अफगाणिस्तानात सर्वोच्च न्यायालयाच्या दोन महिला न्यायाधीशांची हत्या

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

अफगाणिस्तानमध्ये दोन न्यायाधीशांची हत्या करण्यात आली आहे.

कोर्टाच्या प्रवक्त्यांनी एएफपी या एजन्सीला दिलेल्या माहितीनुसार, दोन महिला न्यायाधीश गाडीतून ऑफिसमध्ये जात असताना अज्ञात बंदूकधाऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या निर्णयानंतर अमेरिकन सैन्याला अफगाणिस्तानातून परत बोलावणं सुरू झालं आहे. त्यातच अफगाणिस्तानातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय व्यक्तिंना लक्ष्य केलं जात आहे.

अफगाणिस्तानमध्ये सध्या अमेरिकन लष्कराचे 2500 जवान आहेत.

अफगाणिस्तानच्या उपराष्ट्रपतींनी याच आठवड्यात बीबीसीला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं, की अफगाणिस्तानसारख्या अस्थिर देशात अमेरिकन सैन्य हटवल्यामुळे मोठ्या प्रमाणात हिंसाचार वाढण्याची शक्यता आहे.

रविवारी काय झालं?

या महिलांवर पाळत ठेऊन हल्ला करण्यात आला. या हल्यात ड्रायव्हर जखमी झाला आहे.

ही घटना काबुलच्या कला-ए-फतुल्लाह या परिसरात घडली. आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

हा हल्ला तालिबानकडून झाला असल्याची शक्यता आहे. पण, त्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

तालिबानचे प्रतिनिधी आणि अफगाणिस्तान सरकार यांच्यात दोहामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चा सुरू आहे. या चर्चेदरम्यानच या हत्या झाल्या आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)