तालिबान: अफगाणिस्तानून निघालं विमान, दाटीवाटीतून झाला प्रवास

फोटो स्रोत, Defense One
प्रवाशांनी खचाखच भरलेल्या विमानात बव्हंशी पुरुष आहेत. त्याचबरोबर काही स्त्रिया आणि लहान मुलंही आहेत. ते कॅमेऱ्याकडे पाहत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर काळजी आहे, त्यांना थोडंसं हायसंही वाटत असावं. हा फोटोची बीबीसीने स्वतंत्रपणे पडताळणी केलेली नाही. हा फोटो अमेरिकेची सुरक्षाविषयक विश्लेषण करणाऱ्या Defense one या वेबसाईटवरून घेण्यात आला आहे.
रविवारी अनेक नागरिक दाटीवाटीने विमानात बसले होते, असं या वेबसाईटवर नमूद करण्यात आलं आहे. मात्र लोकांना उतरण्यास न सांगता टेक ऑफ करावं असा निर्णय विमान कर्मचाऱ्यांनी घेतला.
C-17 Globemaster या विमानात सर्वाधिक म्हणजे 640 प्रवासी बसले होते. या आधी 1991 मध्ये इथोपियामधून 1000 पेक्षा अधिक ज्यू स्थलांतरितांना इस्रायलच्या एका विमानात नेण्यात आलं होतं. हा आतापर्यंतचा विक्रम आहे.
Defense one या वेबसाईटने एका लष्करी अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितलं की काबूलहून कतारला जाणाऱ्या एका विमानातही असेच असंख्य प्रवासी होते.
हा फोटो पँटागॉनने प्रसिद्ध केलेला नाही. सोमवारी काबूल विमानतळावर जमलेल्या हजारो लोकांची आगतिकता स्पष्ट दिसत होती. लोकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिकन सैन्याला बराच संघर्ष करावा लागला.
अशाच एका विमानाचा फोटो सोमवारी समोर आला होता. त्यात अनेक नागरिक विमानाबरोबर धावत होते तर काही विमानाच्या बाजूला लटकले होते. जेव्हा या विमानाने हवेत झेप घेतली तेव्हा दोन नागरिक खाली कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली आहे.

अशा प्रकारे हवाई मदतीचं स्वागत झालं. तरीही तालिबानमुळे असंख्य लोकांना देश सोडावा लागला. अशा परिस्थितीत मदत मिळालेल्या लोकांची संख्या अगदीच नगण्य आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या शरणार्थींची संघटना असलेल्या UNHCR ने अफगाणिस्तानातून लोकांना परत आणण्यासाठी आग्रह करू नये असं आवाहन केलं आहे.
या संस्थेच्या मते ही परिस्थिती उद्भवल्यापासून 5,50,000 अफगाण नागरिक देश सोडून गेले आहेत. त्यातील 20 हजार ते 30 हजार लोक दर आठवड्याला सीमा ओलांडून पळून जात आहेत असं UNHCR च्या अफगाण प्रतिनिधी कॅरोलिन वॅन बुरेन यांनी सीएनएनला सांगितलं. तसंच तालिबान आणखी जवळ आल्यानंतर काबूलला 1,20,000 लोक आलेत.
ज्या लोकांनी देश सोडला त्यांनी अमेरिकेच्या सैन्याबरोबर काम केलं आहे. त्यांना आता जीवाची भीती वाटत आहे. मात्र 1990 च्या दशकात तालिबानचं साम्राज्य असताना स्त्रियांना दिलेल्या वागणुकीमुळे अनेक लोक भेदरले आहेत.
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेशी संलग्न असलेल्या लोकांना पुन्हा अफगाणिस्तानाच स्थिरस्थावर होण्यासाठी मदत करण्याची योजना व्हाईट हाऊसने आखली होती. तसंच राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही 500 मिलियन डॉलरची मदत स्थलांतरितांना जाहीर केली आहे.
अमेरिकेने 2000 नागरिकांना अफगाणिस्तानातून विशेष स्थलांतरित व्हिसा योजनेअंतर्गत बाहेर काढलं होतं. अशा आणखी हजारो लोकांना बाहेर काढण्याची अमेरिकेची योजना आहे. जर्मनीसह अनेक देश ही योजना आखत आहेत. जर्मनीच्या राष्ट्राध्यक्ष अँगेला मर्केल यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना सांगितलं की आणखी 10,000 लोकांना तिथून बाहेर काढण्याची गरज आहे.
युकेचे परराष्ट्र मंत्री डॉमिनिक राब यांनी बीबीसी ब्रेकफास्टला सांगितलं की 150 ब्रिटिश नागरिकांना रविवारी तिथून बाहेर काढण्यात आलं.
अफगाणिस्तानातील परिस्थितीमुळे युरोपीय देशामुळे स्थलांतरितांचं मोठं संकट उभं राहिलं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























