You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

महाराष्ट्रात एकूण चार टप्प्यांमध्ये 60.68 टक्के मतदान

मुंबईच्या 6 जागा, याशिवाय कल्याण, ठाणे, भिवंडी, पालघर, मावळ, शिर्डी, शिरूर, नंदुरबार, धुळे, दिंडोरी आणि नाशिक या जागांवर मतदान पार पडलं.

लाईव्ह कव्हरेज

  1. अनिल अंबानी यांनी मतदानाचा हक्क बजावला

    मुंबईतल्या कफ परेड भागातल्या सोमाणी हायस्कूलमध्ये अनिल अंबानी यांनी मतदान केलं.

  2. मुंबईत कोणासमोर आहे कोणाचं आव्हान?

    मुंबईतल्या सहाही जागी यंदा चुरशीची लढत आहे. सहाही ठिकाणी विद्यमान खासदार हे शिवसेना किंवा भाजपचे आहेत. युतीसमोर त्यांच्या जागा राखण्याचं आव्हान आहे, तर काँग्रेस-राष्ट्रवादसमोर मुंबईत कमबॅक करण्याचं आव्हान आहे.

  3. मुंबईसह राज्यातल्या 17 जागांवर मतदान सुरू

    मुंबईतल्या मतदान केंद्रांवर सकाळी 7 वाजल्या पासूनच मतदारांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.

  4. मुंबईमध्ये कुणाचं पारडं जड?, मुंबईतल्या 6 जागांवर यंदा चुरशीची लढत आहे

    मतदानाच्या पूर्वसंध्येला बीबीसी मराठीचे प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर यांनी मंबईतल्या पत्रकारांशी चर्चा करून मुंबईतल्या लढतींबाबत जाणून घेतलं आहे.

  5. मतदान कसं करतात, माहितीये?, बेसिक प्रश्नाचं सोपं उत्तर काय?

    देशात सध्या लोकसभा निवडणुकांसाठी मतदान सुरू आहे. पण मतदान कसं केलं जातं, त्याची नेमकी प्रक्रिया कशी असते हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

  6. VR FILM: वारली आदिवासींची गोष्ट

    वाढत्या शहरीकरणाने आदिवासी समाजाच्या संस्कृती आणि अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. वर्षानुवर्ष त्यांच्या हक्काची असलेली जमीन आणि जंगल नष्ट होत आहे.

    महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये वास्तव्य असलेल्या वारली समाजासमोरही नेमकी हीच अडचण आहे. त्यामुळे बीबीसीकडे त्यांनी त्यांच्या समस्या, अडचणी मांडल्या. त्यासुद्धा वारली कलेच्या माध्यमातून. ज्यासाठी हा समाज शेकडो वर्ष ओळखला जातो.

  7. मावळ मतदारसंघ - एक चर्चेचा विषय

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षशरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यंदा निवडणुकीच्या राजकारणात एंट्री करत आहेत.

    यांनी नवीन पिढीला संधी देण्यासाठी पार्थ यांना संधी देण्यात आली आहे, असं शरद पवार यांनी सांगितलंय.

    पण नावाचं आणि पक्षाचं पाठबळ त्यांना पुरेसं ठरेल का? नेमकी काय आहेत त्यांच्यासमोरील आव्हानं?

  8. मुंबईत कोण-कोण आमनेसामने?

    लोकसभा निवडणुकांसह महाराष्ट्रातील चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिल रोजी होत आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह नाशिक, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील काही जागांवर हे मतदान होत आहे. तिसऱ्या टप्प्यात पुण्यामध्ये अत्यंत कमी मतदान झाल्यानंतर आता मुंबईत किती टक्के मतदान होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    गेल्या निवडणुकीमध्ये मुंबईतील सर्व जागांवर भाजपा-शिवसेना युतीचा विजय झाला होता.पण यंदा कौल कसा लागणार? कोण कोण आहेत आमने-सामनेे?

  9. कुठे कुठे होतंय मतदान?

    29 एप्रिल म्हणजेच सोमवारी लोकसभा निवडणुकीचं चौथ्या टप्प्यातलं मतदान पार पडत आहे.

    महाराष्ट्रातील 17 मतदारसंघ आणि इतर 8 राज्यांमधल्या 55 जागांवर मतदान होत आहे.

    महाराष्ट्रात दक्षिण मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई या सहा मतदारसंघासह ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी, नाशिक, मावळ, शिरूर आणि शिर्डी येथे मतदान होत आहे.