मोदी सरकार: नरेंद्र मोदींची संसदीय दलाच्या नेतेपदी निवड

पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आहेत. निकाल ते सत्तास्थापनेच्या सर्व ताज्या घडामोडी पाहा बीबीसी मराठीच्या या लाईव्ह पेजवर.

लाईव्ह कव्हरेज

  1. मिलिंद देवरा पिछाडीवर

    मुंबई दक्षिणमधून मिलिंद देवरा पिछाडीवर आहेत. त्यांना 4244 मतं मिळाली आहेत. तर अरविंद सावंत यांना 9578 मतं मिळाली आहेत.

  2. आंध्र प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत YSR काँग्रेसला 35 जागांवर आघाडी

    आंध्र प्रदेशात YSR काँग्रेसनं 35 जागांवर आघाडी घेतली आहे. तेलगू देसम पार्टीने 6 जागांवर आघाडी घेतली आहे.

    या विधानसभेत एकूण 175 जागा आहेत.

  3. वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 हजार मतांनी आघाडीवर

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमध्ये 20 हजार मतांची आघाडी घेतली असून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी गांधीनगर मतदारसंघात 50 हजार मतांनी आघाडी घेतली आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  4. बुलडाण्यात प्रतापराव जाधव 3826 मतांनी आघाडीवर

    बुलडाण्यात शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांनी 3826 मतांनी आघाडी घेतली आहे. तर हिंगोलीमध्ये शिवसेनेचे हेमंत पाटील आघाडीवर आहेत.

  5. शिरुरमध्ये अमोल कोल्हे आघाडीवर

    शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे आघाडीवर आहेत. त्यांना 59,030 तर आढळराव पाटील यांना 43,994 मते मिळाली आहेत.

  6. धुळे मतदारसंघात सुभाष भामरे पिछाडीवर

    सुरुवातीच्या मतमोजणीत भाजपचे सुभाष भामरे पिछाडीवर असल्याचे दिसत असून काँग्रेसच्या कुणाल पाटील यांनी आघाडी घेतली आहे.

  7. सांगलीमध्ये संजयकाका पाटील आघाडीवर

    सांगली मतदारसंघात भाजपाच्या संजयकाका पाटील यांनी आघाडी घेतली आहे.

    संजय पाटील यांना 10,372 मते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विशाल पाटील यांना 6251 मते तर वंचित बहुजन आघाडीच्या गोपीचंद पाडळकर यांना 8339 मते मिळाली आहेत.

  8. नंदुरबारमध्ये काँग्रेसचे के. सी. पडवी आघाडीवर

    नंदुुरबारमध्ये काँग्रेसच्या के. सी पडवी यांना 33125 मते तर भाजपच्या हीना गावित यांना 27027 मते मिळाली आहेत.

    पडवी यांनी 6,098 मतांनी आघाडी घेतली आहे.

  9. ब्रेकिंग, निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार भाजपची 250 जागांवर आघाडी

    निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार भाजपने 250 जागांवर आघाडी घेतली आहे तर काँग्रेसने 56 जागांवर आघाडी घेतली आहे.

  10. औरंगाबादमध्ये इम्तियाज जलील आघाडीवर

    औरंगाबादमध्ये एमआयएम आणि बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील आघाडीवर आहेत.

  11. चंद्रपूरमध्ये हंसराज अहिर आघाडीवर

    पहिल्या फेरीच्या मतमोजणीत भाजपच्या हंसराज अहिर यांनी आघाडी घेतली असून त्यांना 5221 मते तर काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांना 2328 मते मिळाली आहेत.

  12. बुलडाण्यात प्रतापराव जाधव, भंडारा-गोंदियात सुनील मेंढे यांची आघाडी

    बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे प्रतापराव जाधव आणि भंडारा गोंदियात भाजपचे सुनील मेंढे यांनी आघाडी घेतली आहे.

  13. दिंडोरीमध्ये भाजपाच्या भारती पवार आघाडीवर

    दिंडोरी मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार भारती पवार 11800 मतांनी पुढे आहेत.

  14. सेन्सेक्सची 869 अंशांची उसळी, सेन्सेक्स 40,000 च्या पुढे

    भाजपने आघाडी घेतल्यानंतर (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) सेन्सेक्सने 600 अंशांने उसळी मारली आहे. कालच्या सत्रात सेन्सेक्स 39,110 अंकांवर बंद झाला होता आणि आज तो 39,591 अंशांवर उघडला. सध्या सेन्सेक्स 40,009 वर सुरू आहे.

    सेन्सेक्स

    फोटो स्रोत, Screengrab

  15. बीडमध्ये प्रीतम मुंडे आघाडीवर

    बीडमध्ये भाजपच्या प्रीतम मुंडे आघाडीवर आहेत.

  16. मावळमध्ये पार्थ पवार 4 हजार मतांनी पिछाडीवर

    मावळ मतदारसंघात पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्थ पवार यांना 23 हजार 236 मते तर शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांना 27 हजार 427 मते मिळाली आहेत.

  17. बेगूसरायमध्ये कन्हैयाकुमार पिछाडीवर

    बिहारमधील बेगूसराय मतदारसंघात भाजपाच्या गिरिराज सिंह यांनी आघाडी घेतली असून कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे कन्हैया कुमार पिछाडीवर आहेत.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  18. ब्रेकिंगः भाजपची 206 जागांवर आघाडी

    निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार भाजपने 206 जागांवर आघाडी घेतली असून काँग्रेसने 55 जागांवर आघाडी घेतली आहे.

  19. बारामतीत सुप्रिया सुळे आणि कांचन कुल यांच्यात अटीतटीची लढत

    बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांना 32,164 तर भाजपच्या 32,164 मते मिळाली आहे. सुरुवातीच्या या मतमोजणीत दोन्ही उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत होत असल्याचे दिसून येत आहे.

  20. मावळमध्ये पार्थ पवार पिछाडीवर

    मावळ मतदारसंघात विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आघाडीवर आहेत. त्यांना 75,037 मतं मिळाली आहेत. तर पार्थ पवार यांना आतापर्यंत 62,868 मतं मिळाली आहेत.