रवींद्र वायकर 48 मतांनी विजयी, नाट्यमय घडामोडींनंतर लागला निकाल

लोकसभा निवडणुकांच्या निकालांचे लाईव्ह अपडेट्स तुम्हाला इथे वाचता येतील. तसंच, निकालासंबंधी इतरही घडामोडींचे अपडेट तुम्हाला या लाईव्ह पेजवर मिळतील.

थोडक्यात

  • लोकसभा निवडणुकीचे कल आता हाती येत आहेत.
  • अभिनेत्री कंगना रणौत हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून जवळपास 54 हजार मतांनी आघाडीवर आहे.
  • नैऋत्य मोसमी वारे आता महाराष्ट्राच्या अगदी वेशीवर पोहोचले आहेत आणि पुढच्या तीन चार दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल अशी अपेक्षा आहे.
  • दक्षिण मध्य मुंबई लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत ठाकरे गटाच्या अनिल देसाई यांनी मोठी आघाडी घेतली आहे.
  • दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या भास्कर भगरे यांनी केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्यावर मोठी आघाडी मिळवली आहे.
  • जालना मतदारसंघात पाचव्या फेरीअखेर भाजपचे रावसाहेब दानवे पिछाडीवर, काँग्रेसचे कल्याण काळे आघाडीवर
  • सांगलीत १२ व्या फेरीअखेर अपक्ष उमेदवार विशाल पाटील 52 हजार 573 मतांनी आघाडीवर, भाजपाचे संजय पाटील आणि महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील पिछाडीवर
  • अकोला मतदारसंघात काँग्रेसचे अभय पाटील आघाडीवर, भाजपचे अनुप धोत्रे आणि वंचितचे प्रकार आंबेडकर पिछाडीवर
  • नाशिकमध्ये महायुतीला दणका, मविआचे राजाभाऊ वाजेंना मोठी आघाडी

लाईव्ह कव्हरेज

ओंकार करंबेळकर

  1. मराठवाड्यातील मतदारसंघांची सध्याची स्थिती

    औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील स्थिती

    • संदीपान भुमरे - 265786
    • इम्तियाज जलील -227369

    संदीपान भुमरे 38,417 मतांनी आघाडीवर

    ...............बीड लोकसभा मतदारसंघातील स्थिती

    • पंकजा मुंडे - 216635
    • बजरंग सोनवणे - 205372

    पंकजा मुंडे 11,263 मतांनी आघाडीवर.........................................

    जालना लोकसभा मतदारसंघातील स्थिती

    • कल्याण काळे- 285297
    • रावसाहेब दानवे- 260233

    रावसाहेब दानवे 5,064 मतांनी पिछाडीवर

  2. जालना लोकसभा निकाल : काँग्रेसच्या कल्याण काळेंकडून रावसाहेब दानवे पराभूत

  3. मुंबई उत्तर मध्य मतदारसंघामध्ये उज्वल निकम आणि वर्षा गायकवाड यांच्यात 'काटे की टक्कर'

    मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या उज्वल निकम यांना 385695 मतं तर वर्षा गायकवाड यांना 382174 मतं मिळाली आहेत. उज्वल निकम यांना केवळ मताधिक्य 3521 मिळालं आहे.

  4. पंजाबचे माजी मुख्यमंत्री चन्नी यांचा विजय

    पंजाबमधील जालंधर लोकसभा मतदारसंघातून पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी विजयी झालेत. या जागेवर काँग्रेस नेते चरणजीत सिंह चन्नी यांनी भाजपच्या सुशील कुमार रिंकू यांचा 1 लाख 75 हजार 99३ मतांनी पराभव केला आहे.

    ANI

    फोटो स्रोत, ANI

    चन्नी यांनी 3 लाख 90 हजार 53 मते घेतली. 1999 ते 2019 पर्यंत या जागेवर काँग्रेसचे वर्चस्व होतं, मात्र गेल्या निवडणुकीत आम आदमी पार्टीने येथून विजय मिळवला होता.

    पंजाबमध्ये लोकसभेच्या एकूण 13 जागा आहेत. चन्नी यांच्या विजयानंतर उरलेल्या 12 जागांपैकी काँग्रेस 6, आम आदमी पार्टी 3, शिरोमणी अकाली दल एक आणि अपक्ष दोन जागांवर आघाडीवर आहेत.

  5. राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांचा मतदारांवर किती प्रभाव पडला?

    व्हीडिओ कॅप्शन, राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांचा मतदारांवर किती प्रभाव झाला?
  6. दिंडोरीत भास्कर भगरे आघाडीवर

    19 व्या फेरीनंतर उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे

    • भारती पवार- 3 लाख 91 हजार 889 (भाजप)
    • भास्कर भगरे- 4 लाख 72 हजार 955 (राष्ट्रवादी शरद पवार गट)
    नाशिक शिवसेना कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा कांद्याची माळ गळ्यात घालून जल्लोष

    फोटो स्रोत, UGC

    फोटो कॅप्शन, नाशिक शिवसेना कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा कांद्याची माळ गळ्यात घालून जल्लोष
  7. धाराशीव लोकसभा मतदारसंघात ओमराजे निंबाळकर आघाडीवर

    17 व्या फेरीअखेर धाराशीव मतदारसंघात उमेदवारांना मिळालेली मतं पुढीलप्रमाणे

    ओमराजे निंबाळकर 4,80,749

    अर्चना पाटील 2,74,159

    आघाडी- 2,06,590 (ओमराजे निंबाळकर)

  8. चंद्रपुरात प्रतिभा धानोरकर विजयाच्या दिशेने

    चंद्रपुरात प्रतिभा धानोरकर विजयाच्या दिशेने

    चंद्रपुरात प्रतिभा धानोरकर यांची विजयाकडे वाटचाल चंद्रपुरात आपला जुना गड परत मिळविण्यासाठी काँग्रेसनं महाराष्ट्राचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना संधी दिली होती. पण, काँग्रेसनं प्रतिभा धानोरकर यांना तिकीट दिलं

    प्रतिभा धानोरकर यांनी मुनगंटीवार यांना धोबीपछाड करत अगदी पहिल्या फेरीपासून लीड कायम ठेवलं आहे. सध्या प्रतिभा धानोरकर यांना 3 लाख 90 हजार मतं मिळाली असून सुधीर मुनगंटीवार यांना 2 लाख 53 हजार मतं मिळाली आहेत.

    प्रतिभा धानोरकर 1 लाख 37 हजार मतांची विजयी आघाडीकडे वाटचाल सुरू झाली आहे. सुधीर मुनगंटीवार यांना धानोरकरांचं लीड तोडणं आता शक्य नाही. त्यामुळे प्रतिभा धानोरकर यांचा विजय पक्का मानला जातोय.

  9. बारामतीचा निकाल यापेक्षा वेगळा लागेल असं कधी वाटलं नव्हतं- शरद पवार

    राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी निकालाचे कल स्पष्ट होताच पत्रकार परिषद घेतली.

    ते म्हणाले, "महाराष्ट्राच्या जनतेचं आभार. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले, त्यासाठी संघटनेच्यावतीने आभार मानतो. हा निकाल परिवर्तनाला पोषक असा आहे. या निवडणुकीत अनेक चांगल्या गोष्टी घडल्या.

    विशेष करून उत्तरप्रदेशमध्ये तुमच्या पोलपेक्षा वेगळं चित्र दिसलं. याचा अर्थ आमचे सहकारी चांगलं काम करत आहेत. मी कॉंग्रेसचे अध्यक्ष खरगे आणि इतक सहकाऱ्यांसोबत चर्चा केली. कदाचित उद्या इंडीया आघाडीची दिल्लीत बैठक होईल. नितीशकुमारांशी आणि चंद्राबाबू नायडू यांच्याशी काहीही बोलणं झालेलं नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसने दहा जागा लढवल्या होत्या त्यापैकी राष्ट्रवादीला सात जागांवर पुढे आहोत. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, जयंत पाटील आणि नाना पटोले यांच्या नेतृत्वात चांगली कामगिरी झाली आहे."

    "बारामतीत यापेक्षा वेगळा निकाल लागेल असं मला कधी वाटलं नव्हतं. बारामतीतील सामान्यांची मानसिकता काय आहे हे मला ठाऊक आहे."

  10. लातूर लोकसभा निकाल : काँग्रेसच्या डॉ. शिवाजीराव काळगेंची सुधाकर शृंगारेंविरोधात मोठी आघाडी

  11. महाराष्ट्र निकाल LIVE: ठाकरे-पवार विरूद्ध शिंदे-फडणवीस, कोण मारणार बाजी?

    लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा महाराष्ट्राच्या दृष्टिने अर्थ काय?

    उद्धव ठाकरे-शरद पवार विरुद्ध एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये कोणी बाजी मारली?

    लाइव्ह
  12. इंदौरमध्ये 'नोटा'ला 2 लाख लोकांची पसंती

    इंदौरमध्ये 'नोटा'ला 2 लाख लोकांची पसंती

    फोटो स्रोत, Getty Images

    मध्य प्रदेशातील इंदौर मतदारसंघात मतदारांनी NOTA बटण 2 लाखांहून अधिक लोकांनी दाबल्याची बातमी समोर येत आहे.

    दुपारी 2.30 वाजेपर्यंत जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार या जागेवर दोन लाखांहून अधिक मतदारांनी नोटा बटण दाबले. या जागेवर नोटा दुसऱ्या क्रमांकावर आहे.

    या जागेवर भाजपचे उमेदवार शंकर लालवाणी यांना आतापर्यंत 11 लाख 83 हजारांहून अधिक मतं मिळाली आहेत.

    बसपाचे उमेदवार संजय शंकर लाल तिसऱ्या क्रमांकावर आहेत. आतापर्यंत त्यांना केवळ 49 हजार मते मिळाली आहेत.

    संजय लाल भाजप उमेदवार शंकर लालवाणी यांच्यापेक्षा 11 लाख मतांनी पिछाडीवर आहेत.

  13. स्मृती इराणींना पिछाडीवर टाकणाऱ्या किशोरी लाल शर्मांचं प्रियंका गांधींकडून अभिनंदन

    उत्तर प्रदेशमधील अमेठी मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार किशोरी लाल शर्मा 90 हज़ार मतांनी आघाडीवर आहेत. ही आकडेवारी दुपारी 2.20 वाजेपर्यंतची आहे.

    किशोरी लाल यांचं मताधिक्य पाहता, त्यांचा विजय आता जवळपास निश्चित आहे.

    प्रियंका गांधी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, किशोरी भैया, मला अजिबात संशय नव्हता. तुम्ही जिंकाल हा विश्वास होता. तुमचं आणि माझ्या अमेठीतल्या बंधू-भगिनींचंही हार्दिक अभिनंदन.

    अमेठी गांधी कुटुंबाचा परंपरागत मतदारसंघ मानला जातो.

    2019 मध्ये भाजपच्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना अमेठीमध्ये पराभूत केलं होतं.

    यंदा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने किशोरीलाल शर्मांना उमेदवारी दिली होती.

    प्रियंका-किशोरीलाल शर्मा

    फोटो स्रोत, X/PRIYANKA

  14. काय आहे उत्तर महाराष्ट्राचा कल?

    काय आहे उत्तर महाराष्ट्राचा कल?
  15. दुपारपर्यंत एक लाखांच्यावर मतांची आघाडी घेणारे उमेदवार

    महाराष्ट्रात 9 मतदारसंघ असे आहेत, की तेथील उमेदवारांनी दुपारी अडीच पर्यंत एक लाख मतांहून अधिक आघाडी घेतली आहे. यापैकी पियुष गोयल यांना विजयी घोषित करण्यात आले आहे.

    निवडणूक
  16. काय आहे मराठवाड्याचा कल?

    मराठवाडा कल
  17. संभाजीनगरमध्ये संदिपान भुमरे आघाडीवर

    संभाजीनगरमध्ये संदिपान भुमरे आघाडीवर

    छत्रपती संभाजीनगरमध्ये (औरंगाबाद मतदारसंघ) शिवसेना शिंदे गटाचे संदिपान भुमरे आघाडीवर आहेत.

    आतापर्यंत उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे-

    • संदिपान भुमरे (शिवसेना) - 194364
    • इम्तियाज जलील (MIM) - 172889
    • चंद्रकांत खैरे (UBT) - 123438

    आघाडी- 21475 (संदिपान भुमरे)

  18. दक्षिण मध्य मुंबईत आघाडी मिळाल्यावर शिवसेना उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

    शिवसेना उबाठा गटाच्या अनिल देसाई यांना मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात आघाडी मिळाल्यावर त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे.

    फोटो स्रोत, DEEPALI JAGTAP

    शिवसेना उबाठा गटाच्या अनिल देसाई यांना मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात आघाडी मिळाल्यावर त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे.

    या मतदारसंघात मुख्यत्वे चेंबूर आणि धारावी यांचा समावेश होतो. दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघामध्ये विधानसभेचे अणुशक्तीनगर आणि चेंबूर हे मुंबई उपनगर जिल्ह्यातले दोन मतदारसंघ येतात. तर मुंबई शहर जिल्ह्यातले धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा आणि माहीम हे विधानसभा मतदारसंघ येतात.

    या मतदारसंघात इतर विभागांप्रमाणे मिश्र वस्ती असली तरी बहुतांश मतदारसंघात कष्टकरी, अल्प ते अत्यल्प उत्पन्न गटातील लोकसंख्या राहाते. या मतदारसंघामध्ये लोकसंख्येची घनताही जास्त दिसून येते.

    आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाणारी धारावी झोपडपट्टी याच मतदारसंघात आहे.

  19. नागपूरमध्ये नितीन गडकरी यांना मोठी आघाडी

    नागपूरमध्ये नितीन गडकरी यांना मोठी आघाडी

    नागपूरमध्य़े केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांच्यावर मोठं मताधिक्य मिळालं आहे. नवव्या फेरीअखेर उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे

    • नितीन गडकरी भारतीय जनता पार्टी 3,27,205
    • विकास ठाकरे इंडियन नॅशनल काँग्रेस 2,67,062

    आघाडी- 60,143 (नितीन गडकरी)

  20. जालन्यात कल्याण काळे आघाडीवर

    जालना मतदारसंघात 8 व्या फेरीअखेर कल्याण काळे यांनी आघाडी घेतल्याचे दिसते.

    या मतदारसंघात उमेदवारांना आतापर्यंत मिळालेली मते पुढीलप्रमाणे

    • कल्याण काळे- 1,82,708
    • रावसाहेब दानवे - 1,76,115

    1999 ते 2019 अशा सलग 5 निवडणुका रावसाहेब दानवे जिंकले असून यावेळीही पक्षानं त्यांना उमेदवारी दिलेली आहे.

    रावसाहेब दावने यांनी यापूर्वीच्या दोन निवडणुकांत काँग्रेसच्या विलास औताडे यांना सहज पराभूत केल्याचं दिसून आलं. पण 2009 मध्ये मात्र कल्याण काळे यांनी दानवेंना घाम फोडला होता. अगदी थोड्या फरकानं दानवे यावेळी विजयी झाले होते.

    काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांचं ठळकपणे अस्तित्व दिसत असलेल्या या मतदारसंघांमध्ये जवळपास गेल्या चार दशकांत भाजपनं मतांच्या राजकारणात बाजी मारल्याचं पाहायला मिळालं आहे.