चीनचं जुराँग रोव्हर मंगळावर उतरलं

मंगळावर उतरलेल्या जुराँग रोव्हरचं काल्पनिक चित्र

फोटो स्रोत, CNSA

फोटो कॅप्शन, मंगळावर उतरलेल्या जुराँग रोव्हरचं काल्पनिक चित्र
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

मंगळावर यशस्वीरित्या रोव्हर उतरवणारा चीन हा दुसरा देश ठरलाय. सात महिन्यांचा अंतराळ प्रवास करून आणि तीन महिने कक्षेमध्ये प्रवास केल्यानंतर शेवटच्या 9 मिनिटांच्या खडतर प्रवासानंतर चीनचा जुराँग रोव्हर मंगळावर उतरला.

जुराँग हे चीनच्या पुराणांमधल्या अग्नी आणि युद्ध देवतेचं नाव आहे. शनिवारी हा रोव्हर मंगळावर यशस्वीपणे उतरल्याचं चीनच्या नॅशनल स्पेस अॅडमिनिस्ट्रेशनने म्हटलंय.

मंगळाच्या उत्तर गोलार्धातल्या युटोपिया प्लॅनेशिया पठारावर हा सहा चाकांचा रोव्हर उतरला.

संरक्षणासाठीचं कवच (कॅप्सूल), पॅराशूट आणि रॉकेटचा वापर करून हे लँडिंग करण्यात आलं. आतापर्यंत फक्त अमेरिकेने अशा प्रकारे मंगळावर रोव्हर उतरवला होता.

तियानवेन -1 ऑर्बिटरमधून हा जुराँग रोव्हर फेब्रुवारी महिन्यात या ग्रहाच्या कक्षेत पोहोचला. मंगळावरच्या युटोपिया पठाराचा यानंतर हाय रिझोल्यूश फोटोंद्वारे अभ्यास करण्यात आला आणि लँडिंगसाठी सुरक्षित जागा ठरवण्यात आली.

फारशी विवरं नसलेली वा मोठे खडक नसलेली जागा लँडिंगसाठी निवडण्यात आली.

मंगळावरून पाठवलेला रेडिओ मेसेज पृथ्वीवर पोहोचायला 18 मिनिटं लागतात. त्यामुळे हा कालावधी लक्षात घेत चीनी तंत्रज्ञांना लँडिग करावं लागलं.

मंगळाच्या कक्षेत पोहोचल्यानंतर तियानवेन - 1 ऑर्बिटरने या ग्रहाच्या पृष्ठभागाचा अभ्यास केला.

फोटो स्रोत, CNSA

फोटो कॅप्शन, मंगळाच्या कक्षेत पोहोचल्यानंतर तियानवेन - 1 ऑर्बिटरने या ग्रहाच्या पृष्ठभागाचा अभ्यास केला.

आता हा रोव्हर मंगळावर यशस्वीपणे उतरल्यानंतर चीनी संशोधक याच्या मदतीने तिथल्या भूप्रदेशाचा मंगळावरचे 90 दिवस अभ्यास करतील.

मंगळावरचा एक दिवस 24 तास आणि 39 मिनिटांचा असतो.

या जुराँग रोव्हरचं वजन आहे 240 किलो आणि यावर सौरऊर्जेसाठी पॅनल लावण्यात आली आहेत.

रोव्हरच्या शिडावर असलेल्या कॅमेऱ्याच्या मदतीने फोटो तर काढता येतातच पण सोबतच रोव्हरला या पृष्ठभागावर वावर करतानाही याची मदत होते.

या रोव्हर असलेल्या आणखी 5 उपकरणांच्या मदतीने मंगळावरील दगडांचा अभ्यास करता येणार असून जमिनीखाली कुठे पाणी वा बर्फ आहे का, याचाही शोध घेता येणार आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)