You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इंग्लंड-वेस्ट इंडिज : कोरोनामुळे बदललेल्या नियमांप्रमाणे कसे होणार सामने?
कोरोना संकट जगभर तीव्र झालेलं असताना इंग्लंड-वेस्ट इंडिज क्रिकेट संघ टेस्ट सीरिजसाठी सज्ज झाले आहेत. बायो सेक्युअर बबल वातावरणात होणाऱ्या या सीरिजसाठी काही नियम बदलण्यात आले आहेत.
13 मार्च 2020 रोजी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात झालेली पहिली वनडे रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवण्यात आली होती. त्यानंतर जवळपास चार महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं पुनरागमन होत आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरातील क्रिकेट स्पर्धांना मोठा फटका बसला आहे. मॅचेसवेळी होणाऱ्या गर्दीतून कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून अनेक खेळांच्या स्पर्धा लांबणीवर ढकलण्यात आल्या किंवा रद्द करण्यात आल्या.
इंग्लंड-वेस्ट इंडिज सीरिजसाठीचे नियम
- मॅचदरम्यान एखादा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास, त्याच्याऐवजी बदली खेळाडू खेळवण्याची परवानगी असेल. हा खेळाडू like a like replacement म्हणजे बॅट्समन कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास बदली खेळाडू बॅट्समन असावा. बॉलर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास, बदली खेळाडूही बॉलरच असावा.
- बॉल स्विंग करण्यासाठी बॉलर लाळेचा वापर करतात. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता लाळेचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. बॉलर किंवा खेळाडू लाळेचा वापर करताना दिसल्यास त्यांना समज देण्यात येईल. खेळाडू पुन्हा एकदा लाळेचा वापर करताना आढळल्यास 5 रन्सची पेनल्टी देण्यात येईल.
- टेस्ट सीरिजसाठी तटस्थ देशांच्या अंपायर्सची नियुक्ती आयसीसीतर्फे करण्यात येते. मात्र प्रवासावर असलेले निर्बंध लक्षात घेता या सीरिजसाठी स्थानिक अंपायर्सची नियुक्ती आयसीसीने केली आहे.
- दोन्ही संघांना प्रत्येक इनिंग्जमध्ये अतिरिक्त डीआरएस रिव्ह्यू मिळेल.
- खेळाडूंना जर्सी तसंच स्वेटरवर अतिरिक्त लोगो परिधान करायला परवानगी आहे.
काय आहे बायोसेक्युअर बबल?
खेळाडू तसंच सपोर्ट स्टाफच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बायोसेक्यु्र बबल तयार करण्यात आलं आहे. खेळाडू साऊदॅम्पटन एजेस बॉल स्टेडियम जवळच्या हॉटेलात राहत आहेत. स्टेडियम आणि हॉटेलव्यतिरिक्त खेळाडूंना अन्य कुठेही जाण्याची परवानगी नाही.
या परिसरात अत्यंत मर्यादित व्यक्तींनाच प्रवेश आहे. प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला थर्मल चाचणीला सामोरं जावं लागेल. कोरोनाची कोणतंही लक्षणं नसलेल्या व्यक्तींनाच प्रवेश मिळू शकतो.
कसे आहेत दोन्ही संघ?
जेसन होल्डरच्या नेतृत्वाखालील 25 सदस्यीय वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंडसाठी रवाना झाला आहे. या संघासोबत 11जणांचा सपोर्ट स्टाफही असणार आहे. फिल सिमन्स मुख्य प्रशिक्षक आहेत.
- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
वेस्ट इंडिज संघातील खेळाडू विविध देशांमधून अँटिगा इथं एकत्र आले आणि तिथून इंग्लडला रवाना झाले. अँटिगा इथे सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफची अनिवार्य कोरोना चाचणी घेण्यात आली. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफने चाचणीचा टप्पा यशस्वीपणे पार केला.
कोरोना संसर्गाच्या भीतीने डॅरेन ब्राव्हो, शिमरोन हेटमायर आणि कीमो पॉल यांनी या दौऱ्यातून माघार घेतली आहे.
संघ: जेसन होल्डर (कॅप्टन), जेरमाईन ब्लॅकवूड, न्यूक्रुमान बोनर, क्रेग ब्रेथवेट, शमराह ब्रूक्स, जॉन कॅम्पबेल, रॉस्टन चेस, रहकीम कॉर्नवाल, शेन डावरिच, चीमर होल्र, शाइ होप, अल्झारी जोसेफ, रायमोन रायफर, केमार रोच.
राखीव खेळाडू: सुनील अंबरीस, जोशुआ डा सिल्व्हा, शॅनन गॅब्रिएल, केऑन हार्डिंग, कायले मेयर्स, प्रेस्टन मॅकस्वीन, मार्क्विन्हो मिंडले, शेयन मूसले, अँडरसन फिलीप, ओशाने थॉमस आणि जोमेल वॉरिकन.
इंग्लंडचा कॅप्टन जो रूट पहिल्या टेस्टमध्ये खेळू शकणार नाही. रुटची पत्नी गरोदर असून, जुलैच्या पहिल्या आठवड्यात ती बाळाला जन्म देण्याची शक्यता आहे. त्यामुळे रूट पहिल्या टेस्टमध्ये खेळणार नाही. उपकर्णधार बेन स्टोक्सकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. इंग्लंडने जॉनी बेअरस्टोला संघात समाविष्ट केलेलं नाही.
संघ: बेन स्टोक्स (कॅप्टन), जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, जोस बटलर, झॅक क्राऊले, जो डेन्ली, ओली पोप, डॉम सिबले, ख्रिस वोक्स, मार्क वूड.
कसा आहे दौरा?
वेस्ट इंडिजचा संघ या दौऱ्यात तीन टेस्ट मॅचेस खेळणार आहे.
पहिली टेस्ट 8 ते 12 जुलै-साऊदॅम्प्टन
मँचेस्टर इथं 16 ते 20 जुलै-मँचेस्टर
24 ते 28 जुलै- मँचेस्टर
वेस्ट इंडिज संघाचा हा दौरा मूळ कार्यक्रमानुसार मे आणि जून महिन्यात होणार होता. मात्र कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे हा दौरा लांबणीवर टाकण्यात आला.
प्रेक्षकांविना मैफल
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यादृष्टीने या मालिकेत चाहत्यांना प्रवेश देण्यात येणार नाही. इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने सामंजस्याने हा निर्णय घेतला आहे. चाहत्यांना टीव्हीवर या मालिकेचा आनंद लुटावा लागेल.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)