You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रशिया- युक्रेन युद्ध: मारियोपोल शहर बेचिराख, हजारोंच्या मृत्यूची भीती
मारियोपोल शहर अझोव शहराच्या एका बेटावर आहे. हे शहर रशिया आणि युक्रेन या देशात गेल्या सात आठवड्यांपासून चालू असलेल्या युद्धात केंद्रस्थानी आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी या युद्धाला संघर्षाचं केंद्रबिंदू म्हटलं आहे.
युक्रेनच्या सैन्यांनी हे शहर वाचवण्याचा अतोनात प्रयत्न केला मात्र अजूनही त्यांना यश आलेलं नाही. या शहरात नेमकं काय होतंय? तिथले दहा लाख लोक आणि हजारो सैनिक काय करतात?
युद्धापूर्वी तिथे काय परिस्थिती होती?
युद्धापूर्वी मारियोपोलची लोकसंख्या पाच लाख होती. हे एक औद्योगिक केंद्र आणि वर्दळ असलेलं बंदर होतं. रशियाच्या बाजूने असलेल्या फुटीरवाद्यांचा या परिसरावर ताबा होता. पूर्व युक्रेनवर जेव्हा 2015 मध्ये या शहरावर हल्ला झाला होता तेव्हाही या शहराची भीषण अवस्था झाली होती.
त्यानंतर हे शहर सावरलं आणि त्यांना मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणुकीत वाढ झाली होती. 24 फेब्रुवारीला रशियाने हल्ला केला आणि हे सगळं थांबलं.
रशियन हल्ल्याचं मुख्य केंद्र
रशियन सैन्याने या मुख्यत्वे करून या शहरावर हल्ला केला आहे. नकाशाचा विचार केला तर या शहरावर रशियाने ताबा मिळवला तर रशियाच्या बाजूने असलेल्या फुटिरतावादी भागात आणि दक्षिण भागातीतल क्रिमिया परिसरात एका मोठा कॉरिडॉर तयार होईल.
2014 मध्ये क्रिमिया भागावर रशियाने ताबा मिळवल्याचा दावा केला आहे.
नर्सिंग होम आणि चित्रपटगृहांवर हल्ला
युद्धाच्या सुरुवातीला एका प्रसुतीगृहावर हल्ला करण्यात आल होता. त्यानंतर एका चित्रपटगृहावर हल्ला करण्यात आला. तिथे शेकडो नागरिकांनी आसरा घेतला होता. या युद्धात झालेल्या विद्ध्वंसाचं हे सगळ्यांत मोठं प्रतीक ठरलं आहे.
मारियोपोल रशियाच्या ताब्यात असल्याचा रशियाचा दावा आहे. पूर्व भागातील एका नेत्याला या शहराचा महापौर म्हणून नेमण्यात आलं आहे. ते तिथले स्थानिक नेते आहे आणि रशियाचे समर्थक आहे. त्यांनी सध्या हे पद स्वीकारलेलं नाही.
रशियन सैनिकांनी या शहरावर बऱ्यापैकी ताबा मिळवला आहे. तरी रशियाने पूर्णपणे ताबा मिळवलेला नाही असं युक्रेनचं म्हणणं आहे. अझोव्त्सल स्टीलवर्क्स हा कारखाना आणि बंदर अजूनही युक्रेनच्या ताब्यात आहे.
मारियोपोल शहरावर ताबा मिळवणं युक्रेनच्या सैन्यासाठी दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. ऑस्ट्रियाचे सैन्य तज्ज्ञ टॉम कुपर म्हणतात की रशियाच्या मरीन्सने अनेक बंदरांच्या भागावर ताबा मिळवला आहे. "याचा अर्थ असा की आता हे शहर वाचवण्यासाठी आता एक नव्हे तर तीन बाजूंनी प्रयत्न करावे लागणार आहे."
कुपर यांच्या मते याचा संबंध नवीन रशियन कमांडर अलेक्झांडर ड्वोरकोनिकोव्ह यांच्या निवडीशी आहे. त्यांनी रशियाने सिरियावर केलेल्या हल्ल्याचं नेतृत्व केलं होतं. मारियोपोल शहरावरचा हल्ला हा सिरियावरच्या हल्ल्यासारखा आहे. या शहरावर सातत्याने हल्ले होत आहेत. मारियुपोल च्या महापौरांनी रशियावर रासायनिक हल्ले केल्याचा आरोप केला आहे.
11 एप्रिलला रशियाच्या हल्ल्याला तोंड देताना युक्रेनच्या सैन्यांनी, मरीन सैन्यांनी आणि स्थानिक पोलिसांनी एक विषारी पदार्थ वापरल्याचा आरोप केला.
युक्रेनच्या सैन्यांना या विषारी हल्लायाच्या त्रास झाल्याचंही वृत्त आहे. या हल्ल्यामुळे युक्रेनच्या सैनिकांना श्वास घ्यायला त्रास झाला, डोळे कोरडे पडले आणि रक्तदाबातही वाढ झाली.
युक्रेनचं संरक्षण मंत्रालय अशा पदार्थांचा खरंच वापर झाला का याची पडताळणी करत आहेत. फॉस्फरस बाँबचाही हा परिणाम असल्याचंही बोललं जात आहे.
रशियाने फॉस्फरस बाँब वापरल्याचं पाश्चिमात्य देशाच्या गुप्तचर विभागाने सांगितलं आहे. रशियाने मात्र यावर कोणतंही भाष्य करण्यास नकार दिला आहे.
अझोव्ह पथक
युक्रेन सैन्याचं अझोव्ह पथक युक्रेन च्या नॅशनल गार्डचा एक भाग आहे आणि युक्रेनच्या 36व्या ब्रिगेडचा एक भाग आहे.
मारियोपोल शहर वाचवण्यासाठी युक्रेनच्या सैन्यांची मदत मिळावी म्हणून सोशल मीडियावर मेसेज करत आहेत. रशिया आणि युक्रेनच्या सैन्याचं प्रमाण एकास दहा आहे. त्यामुळे रशियन सैनिकांना तोंड देण्यास मोठ्या अडचणी येत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
त्यांच्या मते 14000 रशियांना सैनिकांचा सामना करण्यासाठी 1500 युक्रेनियन सैनिक आहेत.
मारियोपोल शहर 90 टक्के उद्धवस्त झालं आहे. युक्रेनियन प्रशासनाच्या मते तिथे 22,000 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मात्र हा आकडा नेमका नाही. कारण हे शहर जगाच्या इतर भागापासून विलग झालं आहे.
शहराच्या बहुतांश भागात वीज, गॅस आणि पाणी नाही. याचा अर्थ लोक पाण्याच्या अभावी, भुकेने, आणि किंवा शस्त्रास्त्रच्या हल्ल्यांनी मेले आहेत.
अन्नधान्याचा तुटवडा
युक्रेनचे सैनिक हे शहर वाचवण्याचे अटोकाट प्रयत्न करत आहेत मात्र हे करताना अन्न आणि पाणी संपत असल्याचं त्यांनी सांगितलं. यावर युक्रेनच्या कमांडर-इन-चीफ ने यावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. ते खरंतर सार्वजनिकरित्या कमी बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
ते म्हणाले की याबाबत सैन्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. तसंच इतर युक्रेनचे सैन्य या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. सैन्यांच्या समस्यांची अशी सार्वजनिकरित्या चर्चा करू नये असंही ते म्हणाले.
झेलेन्स्नकी कबूल करतात की या हल्ल्याला तोंड देण्यासाठी युक्रेनकडे पुरेसं मनुष्यबळ नाही.
"हे युद्ध लवकरात लवकर संपवण्यासाठी आमच्याकडे पुरेशी शस्त्रं नाहीत." हा एक प्रकारे इतर देशांना पुरेशी मदत न दिल्याबद्दल एक टोमणाच होता.
काही नागरिक मारियोपोल शहर सोडून गेले आहेत. पण ते धोकादायक आहे कारण नागरिकांच्या कारवर आणि पादचाऱ्यांवर हल्ल्यांचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे युक्रेनच्या सैन्यांना तिथून परत येणं आणखी कठीण होणार आहे.
युक्रेनचे लष्कर विषयाचे तज्ज्ञ ओलेक्सि मेलयंक म्हणतात की तिथल्या परिघाचा थोडाही भाग उघडला तरी युक्रेनच्या सैनिकांना तिथल्या लोकांना वाचवणं अशक्य होईल कारण ती उद्ध्वस्त होण्याचा धोका मोठा आहे.
गेल्या काही आठवड्यांत युक्रेनची अशी अनेक विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे.
या बातम्या खऱ्या आहेत का?
युक्रेनच्या चीफ ऑफ स्टाफने या विषयावर सध्या तरी भाष्य केलेलं नाही. तिथल्या प्रशासनाच्या प्रमुखांनी बीबीसीला सांगितलं की याबाबत ते काहीही भाष्य करण्याच्या स्थितीत नाही.
"युद्धाच्या काळात किती जीवितहानी झाली याची माहिती उघड करता येत नाही."
त्याचवेळी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या सल्लागारांनी सांगितलं की अनेक युक्रेनियन हेलिकॉप्टर मदत पुरवत असताना पाडण्यात आल्याची माहिती दिली होती.
मेलयंक म्हणतात की रशियन हवाई दल मारियोपोलची हवाई जागेची सातत्याने पाहणी करत आहेत. त्यामुळे युक्रेनला तिथे तोंड देणं अत्यंत कठीण होत आहे.
मारियोपोल शहर आता अत्यंत बिकट परिस्थितीत आहे.
मारियोपोल शहरात मोठा विद्ध्वंस झाला आहे तरी हे शहर एक वीरत्वाचं प्रतीक आहे. रणनीतीचा विचार केला असता हे एक महत्त्वाचं शहर आहे.
लँड कॉरिडॉर
मेलयंक म्हणतात, "मारियोपोल शहरावर ताबा मिळवणं हा त्यांच्यासाठी मोठा विजय असेल. त्यामुळे क्रिमिया पर्यंत एक लँड कॉरिडॉर तयार होण्यास मोठी मदत होईल.
युक्रेनच्या मरीनने रशियासमोर शरणागती पत्करली अशाही बातम्या वारंवार येत असतात. मात्र त्या बहुतांश वेळा तथ्यहीन असतात.
युक्रेनचे सैन्य मारियोपोल फार काळ वाचवू शकतील असं वाटत नाही पण अद्यापही झेलेन्स्की आणि इतर सैनिक अजूनही आशादायी आहेत.
"काहीही झालं तरी युक्रेनियन सैन्याचं मन तिथेच गुंतलं आहे. आम्ही लढत राहू.'
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)