मतदान आणि सेल्फी
मतदानानंतर लोकांना सेल्फीचा मोह आवरत नाही. मुलूंडच्या वाणी महाविद्यालयाबाहेर गाला कुटुंबियां मतदान केल्यानंतर अशी पोझ दिली.
You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबईच्या 6 जागा, याशिवाय कल्याण, ठाणे, भिवंडी, पालघर, मावळ, शिर्डी, शिरूर, नंदुरबार, धुळे, दिंडोरी आणि नाशिक या जागांवर मतदान पार पडलं.
मतदानानंतर लोकांना सेल्फीचा मोह आवरत नाही. मुलूंडच्या वाणी महाविद्यालयाबाहेर गाला कुटुंबियां मतदान केल्यानंतर अशी पोझ दिली.
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अभिनेते अमोल कोल्हे यांनी नारायणगाव कोल्हे मळा या ठिकाणी मतदान केलं.
मुंबईत ठिकठिकाणी मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत. बीबीसी प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर यांनी त्याचा आढावा घेतला आहे.
मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून शिवसनेतर्फे निवडणूक लढवणाऱ्या राहुल शेवाळे यांनी सकाळी मतदान केलं. 2014 च्या निवडणुकीत ते याच मतदारसंघात विजयी झाले होते.
मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवणाऱ्या प्रिया दत्त यांनी सकाळी मतदान केलं. गेल्या निवडणुकीत त्यांचा भाजपच्या पूनम महाजन यांनी पराभव केला होता. यावेळेस पुन्हा एकदा दोघींंमध्ये लढत होत आहे.
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी देणं हा भाजपचा अंतर्गत विषय आहे. पण साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी देण्यासाठी आम्ही विरोध केला होता. यामुळे भाजपचं नुकसान होऊ शकतं - रामदास आठवले
पश्चिम बंगालमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 34.71 टक्के मतदान झालं आहे. तर ओडिशामध्ये 17 टक्के मतदान झालं आहे.
ओडिशात 6 मतदारसंघांत तर पश्चिम बंगालमध्ये 8 मतदारसंघांसाठी मतदान सुरू आहे.
मावळ मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार वेगवेगळ्या मतदान केंद्रांना भेटी देत आहेत. त्यांनी 23 एप्रिललाच काटेवाडीमध्ये त्याचं मतदान केलं आहे.