You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डोनाल्ड ट्रंप यांच्या मुलालासुद्धा झाला होता कोरोना संसर्ग
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या मुलालासुद्धा कोरोनाची लागण झाली होती, अशी माहिती समोर आली आहे.
ट्रंप यांचा 14 वर्षीय मुलगा बॅरन यालासुद्धा कोरोनाचा संसर्ग झाला होता. आता त्याची टेस्ट निगेटिव्ह आली आहे, असं ट्रंप यांची पत्नी मेलानिया ट्रंप यांनी सांगितलं.
ज्या गोष्टीची भीती होती, तेच झालं. बॅरनचा टेस्ट पॉझिटिव्ह आला होता. पण, सुदैवाने तो एक सुदृढ किशोरवयीन मुलगा आहे. त्याच्यात संसर्गाची कोणतीही लक्षणं नाहीत, असं मेलानिया म्हणाल्या.
राष्ट्राध्यक्ष ट्रंप आणि मेलानिया यांना कोरोना संसर्ग झाल्याची माहिती त्यांनी 2 ऑक्टोबरला दिली होती.
दोघांव्यतिरिक्त व्हाईट हाऊसमधील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. पण आता सर्वजण त्यातून बरे झाले आहेत.
बुधवारी (15 ऑक्टोबर) ट्रंप यांनी निवडणूक प्रचार कार्यक्रमात जाण्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधला. लहान मुलगा बॅरन आता बरा झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
बॅरनमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून आली नाहीत. त्याला संसर्ग झाल्याचं कळलंही नाही, त्याची प्रतिकारशक्ती अतिशय चांगली आहे, असं ट्रंप म्हणाले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)