पाकिस्तानात हॉटेलमध्ये भीषण स्फोट, चौघांचा मृत्यू तर 11 जण जखमी

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

पाकिस्तानातील क्वेटा शहरातील प्रसिद्ध सेरेना हॉटेलमध्ये झालेल्या भीषण स्फोटात किमान चार जण ठार झाले असून 11 जण जखमी झाले आहे

पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधील चीनचे राजदूत या हल्ल्याचे लक्ष्य असावेत.

हल्ल्याच्या वेळी चीनचे राजदूत क्वेटामध्ये होते असं सांगितलं जात आहे. क्वेटा ही अफगाण सीमेजवळ असलेल्या बलुचिस्तान प्रांताची राजधानी आहे.

मात्र हल्ल्याच्या वेळी चीनचे राजदूत हॉटेलमध्ये उपस्थित नव्हते. हा स्फोट हॉटेलच्या कार पार्किंगमध्ये झाला.

सेरेना हॉटेल क्वेटामध्ये खूप प्रसिद्ध आहे. याठिकाणी उच्चपदस्थ सरकारी अधिकारी आणि प्रख्यात लोकांचे येणे-जाणे असते.

पाकिस्तानी तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

गृहमंत्री शेख रशीद अहमद यांनी एआरआय न्यूज टीव्हीशी बोलताना सांगितलं की, हॉटेलमधील स्फोट हा स्फोटकांनी भरलेल्या एका कारमध्ये झाला.

त्यांनी सांगितलं की, हल्ल्याच्या वेळी चीनचे राजदूत नोंग रोंग एका कार्यक्रमात होते, पण ते हॉटेलमध्ये नव्हते.

पाकिस्तानपासून स्वातंत्र्य हवे असलेल्या बलुचिस्तानमध्ये फुटीरतावादी दीर्घकाळापासून सक्रिय आहेत.

बलुचिस्तानचे फुटीरतावादी त्यांचे वास्तव्य असलेल्या प्रदेशात चीनच्या प्रमुख प्रकल्पांना विरोध करत असतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)