You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
टेक्सासः अंदाधुंद गोळीबाराने तिचा जीव घेतला, ती गेल्याच्या दुःखाने पतीचा...
- Author, बेरंड डेबसमन जूनियर
- Role, बीबीसी न्यूज, वॉशिंग्टन
- Published
- वाचन वेळ: 2 मिनिटे
टेक्सासमधील युवाल्डी येथील शाळेत मंगळवारी (24 मे) गोळीबार झाला होता. या गोळीबारात ज्या शिक्षिका मृत्यमुखी पडल्या होत्या त्यांच्या पतीचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मृत्युमुखी पडलेल्या शिक्षिकेचं नाव इर्मा गार्सिया आहे. 23 वर्षांपासून रॉब एलिमेंटरी या शाळेत त्या शिक्षिका होत्या. त्यांच्या पतीचं नाव जो गार्सिया असं नाव होतं.
एका किशोरवयीन बंदुकधाऱ्याने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 21 लोक मृत्युमुखी पडले. मृत्युमुखी पडलेल्यांपैकी 19 मुलं आणि दोन शिक्षक होते. यांमध्ये गार्सिया याही एक होत्या.
जो गार्सिया आणि इर्मा गार्सिया यांच्या लग्नाला 24 वर्ष झाली असून त्यांच्या पश्चात चार मुले आहेत.
गार्सिया कुटुंबासाठी ऑनलाइन फंड उभारण्याचं काम सुरू होतं. हा निधी 10,000 यूएस डॉलर पर्यंत उभारण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. मात्र गुरुवारी रात्रीपर्यंत जवळपास 16 लाख उभे करण्यात त्यांना यश मिळालं.
गो फाऊंड मी या ऑनलाइन पेजने दिलेल्या माहितीनुसार, हा फंड इर्मा गार्सिया यांची चुलत बहीण डेब्रा ऑस्टिन यांनी उभारला होता. त्यावेळी त्या लिहितात, "जो चा मृत्यू आत्यंतिक शोकामुळे झाला आहे यावर माझा विश्वास आहे."
इर्मा गार्सियाचा यांचा पुतण्या जॉन मार्टिनेझ ट्विटरवर लिहितो की, आपल्या पत्नीच्या हत्येनंतर तीव्र दुःखाने जो गार्सिया यांचं निधन झालं आहे.
इतर वेबसाईटवरील माहितीसाठी बीबीसी जबाबदार नाही.
फॉक्सशी संलग्नित असलेल्या एका स्थानिक वृत्तवाहिनीने जो गार्सिया यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याची बातमी दिली आहे.
या दाम्पत्याच्या पश्चात दोन मुलं आणि दोन मुली आहेत. ही सगळी मुलं 12 ते 23 वर्षे वयोगटातील आहेत.
युवाल्डीमध्ये झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर, इर्मा गार्सियाचा यांचा पुतण्या जॉन मार्टिनेझ यांनी न्यूयॉर्क टाइम्सशी बोलताना सांगितलं की, अधिकाऱ्यांनी गार्सियांना "शेवटच्या श्वासापर्यंत लहान मुलांना कवटाळलं" असल्याचं पाहिलं.
फंड उभारणाऱ्या वेबसाईटवर त्यांनी लिहिलं होतं की, "तिच्या वर्गातील मुलांचं रक्षण करण्यासाठी तिने स्वतःचं बलिदान दिलं" म्हणूनच "ती हिरो होती".
या हल्ल्यात मारल्या गेलेल्या दुसऱ्या शिक्षिका इवा मिरेलेस आणि मिसेस गार्सिया या पाच वर्षांपासून त्या शाळेत शिकवत होत्या. त्यांना अध्यापनाचा 40 वर्षांपेक्षा जास्त अनुभव होता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)