन्या आहेत.

    तिकीट कापलं गेल्यानंतर एकनाथ खडसेंच्या नाराजी नाट्यामुळे मुक्ताई नगर मतदारसंघ चर्चेत आला होता. बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी स्पष्टपणे "होय, मी नाराज आहे, माझ्यावर अन्याय झाला", असं विधान केलं होतं.

  7. 'सेना सत्तेत 50:50 मिळवणार', संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

    ताज्या कलांनुसार भाजपचे आकडे कमी झालेत तर शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे बऱ्यापैकी वाढताना दिसत आहेत.

    त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले की शिवसेना महायुतीत राहणार आणि सत्तेत 50 टक्के मिळवणार.

    फडणवीसच मुख्यमंत्री होतील, ही भाजपची स्पष्ट भूमिका असताना आदित्य ठाकरे हे स्वतः मुख्यमंत्री म्हणून पाहू शकतील का, असं विचारल्यावर संजय राऊत म्हणाले, “आदित्य ठाकरे किंवा ठाकरे परिवार यांना स्वतः कधीच नाही वाटणार की आदित्य मुख्यमंत्री होतील, पण मला वाटतं की प्रत्येक शिवसैनिकाला आणि महाराष्ट्राच्या जनतेला हे वाटतं.”

    CNN-न्यूज 18 वाहिनीशी ते बोलत होते.

  8. हर्षवर्धन पाटील पिछाडीवर

    इंदापूर विधानसभा मतदारसंघात सहाव्या फेरीनंतर हर्षवर्धन पाटील पिछाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दत्तात्रय भरणे यांना 30438, तर भाजपच्या हर्षवर्धन पाटील यांना 27456 मतं मिळाली आहेत. 2982 मतांनी भरणे आघाडीवर आहेत.

  9. कर्जत-जामखेडमध्ये आघाडी मिळाल्यानंतर रोहित पवार यांची पहिली प्रतिक्रिया

    कर्जत-जामखेडमध्ये आघाडी मिळाल्यानंतर रोहित पवार यांची पहिली प्रतिक्रिया

  10. देवेंद्र फडणवीस 11 हजार मतांनी आघाडीवर

    दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 11 हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना

    20,350, तर काँग्रेसच्या आशिष देशमुख यांना 9,216 मतं मिळाली आहेत.

  11. धनंजय मुंडे 18206 मतांनी आघाडीवर

    मतमोजणीच्या अकराव्या फेरीनंतर परळी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे 18206 मतांनी आघाडीवर आहेत. धनंजय मुंडे यांना 56716 तर पंकजा मुंडे यांना 38510 मतं मिळाली आहेत.

  12. उदयनराजे भोसले 30 हजार मतांनी पिछाडीवर

    सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले 30 हजार मतांनी पिछाडीवर आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील निवडणूक लढवत आहेत.

    इथं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भर पावसात साताऱ्यात सभा घेतली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही इथं सभा झाली होती.

    पाहा त्यांच्यासाठी ही लढत कशी होती - वाचा सविस्तर

  13. कोणताही एक पक्ष सत्ता स्थापन करू शकणार नाही?, सुहास पळशीकर सांगतात...

    लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवारांनी दुष्काळासंदर्भात गावोगावी भेटी दिल्या, सरकारवर टीका केली. जिथं जिथं लोकांना राजकीय नेता पर्याय वाटला, तिथं तिथं लोक मतं देऊ शकतात. पण हेही लक्षात घ्यायला हवं की, गेली 5 ते 6 वर्षं भाजप आणि मोदी यांच्या नेतृत्वाला जनतेनं पाठिंबा दिला आहे. तो आजही कायम आहे.

    आताचा ट्रेंड कायम राहिल्यास ना यात भाजपचा विजय झालाय,ना विरोधी पक्ष भाजपला कोंडित पकडू शकले आहेत. राज्याच्या राजकारणाची ही शोकांतिका म्हणावी लागेल की,राज्यातून कोणताही एक पक्ष सत्ता स्थापन करू शकणार नाही.

  14. महाआघाडीबद्दल बोलायचं झालं तर..., सुहास पळशीकर

    सध्याच्या परिस्थितीत सामान्य जनतेला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पर्यायी पक्ष म्हणून दिसले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढूनसुद्धा काँग्रेसची जागा घेईल, असं दिसत नाही.

    सध्या तरी राज्यात राष्ट्रवादी वरचढ आहे, पण 40च्या जवळपास जागा काँग्रेसला मिळाल्या तर गेल्या निवडणुकीत त्यांना तेवढ्याच जागा होत्या. त्यामुळे या दोन पक्षांच्या बाबतीत या निवडणुकीत नाट्यपूर्ण चित्र दिसेल, असं दिसत नाही.

  15. पाहा सुहास पळशीकर यांचं विश्लेषण

    बीबीसी मराठीच्या निवडणूक विशेष कार्यक्रमात आत्ताच्या निकालांवरचं सुहास पळशीकरांचं विश्लेषण काय?

    पाहा इथे - YOUTUBE LIVE

  16. पुणे कॅन्टॉन्मेंट मतदारसंघातील मतमोजणी थांबवली

    पुण्यातल्या कॅन्टॉन्मेंट विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी थांबवण्यात आली आहे. इथं EVM मशीनबाबत आक्षेप घेण्यात आले आहेत.

  17. चंद्रकांत पाटील कोथरूडमध्ये आघाडीवर

    मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीअखेरीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना 10,589 मतं मिळाली आहेत, तर मनसेच्या किशोर शिंदे यांना 4,555 मतं मिळाली आहेत.

    कोथरूड मतदारसंघातली ही लढाई त्यांच्यासाठी किती आव्हानात्मक आहे?

  18. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात 1196 मतांनी आघाडीवर

    संगमनेर विधानसभा मतदार संघात दुसऱ्या फेरीअखेर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात 9239 मतं मिळाली आहेत. ते 1196 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्याविरोधातील साहेबराव नवले सेना यांना 8043 मतं मिळाली आहेत.

  19. चंद्रकांत पाटील कोथरुड मध्ये आघाडीवर

    दुसऱ्या फेरीअखेर चंद्रकांत पाटील यांना 10589 मतं तर मनसेच्या किशोर शिंदे यांना 4555 मतं

  20. येवल्यात छगन भुजबळ आघाडीवर

    येवला मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ आघाडीवर आहेत. त्यांनी शिवसेनेचे संभाजी पवार यांना तगडं आव्हान दिलेलं आहे.

    छगन भुजबळ हे 2004 पासून येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत.

    2014 साली झालेल्या निवडणुकीत या मतदारसंघातून छगन भुजबळ यांना 1 लाख 12 हजार 787 मतं मिळाली. ते 46 हजार 442 मतांच्या फरकांनी जिंकले होते. तेव्हा संभाजी पवार यांना 66 हजार 345 मतं मिळाली होती.