फेसबुकचे युझर झाले कमी; 18 वर्षात पहिल्यांदाच

फेसबुक, सोशल मीडिया, इंटरनेट, मार्क झकरबर्ग

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, फेसबुक
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

सोशल मीडिया क्षेत्रातली मोठी कंपनी असलेल्या फेसबुकच्या डेली अॅक्टिव्ह यूझर्स (DAUs)च्या संख्येमध्ये 18 वर्षांच्या इतिहासामध्ये प्रथमच घट झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

डिसेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीमध्ये प्रथमच DAUsचा आकडा घटून 1.929 अब्ज एवढा झाल्याचं फेसबुकची पॅरेंट कंपनी मेटा नेटवर्क्सनं सांगितलं आहे. यापूर्वीच्या तिमाहीमध्ये हा आकडा 1.930 अब्ज एवढा होता.

त्याचबरोबर टिकटॉक आणि युट्यूबसारख्या स्पर्धकांमुळं उत्पन्नातील वाढदेखील मंदावली असल्याचंही कंपनीच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. तसंच जाहिरातदारांकडूनही खर्चात कपात करण्यात आल्याचं म्हटलं आहे.

न्यूयॉर्कमधील शेअर बाजारात ट्रेडिंगनंतर मेटाचे शेअर्स जवळपास 20 टक्क्यांपेक्षा जास्त घसरले आहेत.

मेटाच्या शेअर्सचे दर घसरल्याचा परिणाम म्हणजे कंपनीचं स्टॉक मार्केटमधील मूल्य जवळपास 200 अब्ज डॉलरने घसरलं आहे.

त्याचबरोबर ट्विटर, स्नॅप आणि पिंटरेस्ट अशा इतर सोशल मीडिया कंपन्यांशी संलग्न कंपन्यांचे शेअर्सदेखील घसरल्याचे पाहायला मिळाले आहे.

यूझर्स आणि त्यातही तरुण यूझर्स आम्हाला सोडून स्पर्धेतील इतरांकडे वळल्यामुळं कंपनीच्या वाढीला धक्का बसला असल्याचं सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी म्हटलं आहे.

मेटा हे डिजिटल अॅडव्हरटायझिंगसाठी गुगलनंतर जगात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे प्लॅटफॉर्म आहे. अॅपलनं ऑपरेटिंग सिस्टीममध्ये केलेल्या प्रायव्हसीतील बदलांचाही फटका बसला असल्याचं मेटानं म्हटलं आहे.

या बदलांमुळं ब्रँड्सना फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर त्यांच्या जाहिरातींसंदर्भात काही अडचणी येत आहेत. त्याचा परिणाम म्हणजे यावर्षी 10 अब्ज डॉलरचा फटका बसू शकतो, असं मेटाचे मुख्य वित्त अधिकारी डेव्ह वेहनर यांनी सांगितलं.

या कालावधी मेटाच्या उत्पनामध्ये 33.67 अब्ज डॉलरपर्यंत वाढ झाली आहे. यापैकी बहुतांश उत्पन्न प्रामुख्यानं जाहिरातीतून मिळतं. बाजारातून वर्तवण्यात आलेला अंदाज कसाबसा ओलांडला आहे.

तर पुढच्या तिमाहीसाठी 27 ते 29 अब्ज डॉलरच्या उत्पन्नाचा अंदाज वर्तवण्यात आला असून तोही अपेक्षा आणि विश्लेषणाच्या तुलनेत कमी आहे.

चीनमधील टेक जायंट बाईटडान्सबरोबर स्पर्धा करण्यासाठी कंपनी सध्या व्हिडिओमध्ये स्वतः गुंतवणूक करत आहेत. पण त्यांच्या पारंपरिक फेसबूक आणि इन्स्टाग्राम फीडच्या तुलनेत त्यांना कमी उत्पन्न मिळत आहेत.

मात्र, व्हीडिओ आणि व्हर्च्युअल रियालिटीमध्ये केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल असा विश्वास असल्याचं झुकेरबर्ग यांनी म्हटलं आहे. यापूर्वीच्या मोबाईलवरील जाहिराती आणि इन्स्टाग्राम स्टोरीजसंदर्भात त्यांचा अंदाज खरा ठरला होता.

पण यापूर्वी केलेल्या बदलांदरम्यान त्यांना प्रमुख प्रतिस्पर्ध्याशी सामना करावा लागला नव्हता, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

"आमच्या टीम अत्यंत उत्तम काम करत असून, प्रोडक्ट वेगानं प्रगती करत आहे. यामध्ये असलेली एक वेगळी बाब म्हणजे याठिकाणी टिकटॉक हा आधीच मोठा स्पर्धक असून त्याची प्रगतीही अत्यंत वेगानं होतं आहे," असंही ते म्हणाले.

विश्लेषण - जेम्स क्लेटन, टेक्नॉलॉजी रिपोर्टर, उत्तर अमेरिका

मेटा घसरणीच्या मार्गावर आहे का? फेसबुकच्या प्रगतीचा आलेख हा कायम चढता राहिला आहे.

प्रत्येत तिमाहीमध्ये जागतिक आकडे हे कायम एकाच दिशेने म्हणजे वाढलेले पाहायला मिळाले आहेत.

गेल्या काही वर्षांमध्ये युरोप आणि अमेरिकेत कंपनीची वाढ थांबलेली असतानाही अशी स्थिती होती. उर्वरित जगातून वाढलेल्या युझर्समुळं हा वाढीचा मुखवटा दिसत होता.

फेसबुक, सोशल मीडिया, इंटरनेट, मार्क झकरबर्ग

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, फेसबुकचे संस्थापक मार्क झकरबर्ग

फेसबुक हे तरुणांमध्ये पूर्वी लोकप्रिय होतं, तसं सध्या नाही. टिकटॉक त्यांच्या व्यवसायावर परिणाम करत असल्याचं त्यांनी स्वत: मान्य केलं आहे.

पण गुंतवणूकदारांना मेटाबाबत चिंता वाटण्याची इतरही काही कारणं आहेत.

मेटानं त्यांना मेटाव्हर्सवर लक्ष केंद्रित करायचं होतं, त्यामुळं नाव बदललं. मेटाव्हर्सच्या निर्मितीच्या आसपासही सध्या मेटा नाही. हे केवळ सध्याच्या घडीला एक स्वप्न आहे.

मार्क झुकेरबर्ग यांना यासाठी मोठ्या संधी असल्याचं वाटत आहे. त्यामुळं अब्जावधी डॉलर्सचा खर्च याची निर्मिती करण्यावर केला जात आहे. पण हा एक मोठा धोका आहे.

मात्र, मेटाच्या समस्यांवरचं तत्काळ समाधान टिकटॉकची खरेदी करणं हे असू शकतं का? मात्र, अँटि कॉम्पिटिशन लॉमुळं अमेरिकेतील नियामक त्यासाठी कधीही मान्यता देणार नाहीत.

त्याता आता सिलिकॉन व्हॅलीमध्ये अनेकजण हे आता फेसबुककडे विखारी ब्रँड म्हणून पाहत आहेत. काही वर्षांपूर्वी याठिकाणी काम करणं हे जेवढं छान होतं, तेवढं आता नक्कीच नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.

त्यामुळं अधिकाधिक प्रतिभा असलेल्यांना आकर्षित करणंही कठीण होत आहे. मेटापुढं काही अत्यंत गंभीर समस्या आ वासून आहेत. हा मैलाचा दगड म्हणजे कदाचित फक्त सुरुवात असू शकते.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)