मोदी सरकार: नरेंद्र मोदींची संसदीय दलाच्या नेतेपदी निवड

पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आहेत. निकाल ते सत्तास्थापनेच्या सर्व ताज्या घडामोडी पाहा बीबीसी मराठीच्या या लाईव्ह पेजवर.

लाईव्ह कव्हरेज

  1. नितीन गडकरी 81,000 मतांनी आघाडीवर

    सहाव्या फेरीअखेर भाजपचे नितीन गडकरी 81,000 मतांनी नागपूर मतदारसंघात आघाडीवर आहेत.

    वर्ध्यात भाजपच्या रामदास तडस यांना 1, 97,956 मते तर काँग्रेसच्या चारुलता टोकस यांना 1,34, 983 मते मिळाली आहेत.

    नितीन गडकरी
  2. आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्यात अपयशी - काँग्रेस

    'न्याय'चा प्रचार घराघरापर्यंत पोहोचवण्यात आम्ही अयशस्वी ठरलो आहोत असं काँग्रेस नेते जयवीर शेरगील यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  3. सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, सुनील तटकरे, उदयनराजे भोसले विजयी

    बारामती, शिरुर, रायगड आणि साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा विजय झाल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे. त्यावेळी त्यांचे नातू पार्थ पवार यांचा मात्र पराभव झाला आहे.

  4. विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया

    सबका साथ+सबका विकास+सबका विश्वास=विजयी भारत

    एकीचं बळ.एकत्र येऊनच प्रगतीपथावर जाऊ. एकत्र येऊन आपण मजबूत आणि सर्वसमावेशक भारताची उभारणी करू. भारत पुन्हा जिंकला! विजयी भारत.

    - नरेंद्र मोदी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी

    फोटो स्रोत, twitter

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  5. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान मोदींचं केलं अभिनंदन

    रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी टेलिग्रामच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीतील यशाकरता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे.

    रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

    फोटो स्रोत, Reuters

  6. पार्थसाठी आम्ही प्रयत्न केले, पण... - शरद पवार

    मावळमधून पार्थ पवार यांचा पराभव झाला आहे.त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी,"मावळ आम्ही आधी कधी जिंकलो नव्हतो. आम्ही प्रयत्न करायचे होते तेवढे नक्की केले," अशी प्रतिक्रिया दिली आहे.

    तसंच पार्थसाठी मी निवडणूक लढलो नाही असं म्हणणं योग्य नाही, असं त्यांनी म्हटलंय.

    शरद पवार

    फोटो स्रोत, ANI

  7. 'सायलेंट लाटेची त्सुनामी झाली', मुख्यमंत्री फडणवीस यांची पत्रकार परिषद

    राज्यात विजयी आघाडी घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत बोलत आहेत...

    • मोदींच्या बाजून सायलेंट असलेली लाट त्सुनामीमध्ये परावर्तीत झाली आहे. या देशातला हा अभूतपूर्व विजय मोदींनी मिळवला आहे.
    • देशात प्रोइन्कबन्सी आहे हे स्पष्ट झालं आहे. गेल्यावेळ पेक्षा जास्त जगा जिंकू असा विश्वास आहे.
    • सरकारनं केलेल्या कामांबद्दल लोकांच मत अनुकूल आहे, हे या निकालांमधून दिसून आलं आहे.
    • उद्यापासूनच आम्ही महाराष्ट्रात जनतेसाठी आणखी प्रयत्न करू. महायुतीच्या नेत्यांनी चांगलं काम केलं आहे.
    • उद्धव ठाकरेंनी चांगला समन्वय ठेवला. त्यामुळे मी सर्व घटकपक्षांचे आभार मानतो.
    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  8. पुरस्कार वापसी करणाऱ्यांना चपराक - गिरिराज सिंह

    मोदींनी विकासाचं काम केलं. जात-पात, धर्म यांच्यापल्याड जाऊन मिळवलेला हा विजय आहे. पुरस्कार परत करणाऱ्यांच्या तसंच ग्रासरूटपासून दूर असलेल्या मंडळींना बसलेली चपराक आहे.

    गिरिराज सिंह

    फोटो स्रोत, Getty Images

  9. पाहा लोकसभा निकालांचे ताजे आकडे आणि सोप्या भाषेत विश्लेषण

    YouTube पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

    YouTube पोस्ट समाप्त

  10. नवनीत राणा आघाडीवर

    अमरावतीत नवनीत राणा आणि आनंद अडसूळ यांच्यात कडवी टक्कर होत आहे.

    अमरावती मतदारसंघात नवतीन राणा 2,95,333 आहेत. आनंद अडसूळ 2,66,494 मतांसह दुसऱ्या स्थानी आहेत.

    28,839 मतांचं अंतर आहे.

    नवनीत राणा
    फोटो कॅप्शन, अमरावती मतदारसंघात नवनीत राणा आघाडीवर आहेत.
  11. साताऱ्यात उदयनराजे भोसले आघाडीवर

    सातारा मतदारसंघात चुरशीचा मुकाबला सुरू असून सध्यातरी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले आघाडीवर आहेत. तर शिवसेनेचे नरेंद्र पाटील दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

    उदयनराजे भोसले - 3,14,873

    नरेंद्र पाटील - 2,51,865

    उदयनराजे भोसले
    फोटो कॅप्शन, सातारा मतदारसंघात उदयनराजे भोसले आघाडीवर आहेत.
  12. सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निवासस्थानातून बाहेर पडल्या

    देशभरातील निकाल आता स्पष्ट होत आहेत. या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  13. जनतेनं नरेंद्र मोदींना नेतृत्त्वाची आणखी एक संधी दिली- हिमांता बिस्वा सर्मा

    "भारतीय जनतेनं मोदीजींना देशाचं नेतृत्व करण्यासाठी आणखी एक संधी दिली आहे. लोक त्यांच्यावर प्रेम करतात. भारतीय लोकांचे मी आभार मानतो. विशेषतः ईशान्य भारताच्या लोकांनी मोदीजींना साथ दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मोदीजी आपल्या देशाला पुढे नेतील याचं आश्वासन मी भारतीयांना देतो."

    - हिमांता बिस्वा सर्मा

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  14. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केले पंतप्रधान मोदींचे अभिनंदन

    इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. भारत आणि इस्रायल यांच्यातील मैत्री दृढ करण्याचे कार्य कायम राहील असंही त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  15. युतीवर शिक्कामोर्तब झालं तेव्हाच जिंकण्याचा विश्वास आम्हाला होता- संजय राऊत

    देश मोदीमय झाला आहे, 2014 पेक्षा प्रचंड मोठा विजय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआला मिळाला आहे. जो विरोधी पक्ष म्हणून उभं राहाण्याचा प्रयत्न करत होता. ते पूर्णपणे जमीनदोस्त झाले आहेत. देशाला पुन्हा एकदा पुढील पाच वर्षांसाठी मोदी यांच्या नेतृत्वासाठी जनतेनं विश्वास टाकला आहे. युतीवर शिक्कामोर्तब झालं तेव्हाच दोन्ही पक्षांना राज्यात 45 जागा मिळतील अशी आशा आम्हाला होती. देश कोणाच्या हाताता सुरक्षित आहे हे लोकांना कळतं.

    - संजय राऊत, खासदार, शिवसेना

    संजय राऊत

    फोटो स्रोत, Getty Images

  16. हा भारताचा विजय आहे - गडकरी

    भाजपला बहुमत मिळणार, हे स्पष्ट होताना दिसताच भाजप नेते नितीन गडकरी, “हा भारताचा विजय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या यशस्वी नेतृत्वात भाजपने इतिहास रचत आहे. देशाच्या जनतेला आणि सर्व कार्यकर्त्यांना अनेकानेक शुभेच्छा.”

    नागपुरातून लढत असलेले गडकरी हे दुपारी एक वाजेपर्यंत 55,397 मतांनी आघाडीवर होते. त्यांची लढत काँग्रेसचे नाना पटोले यांच्याशी झाली होती.

    कशी होती गडकरी विरुद्ध पटोले ही लढत? वाचा सविस्तर इथे

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  17. संध्याकाळी 6 वाजता नरेंद्र मोदी आणि दुपारी 4 वाजता राहुल गांधींची पत्रकार परिषद

    संध्याकाळी 6 वाजता नरेंद्र मोदी लोकांना संबोधित करण्याची शक्यता आहे.

    तर दुपारी 4 वाजता राहुल गांधी पत्रकार परिषद घेणार आहेत.

    भाजपाप्रणित सरकार 26 मे रोजी सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे.

    नरेंद्र मोदी, राहुल गांधी

    फोटो स्रोत, Getty Images

  18. नांदेडमध्ये अशोक चव्हाण 24,433 मतांनी पिछाडीवर

    a

    फोटो स्रोत, Getty Images

  19. मावळमध्ये पार्थ पवार 1,72,349 मतांनी पछाडीवर

    bbc
  20. नवनीत राणा आघाडीवर

    अमरावतीमध्ये नवनीत राणा आठव्या फेरिअखेर 8,913 मतांनी आघाडीवर आहेत. शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांना 2,09,626 तर नवनीत राणा 2,18,539 मतं आतापर्यंत मिळाली आहेत.

    bbc