You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

महाराष्ट्रात एकूण चार टप्प्यांमध्ये 60.68 टक्के मतदान

मुंबईच्या 6 जागा, याशिवाय कल्याण, ठाणे, भिवंडी, पालघर, मावळ, शिर्डी, शिरूर, नंदुरबार, धुळे, दिंडोरी आणि नाशिक या जागांवर मतदान पार पडलं.

लाईव्ह कव्हरेज

  1. अभिनेत्री प्रियंका चोप्रानं केलं मतदान

  2. भाजप खासदार साक्षी महाराज यांनी केलं मतदान

    भाजप खासदार आणि पक्षाचे उन्नावमधले उमेदवार साक्षी महाराज यांनी केलं मतदान.

  3. पश्चिम बंगालमधील जेमुआ मतदान केेंद्रामध्ये मतदानावर बहिष्कार

    पश्चिम बंगालमधील आसनसोल मतदारसंघातील जेमुआ मतदान केंद्रात लोकांनी मतदानावर बहिष्कार घातला आहे. मतदान केंद्रावर केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान नसल्याचं कारण देत लोकांनी हा बहिष्कार घातल्याचं समजतं.

  4. मतदानानंतर उर्मिलाचा सुरीला अंदाज

    मतदान केल्यानंतर अभिनेत्री आणि काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर हिनं अशा प्रकारे गाणं गाऊन मतदारांना आवाहन केलं.

  5. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केलं मतदान

    मध्य प्रदेशात छिंदवाडामधील शिकारपूरमध्ये मुख्यंमत्री कमलनाथ यांनी मतदान केलं. इथं त्यांचा मुलगा नकुलनाथ निवडणूक लढवत आहे. छिंदवाडा हा कमलनाथ यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे.

  6. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे मतदान

    शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पत्नी वर्षा आणि मुलगी अन्वीसह विलेपार्लेतल्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये मतदानाचा हक्क बजावला. अन्वीनं यंदा पहिल्यांदा मतदान केलं.

  7. अभिनेते परेश रावल यांचे मतदान

    खासदार परेश रावल आणि त्यांच्या पत्नी स्वरुप संपत यांनी मुंबईत विलेपार्ले येथे मतदान केले.

  8. कन्हैया कुमार मतदानासाठी उपस्थित

    केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्याविरोधात निवडणूक लढवणाऱ्या कन्हैयाकुमार यानं बेगूसरायमध्ये मतदानासाठी हजेरी लावली.

  9. ठाणे महापालिकेकडून मतदारांमध्ये जागृती

    मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी ठाणे महापालिकेकडून ठिकठिकाणी असे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत.

  10. दिंडोरीत EVM मध्ये बिघाड

    दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील नांदगाव शहरातील आनंदवाडीमधील मतदानकेंद्रावर EVM मध्ये बिघाड झाल्याचं वृत्त आहे.

  11. अभिनेते रवीकिशन यांचं मतदान

    देशातील एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोरखपूर मतदारसंघात भाजप उमेदवार अभिनेते रवीकिशन यांनी मुंबईत मतदान केलं

  12. मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी केले मतदान

    मंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी मतदानाचा हक्क बजावला.

  13. ठाणे : उन्हाचा तडाखा टळण्याचा प्रयत्न

    ठाणे शहरातल्या वेगवेगळ्या पोलिंग बुथवर नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली आहे. उन्हाचा तडाखा टाळण्यासाठी लोक सकाळीच मतदान करण्यावर भर देत आहेत.

  14. नाशिक : बूथ क्रमांक 58 वरील EVM 40 मिनिटं बंद

    नाशिकमध्ये शांततेत मतदान सुरू झालं आहे. पण शहरातल्या बूथ क्रमांक 58 वर EVM 40 मिनिटं बंद पडलं होतं.

  15. अभिनेत्री रेखा यांचे वांद्रे येथे मतदान

    अभिनेत्री रेखा यांनी मुंबईत वांद्रे येथे मतदानासाठी उपस्थित झाल्या.

  16. पूनम महाजन यांनी केले मतदान

    मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या भाजपा उमेदवार पूनम महाजन यांनी मुंबईत वरळी येथे मतदान केले.

  17. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांचे मतदान

    रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे शक्तीकांत दास मुंबईत पेडर रोड येथील मतदान केंद्रात हजेरी लावली.

  18. आजी-माजी मुख्यमंत्र्यांची मुले निवडणुकीच्या रिंगणात

    राजस्थानातील जोधपूरमधून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे पूत्र वैभव गेहलोत निवडणूक लढवत आहेत. तर माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांचे पूत्र दुष्यंत सिंह झालावाड़ मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

    मध्यप्रदेशात छिंदवाडा मतदारसंघातून कमलनाथ यांचे पूत्र नकुलनाथ निवडणूक लढवत आहेत. छिंदवाडा हा कमलनाथ यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. तर कमलनाथ छिंदवाडामधून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत.

  19. 7 केंद्रीय मंत्र्यांचं भवितव्य आज ठरणार

    देशातल्या काही महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. यामध्ये 7 केंद्रीय मंत्री निवडणुकीला सामोरे जात आहेत. याबरोबरच काही महत्त्वाच्या नेत्यांचं भविष्यही EVM मध्ये बंदिस्त होईल.

    पश्चिम बंगालमधल्या आसनसोल येथून बाबुल सुप्रियो निवडणूक लढवत असून त्यांच्याविरुद्ध मुनमून सेन निवडणूक लढवत आहेत.

    एस. एस. अहलुवालिया बर्दवान- दुर्गापूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

    बिहारमधील बेगूसरायमध्ये गिरिराज सिंह आणि कन्हैयाकुमार यांच्यामध्ये लढत होत आहे.

    त्याचप्रमाणे उत्तरप्रदेशात कनौजमध्ये डिंपल यादव निवडणूक लढवत आहेत. साक्षी महाराज उन्नाव मधून, माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शिद फरुखाबाद येथून तर श्रीप्रकाश जयस्वाल कानपूरमधून निवडणूक रिंगणात आहेत.

  20. मुंबईत सकाळपासूनच मतदारांचा उत्साह

    मुंबईतल्या वेगवेगळ्या भागात सकाळपासूनच मतदार मतदानासाठी घराबाहेर पडल्याचं चित्र आहे.