रवींद्र वायकर 48 मतांनी विजयी, नाट्यमय घडामोडींनंतर लागला निकाल

लोकसभा निवडणुकांच्या निकालांचे लाईव्ह अपडेट्स तुम्हाला इथे वाचता येतील. तसंच, निकालासंबंधी इतरही घडामोडींचे अपडेट तुम्हाला या लाईव्ह पेजवर मिळतील.

थोडक्यात

  • लोकसभा निवडणुकीचे कल आता हाती येत आहेत.
  • अभिनेत्री कंगना रणौत हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून जवळपास 54 हजार मतांनी आघाडीवर आहे.
  • नैऋत्य मोसमी वारे आता महाराष्ट्राच्या अगदी वेशीवर पोहोचले आहेत आणि पुढच्या तीन चार दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल अशी अपेक्षा आहे.
  • दक्षिण मध्य मुंबई लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत ठाकरे गटाच्या अनिल देसाई यांनी मोठी आघाडी घेतली आहे.
  • दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या भास्कर भगरे यांनी केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्यावर मोठी आघाडी मिळवली आहे.
  • जालना मतदारसंघात पाचव्या फेरीअखेर भाजपचे रावसाहेब दानवे पिछाडीवर, काँग्रेसचे कल्याण काळे आघाडीवर
  • सांगलीत १२ व्या फेरीअखेर अपक्ष उमेदवार विशाल पाटील 52 हजार 573 मतांनी आघाडीवर, भाजपाचे संजय पाटील आणि महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील पिछाडीवर
  • अकोला मतदारसंघात काँग्रेसचे अभय पाटील आघाडीवर, भाजपचे अनुप धोत्रे आणि वंचितचे प्रकार आंबेडकर पिछाडीवर
  • नाशिकमध्ये महायुतीला दणका, मविआचे राजाभाऊ वाजेंना मोठी आघाडी

लाईव्ह कव्हरेज

ओंकार करंबेळकर

  1. शिवसेना भवनाबाहेर महिला कार्यकर्त्यांचा जल्लोष

    शिवसेना उबाठा गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी निकालांचे कल हाती येऊ लागल्यावर शिवसेना भवन येथे जमून आनंद साजरा केला

    फोटो स्रोत, BBC/ SHARDUL KADAM

    फोटो कॅप्शन, शिवसेना उबाठा गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी निकालांचे कल हाती येऊ लागल्यावर शिवसेना भवन येथे जमून आनंद साजरा केला
  2. रामदास तडस यांची हॅटट्रिक हुकणार? वर्ध्यात अमर काळे यांना मोठी आघाडी

    वर्धा लोकसभा मतदार संघात महाविकासचे उमेदवार अमर काळे यांनी सुरवातीपासून आघाडी कायम ठेवली आहे. त्यामुळं त्यांची विजयाकडे वाटचाल सुरु झाली आहे. सध्या अमर काळे 38 हजार 702 मतांच्या आघाडीवर आहे.

    विसाव्या फेरीनंतर अमर काळे यांना 3,04,108 मते तर रामदास तडस यांना 2,65,406 मते मिळाली आहे. सध्याच्या निकालाचे अंदाज बघता रामदास तडस यांची हॅट्रिक हुकणार असल्याचं बोललं जात आहे.

    दत्ता मेघे यांचे पुत्र सागर मेघे यांना पराभूत करत 2014 मध्ये विजय मिळवणाऱ्या रामदास तडस यांची भाजपनं 2019 मध्येही या मतदारसंघातून उमेदवारी कायम ठेवली होती.

    काँग्रेसनं चारुलता टोकस यांना उमेदवारी देत तडस यांच्यासमोर आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या प्रचारासाठी काँग्रेसनं इथं चांगला जोरही लावला होता.

    रामदास तडस यांची हॅटट्रिक हुकणार? वर्ध्यात अमर काळे यांना मोठी आघाडी

    रामदास तडस यांच्या विरोधात तगडा उमेदवार दिला तर याठिकाणी महाविकास आघाडीला एक जागा जिंकण्यात यश येऊ शकते असा अंदाज वर्तवला जात होता. शरद पवारांचा मतदारसंघात काही प्रमाणात प्रभाव आहे. त्यामुळं त्यांनी हा मतदारसंघ स्वतःकडं घेतला.

    मतदारसंघ आला असला तरी काँग्रेसचाच उमेदवार आपल्या पक्षातर्फे रणांगणात उतरवत त्यांनी अर्ध्याहून अधिक नाराजी जागेवर थांबवली आहे. त्याचबरोबर जातीय समीकरणांचा विचार करून पवारांनी उमेदवारी दिल्याचं बोललं जात आहे.

    वर्ध्याचा विचार करता सर्व समुदायाचं संमिश्र प्रतिनिधित्व इथं पाहायला मिळतं. पण प्रामुख्यानं तेली आणि कुणबी या दोन समाजाचं प्राबल्य आणि मतदार मोठ्या प्रमाणात मतदारसंघामध्ये आहेत.

  3. रामटेक मतदारसंघात राजू पारवे पिछाडीवर

    रामटेक मतदारसंघात महायुतीचे राजू पारवे पिछाडीवर आहेत. 7 व्या फेरीअखेर उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे-

    • राजू पारवे -1,73,494
    • श्याम कुमार बर्वे 2,14,436

    आघाडी 41,242 (श्यामकुवर बर्वे)

  4. 3-4 दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार

    नैऋत्य मोसमी वारे आता महाराष्ट्राच्या अगदी वेशीवर पोहोचले आहेत आणि पुढच्या तीन चार दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल अशी अपेक्षा आहे.

    मान्सूननं 4 जून रोजी गोवा राज्य पूर्णपणे व्यापलं असून, मध्य अरबी समुद्र,रायलसीमाचा उर्वरीत भाग, कर्नाटक आणि तेलंगणातील आणखी काही भागातही आगेकूच केली आहे. वेळेच्या एक दिवस आधीच मान्सून गोव्यात दाखल झाला आहे.

    वायव्य आणि पूर्व भारतात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कायम राहील.

    फोटो स्रोत, IMD

    येत्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या दक्षिण भागात तसंच तेलंगणा, कोस्टल आंध्र, छत्तीसगड आणि दक्षिण ओडिसाच्या काही भागांत मोसमी वाऱ्यांचं आगमन होणं अपेक्षित आहे.

    पुढच्या दोन दिवसांत कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गडगडाट वादळी वारे आणि विजांसह पावसाच्या मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळतील आणि सात जूननंतर इथे पावसाचं प्रमाण वाढेल असं हवामान विभागानं म्हटलं आहे.

    कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यताही हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. तर विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग), हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

    विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये उष्णता कायम आहे. अमरावती येथे राज्यात सर्वाधिक 43°C एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली.तर बीड येथे 22.5°C हे राज्यात सर्वात कमी किमान तापमान होते

    वायव्य आणि पूर्व भारतात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कायम राहील.

    फोटो स्रोत, IMD

    दरम्यान, दक्षिण भारतात केरळ, माहे, कर्नाटक तसंच तामिळनाडू, तेलंगणा, पाँडिचेरीत अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे.

    तर उत्तर भारतात वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे सात जून पर्यंत वारे, धुळीचं वादळ आणि पावसाचीही शक्यता आहे. वायव्य आणि पूर्व भारतात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कायम राहील.

  5. भंडारा गोंदिया मतदारसंघात भाजपाचे सुनील मेंढे आघाडीवर

    भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीत उमेदवारांना मिळालेली मतं पुढीलप्रमाणे

    • सुनील मेंढे भाजपा - 1,97,804
    • प्रशांत पडोळे काँग्रेस - 1,96,342

    आघाडी- सुनील मेंढे भाजपा - 1,462

  6. 17 व्या फेरीनंतर नारायण राणे 41, 221 मतांनी आघाडीवर

    केंद्रीय मंत्री नारायण राणे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात 41,221 मतांनी आघाडीवर आहेत. तर शिवसेना उबाठा गटाचे विनायक राऊत सध्या पिछाडीवर आहेत.

    17 व्या फेरीनंतर नारायण राणे 41, 221 मतांनी आघाडीवर

    फोटो स्रोत, ANI

    रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातून 2009 साली नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे निवडून आले होते. मात्र, त्यानंतर 2014 आणि 2019 अशा दोन्ही वेळा निलेश राणे पराभूत झाले. त्यामुळं पुन्हा मतदारसंघावर वर्चस्व मिळवण्यासाठी नारायण राणे मैदानात उतरणार अशा चर्चा कुठे खमंगपणे, कुठे आश्चर्याच्या धक्क्यात, तर कुठे साशंकपणे चघळल्या जात होत्या.

  7. वर्ध्यात अमर काळे यांची आघाडी कायम

    वर्धा मतदारसंघात अमर काळे यांनी आघाडी कायम राखली आहे.या मतदारसंघात उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे

    • अमर काळे- 2,67,912
    • रामदास तडस- 2,31,018

    अमर काळे 36,894 मतांनी आघाडीवर आहेत.

  8. गडचिरोलीमध्ये काँग्रेसचे नामदेव किरसान आघाडीवर

    गडचिरोलीमध्ये काँग्रेसचे नामदेव किरसान आघाडीवर आहेत.आतापर्यंत उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे

    • अशोक नेते भाजप 224100
    • नामदेव किरसान- काँग्रेस - 274782

    मतांची आघाडी- 50682 (नामदेव किरसान काँग्रेस)

    जिल्हा परिषद आणि एकदा विधानसभा लढवणाऱ्या डॉ. नामदेव किरसान यांना काँग्रेसनं पहिल्यांदा लोकसभेच्या मैदानात उतरवलं. काँग्रेसने नव्या चेहऱ्याला संधी देताच भाजपने अशोक नेते यांना कायम ठेवलं.

    गडचिरोलीमध्ये काँग्रेसचे नामदेव किरसान आघाडीवर

    गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी (एसटी) राखीव आहे. गडचिरोलीला 26 ऑगस्ट 1982 ला चंद्रपूरमधून विभक्त होत स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा मिळाला.

    यानंतरही अनेक वर्ष चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात गडचिरोलीचा समावेश होता. पण, 2009 मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाली तेव्हा गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ तयार झाला. गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया अशा तीन जिल्ह्यात हा मतदारसंघ पसरलेला आहे.

    विदर्भाचं शेवटचं टोक, आदिवासीबहुल, विकासाच्या दृष्टीने कोसो दूर आणि नक्षलग्रस्त भाग अशी या मतदारसंघाची ओळख आहे.

    यामध्ये गडचिरोलीतील गडचिरोली, आरमोरी, अहेरी हे तीन, गोंदियातील आमगाव आणि चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर, ब्रह्मपुरी हे दोन असे तीन जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघ मिळून गडचिरोली लोकसभा मतदारसंघ तयार होतो

  9. अमरावतीमध्ये नवनीत राणा पिछाडीवर, बळवंत वानखेडेंची आघाडी

    अमरावतीमध्ये काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे 15015 मतांनी आघाडीवर आहेत.

    बळवंत वानखडे यांना आतापर्यंत 246099 मतंं मिळाली आहेत, तर नवनीत राणा यांना आतापर्यंत 231084 मतं मिळाली आहेत.

    नवनीत

    फोटो स्रोत, Getty Images

  10. बीड लोकसभा मतदारसंघात बजरंग सोनवणे आघाडीवर

    बीड लोकसभा मतदारसंघात मतमोजणीच्या 13 व्या फेरीअखेर मिळालेली मते पुढीलप्रमाणे

    • पंकजा मुंडे - 303592
    • बजरंग सोनवणे-310065

    आघाडी -6473 (बजरंग सोनवणे)

  11. मराठवाड्यात मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे फॅक्टरचा कुणाला फटका?

    मराठवाड्यामध्ये काय आहे निवडणूक निकालाचं चित्र, मराठवाड्यात मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे फॅक्टरचा कुणाला फटका?

    पाहा LIVE विश्लेषण इथे क्लिक करून

    जरांगे
  12. दहाव्या फेरी अखेरीस मुरलीधर मोहोळ यांना 60,431 मतांची आघाडी

    पुण्यात दहाव्या फेरीअखेर भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना 60,431 मतांची आघाडी मिळाली आहे.

    काँग्रेसचे उमेदवार आणि कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर हे मात्र पिछाडीवर पडले आहे.

  13. कार्टून
  14. एक्झिट पोलचे अंदाज फोल ठरवत अनिल देसाई आघाडीवर

    अनिल देसाई

    दक्षिण मध्य मुंबई लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत ठाकरे गटाच्या अनिल देसाई यांनी मोठी आघाडी घेतली आहे. एक्झिट पोलचे अंदाज खोटे ठरवत अनिल देसाई यांनी शिंदे गटाच्या राहुल शेवाळे यांच्यावर 22 हजार मतांची आघाडी मिळवली आहे.

    ही आघाडी मिळाल्यानंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत अनिल देसाई म्हणाले की, "अजून मतमोजणी सुरू आहे. जे दाखवण्याचा प्रयत्न झाला तसं वादावरण नव्हतं. खरोखर लोकशाही सशक्त राहिली पाहिजे असं लोकांना वाटत होतं त्यानुसार त्यांनी मतं दिली. शिवसेना ठाकरे गटासोबत ज्यापद्धतीने राजकारण झालं ते लोकांना आवडलं नाही. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली."

  15. उदयनराजे भोसलेंची पंधराव्या फेरीनंतर आघाडी, शशिकांत शिंदे पिछाडीवर

    मतमोजणीच्या पंधराव्या फेरी अखेर उदयनराजे भोसले 9736 मतांनी आघाडीवर, शशिकांत शिंदें पडले पिछाडीवर.

    उदयनराजे - 479304

    शशिकांत शिंदे -469568

  16. काय आहेत मुंबईचे कल?

    मुंबईचे कल
  17. चंद्रपूर लोकसभा निकाल : मुनगंटिवार यांच्या विरोधात प्रतिभा धानोरकरांना मोठी आघाडी

  18. गोरखपूरमधून रवी किशन, मंडीमधून कंगना राणौत आघाडीवर

    उत्तरप्रदेशातील गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार रवी किशन सुमारे 28 हजार मतांनी आघाडीवर आहेत.

    अभिनेत्री कंगना रणौत हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून जवळपास 54 हजार मतांनी आघाडीवर आहे.या जागेवर काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

    पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघातून टीएमसीचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा सुमारे 32 हजार मतांनी आघाडीवर आहेत. या जागेवर सुरेंद्रजीत सिंग दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

    रवी किशन-कंगना रानौत

    फोटो स्रोत, Getty Images

  19. लोकसभा निवडणूक : अमृतपाल सिंहला एक लाखावर आघाडी, तुरुंगातून लढवली निवडणूक, असा आहे प्रवास

  20. सुप्रिया सुळे यांना बारामतीत मोठी आघाडी

    बारामतीच्या बहुचर्चित लढाईत शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळेंनी पुन्हा एकदा दिल्ली गाठण्याचा मार्ग सुकर केला आहे असं दिसतंय.

    बारामती लोकसभेच्या मतमोजणीमध्ये 10 व्या फेरीअखेर सुप्रिया सुळेंना 48 हजार 365 मतांची आघाडी मिळाली आहे. सुनेत्रा पवार यांना 2 लाख 77 हजार 684 मतं मिळाली आहेत तर सुप्रिया सुळे यांना 3 लाख 25 हजार 721 मतं मिळाली आहेत.

    सुप्रिया सुळे