You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

मोदी सरकार: नरेंद्र मोदींची संसदीय दलाच्या नेतेपदी निवड

पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आहेत. निकाल ते सत्तास्थापनेच्या सर्व ताज्या घडामोडी पाहा बीबीसी मराठीच्या या लाईव्ह पेजवर.

लाईव्ह कव्हरेज

  1. सकाळी 8.44 वाजेपर्यंतच्या कलानुसार पश्चिम बंगालमध्ये तृणमूलची आघाडी

  2. राज्यात एका जागी काँग्रेस आघाडीवर तर 3 जागांवर भाजप अाघाडीवर

  3. भाजपला 300 हून अधिक जागा मिळतील- भाजप प्रवक्ता

    भाजपला 300हून अधिक जागा मिळतील. कधी चांगली रुग्णालयं मिळतील, कधी घरात बल्ब लागेल असा विचार गरिबांनी कधीही केला नव्हता. आज त्यांच्या घरात एलईडी आहे. मोदींना ‘चोर’ही म्हणवलं गेलं मात्र लोकभावना त्यांच्याबरोबर आहेत.- अश्वनी उपाध्याय, भाजप प्रवक्ता

  4. भाजपची 60 जागांवर आघाडी तर काँग्रेसची 17 जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेस 3 ठिकाणी आघाडीवर

    निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार 60 ठिकाणी भाजप आघाडीवर आहे काँग्रेस 17 ठिकाणी, तर राष्ट्रवादी काँग्रेस 3 ठिकाणी आघाडीवर आहे.

    जनता दल, केरळ काँग्रेस, मिझो नॅशनल फ्रंट, तेलंगणा राष्ट्र समिती, शिरोमणी अकाली दल, वाय. एस. आर. काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, तृणमूल काँग्रेस, शिवसेना, सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा हे प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहेत.

  5. भाजपची 36 जागांवर आघाडी तर काँग्रेसची 11 जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेस 3 ठिकाणी आघाडीवर

    निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार 36 ठिकाणी भाजप आघाडीवर आहे काँग्रेस 11 ठिकाणी, तर राष्ट्रवादी काँग्रेस 3 ठिकाणी आघाडीवर आहे.

    जनता दल, केरळ काँग्रेस, मिझो नॅशनल फ्रंट, तेलंगणा राष्ट्र समिती, शिरोमणी अकाली दल हे प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहेत.

  6. 24 जागांवर भाजपची आघाडी, काँग्रेस 15 जागांवर काँग्रेस आघाडीवर

    सकाळी 8.30 वाजेपर्यंत झालेल्या मतमोजणीतून भाजप 24 जागांवर आणि काँग्रेसने 15 जागांवर आघाडी घेतल्याचे दिसत आहे.

    (स्रोत-सी-व्होटर)

  7. मध्य प्रदेशात 4 जागांवर भाजपची आघाडी

    मध्य प्रदेशात 4 जागांवर भाजपने आघाडी घेतली असून एका जागेवर काँग्रेसने आघाडी घेतली आहे.

    (स्रोत- सी-व्होटर)

  8. चंदिगडमध्ये मतमोजणीला सुरुवात

    भाजपतर्फे खासदार किरण खेर, काँग्रेसतर्फे पवन कुमार बन्सल आणि आम आदमी पार्टीचे हरमोहन धवन हे उमेदवार या निवडणुकीत उभे आहेत.

  9. महाराष्ट्रात तीन जागांवर भाजप आघाडीवर

    सी-व्होटरकडून आलेल्या माहितीमध्ये सुरुवातीच्या मतमोजणीत भाजपने 3 जागांवर आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे.

  10. बंगळुरूमध्ये मतमोजणीला सुरुवात, द. बंगळुरूकडे सर्वांचे लक्ष

    बंगळुरुमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. 1991 पासून दक्षिण बंगळुरू मतदारसंघात भाजपाचा विजय झाला आहे.1996 पासून 2014 च्या निवडणुकीपर्यंत अनंत कुमार यांचा विजय झाला होता.

    यावेळेस भाजपने तेजस्वी सूर्या यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे बी. के. हरिप्रसाद निवडणूक लढवत आहेत. यंदा या मतदारसंघात कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    ही निवडणूक आपणच जिंकू असा विश्वास तेजस्वी सूर्या यांनी व्यक्त केला आहे.

  11. 8040 उमेदवारांचे भविष्य आज ठरणार

    लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून एकूण 8040 उमेदवारांचे भविष्य आज ठरेल.

  12. काँग्रेस मुख्यालयाबाहेर होमहवन

    काँग्रेसच्या नवी दिल्लीतल्या मुख्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून होमहवन केलं जात आहे. त्याचा आढावा घेतला आहे बीबीसीचे प्रतिनिधी झुबैर अहमद यांनी.

  13. निकाल काँग्रेसच्या बाजूने लागेल- अजय माकन

    नवी दिल्ली मतदारसंघात काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या अजय माकन यांनी सर्व निकाल काँग्रेसच्या बाजूने लागतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

    भाजपाच्या मीनाक्षी लेखी यांच्याविरोधात ते निवडणूक लढवत आहेत. काँग्रेस विजयी होईल आणि पक्षाचे सरकार स्थापन होईल तसेच राहुल गांधी पंतप्रधान होतील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

  14. देशभरात मतमोजणीला सुरुवात

    देशभरातल्या वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला पोस्टानं येणाऱ्या मतांची मोजणी केली जाणार आहे.

  15. मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात

    आज सर्वांची नजर असेल ती स्ट्राँगरूम्सवर. देशभरातील शेकडो अशा स्ट्राँग रूम्समध्ये आज हजारो उमेदवारांचं नशीब ठरणार आहे.

    आम्हीही देशभरातील बहुतांश मतदारसंघांमधून तुमच्यापर्यंत ताजी आणि अचूक माहिती आणणार आहोत.

    तुम्ही आमच्या सोशल मीडिया आकाउंट्सवर तसंच जिओ टीव्ही अॅपवर आमचं विशेष कव्हरेज पाहू शकता.

  16. संजय निरुपम यांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

    मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात काँग्रेसतर्फे निवडणूक लढवणारे संजय निरुपम यांनी सकाळी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.

    संजय निरूपम यांनी शिवसेनेचे गजानन कीर्तीकर यांच्याविरोधात निवडणूक लढवली आहे. या मतदारसंघात 2014 साली कीर्तीकर यांचा विजय झाला होता.

    संजय निरुपम यांनी मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदीही काम केले आहे. 2014 साली त्यांनी उत्तर मुंबई मतदारसंघात गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती.

    2009 साली उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपाच्या राम नाईक यांचा पराभव करून ते लोकसभेत गेले होते.

  17. मतमोजणीसाठी कडक सुरक्षाव्यवस्था

    सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होत आहे. बंगळुरू आणि हैदराबाद येथील सुरक्षाव्यस्थेची ही छायाचित्रे.

  18. मतमोजणीपूर्वी उमेदवारांनी देवदर्शनाने केली दिवसाची सुरुवात, सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होत आहे.

    केरळमधील तिरुअनंतपूरम येथील भाजप उमेदवार कुम्मानम राजशेखरन यांनी सकाळी अय्यागुरू आश्रम येथे जाऊन प्रार्थना केली.

    काँग्रेसचे शशी थरूर आणि डाव्या आघाडीचे उमेदवार सी. दिवाकरन यांच्याविरोधात ते निवडणूक लढवत आहेत.

    भाजपचे उमेदवार तेजस्वी सूर्या यांनी माध्यमांशी संवाद साधला.

  19. EVM : मतांमध्ये फेरफारासाठी या मशीन्स सुरक्षा व्यवस्थेतून बाहेर काढणं किती सोपं?

  20. लोकसभा निकाल: बीबीसीच्या नावाने पसरवला जात असलेला 'तो' सर्व्हे खोटा