मोदी सरकार: नरेंद्र मोदींची संसदीय दलाच्या नेतेपदी निवड

पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आहेत. निकाल ते सत्तास्थापनेच्या सर्व ताज्या घडामोडी पाहा बीबीसी मराठीच्या या लाईव्ह पेजवर.

लाईव्ह कव्हरेज

  1. माढा लोकसभा निकाल : रणजितसिंह नाईक निंबाळकर की संजय शिंदे कोण जिंकणार?

  2. नागपूर लोकसभा निकाल : नितीन गडकरी की नाना पटोले - कोण बाजी मारणार?

  3. सोलापूर लोकसभा निकाल : जयसिद्धेश्वर स्वामी आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यात लढत - कोण जिंकणार?

  4. बीड लोकसभा निकाल : प्रीतम मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे - कोण जिंकणार?

  5. सनी देओल, मनिष तेवारी, हरसिम्रत कौर बादल आघाडीवर

    पंजाबमधील गुरुदासपूर मतदारसंघात भाजपाचे सनी देओल, आनंदपूर साहिब मतदारसंघात काँग्रेसचे मनिष तेवारी, अमृतसरमध्ये गुरजित सिंह, भटिंडामधून शिरोमणी अकाली दलाच्या हरसिम्रत कौर बादल आघाडीवर आहेत.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  6. सकाळी 9.15 पर्यंतः NDA ची 144 जागांवर आघाडी

    देशाची आकडेवारी
  7. नागपूरमध्ये नितीन गडकरींची 3977 मतांनी आघाडी, दोन टेबलवरील मोजणी थांबवली

    काँग्रेसने आक्षेप घेतल्यामुळे नागपूरमधील नागपूर पूर्वच्या टेबल नं 11 आणि नागपूर दक्षिणच्या टेबल नं 3 वरील मतमोजणी थांबवण्यात आली आहे. पहिल्या फेरीत नितीन गडकरी 8104 तर नाना पटोले यांना 4128 मते मिळाली आहेत.

  8. अमरावतीत आनंदराव अडसूळ आघाडीवर, नवनीत राणे मागे

    अमरावती मतदारसंघात शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांनी आघाडी घेतली असून त्यांना 28,351 मते तसेच नवनीत राणा यांना 24003 मते मिळाली आहेत.

    नवनीत राणा
  9. सांगली लोकसभा निकाल : संजयकाका पाटील यांची आघाडी, विशाल पाटील बॅकफूटवर - कोण जिंकणार?

  10. साध्वी प्रज्ञासिंह, अनुराग ठाकूर आघाडीवर

    भोपाळमध्ये भाजपच्या साध्वी प्रज्ञा सिंह आघाडीवर असून हिमाचल प्रदेशातील हामिरपूर मतदारसंघात अनुराग ठाकूर आघाडीवर आहेत.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  11. भाजपची 162 जागांवर आघाडी तर काँग्रेसची 51 जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेस 2 ठिकाणी आघाडीवर

    निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार162 ठिकाणी भाजप आघाडीवर आहे काँग्रेस 51 ठिकाणी, तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 ठिकाणी आघाडीवर आहे.शिवसेना 2 जागांवर आघाडीवर आहे.

    जनता दल, केरळ काँग्रेस, मिझो नॅशनल फ्रंट, तेलंगणा राष्ट्र समिती, शिरोमणी अकाली दल, वाय. एस. आर. काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, तृणमूल काँग्रेस सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा हे प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहेत.

    भाजप

    फोटो स्रोत, Getty Images

  12. हातकणंगले मतदारसंघात धैर्यशील माने 54 मतांनी आघाडीवर

    सुरुवातीच्या मतमोजणीत शिवसेनेचे धैर्यशील माने यांना 35058 मते तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना 35004 मते मिळली आहेत.

  13. नागपूरमध्ये नितीन गडकरी आघाडीवर

    नागपूरमध्ये नितीन गडकरी यांनी 4000 मतांनी आघाडी घेतली आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे नाना पटोले निवडणूक लढवत आहेत.

    नितीन गडकरी

    फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC

  14. मुंबई दक्षिण-मध्य मतदारसंघात राहुल शेवाळे आघाडीवर

    सुरुवातीला आलेल्या कलानुसार मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात शिवसेनेचे राहुल शेवाळे यांनी आघाडी घेतली आहे.

    तर दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत आघाडीवर आहे. अरविंद सावंत यांच्या विरोधात काँग्रेसचे मिलिंद देवरा निवडणूक लढवत आहेत.

  15. बारामतीत कांचन कुल यांची आघाडी

    सुरुवातीच्या मतमोजणीमध्ये भाजपाच्या कांचन कुल यांना यांना 4879 मते तर राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांना 3308 मते मिळाली आहेत.

    कांचन कुल

    फोटो स्रोत, Getty Images

  16. शिरूरमध्ये अमोल कोल्हे आघाडीवर

    शिरुरमध्ये मतमोजणीच्या पहिल्या फेरीत अमोल कोल्हे यांना 15,021 तर शिवाजीरावर अढळराव पाटील यांनी 8959 मतं मिळाली आहेत.

    अमोल कोल्हे
  17. भाजपची 79 जागांवर आघाडी तर काँग्रेसची 30 जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेस 2 ठिकाणी आघाडीवर

    निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार 79 ठिकाणी भाजप आघाडीवर आहे काँग्रेस 30 ठिकाणी, तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 ठिकाणी आघाडीवर आहे.शिवसेना 2 जागांवर आघाडीवर आहे.

    जनता दल, केरळ काँग्रेस, मिझो नॅशनल फ्रंट, तेलंगणा राष्ट्र समिती, शिरोमणी अकाली दल, वाय. एस. आर. काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, तृणमूल काँग्रेस सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा हे प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहेत.

    भाजप

    फोटो स्रोत, Getty Images

  18. अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील 12 हजार मतांनी आघाडीवर

    अहमदनगरमध्ये भाजपच्या सुजय विखे-पाटील यांनी 12 हजार मतांनी आघाडी घेतली आहे. शिर्डीमध्ये सदाशिव लोखंडे यांनी आघाडी घेतली आहे.

    SUJAY VIKHE

    फोटो स्रोत, Getty Images

  19. लोकसभा निकाल : यंदा निकाल उशिरा लागणार, कारण...

  20. गुजरातमध्ये 10 जागांवर भाजपची आघाडी

    गुजरातमध्ये भाजपने 10 जागांवर आघाडी घेतली असून एका जागेवर काँग्रेस आघाडीवर आहे.