काबूलमध्ये आत्मघातकी स्फोटात 19 लोक ठार

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

काबूलच्या एका शैक्षणिक संस्थेत आत्मघातकी हल्ल्यात किमान 19 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती काबूल पोलिसांनी दिली आहे.

हा स्फोट दश्त-ए-बारची या भागात झाला. हा भाग शहराच्या पश्चिमेला आहे. काज एज्युकेशन सेंटर असं या संस्थेचं नाव आहे.

तिथे विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होती असं तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

यातले अनेक लोक हझरा समाजाचे होते. त्यांच्यावर गेल्या काही काळात अनेकदा हल्ला झाला आहे.

सध्या स्फोटाची जबाबदारी कोणत्याही गटाने घेतलेली नाही. हझरा समाजाला तालिबान आणि आयसिसकडून कायम छळवणूक सहन करावी लागली आहे.

तालिबानच्या गृह मंत्रालयाने या हल्ल्याचा निषेध केला आहे.

तालिबान गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सत्तेवर आलं आणि ते अफगाणिस्तानमध्ये स्थैर्य आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

तरीही आयसिसचे हल्ले चालूच आहे.

दश्त-ए-बरची भागात अनेकदा हल्ले झाले आहेत. त्यात शाळा आणि रुग्णालयांचा समावेश आहे.

गेल्या वर्षी तालिबान सत्तेत येण्यापूर्वी याच भागात मुलींच्या शाळेवर हल्ला झाला होता. त्यात 85 लोकांचा मृत्यू झाला होता आणि शेकडो लोक जखमी झाले होते. त्यात बहुसंख्येने विद्यार्थी होते.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)