You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोनाः पहिल्या महायुद्धाच्या काळात पसरलेल्या स्पॅनिश फ्लूने जगाला काय शिकवलं?
शंभर वर्षांपूर्वी संपूर्ण जग पहिल्या महायुद्धातून सावरत होतं. या महायुद्धामुळे 2 कोटी लोकांचा मृत्यू झाला होताय मात्र युद्धानंतर आणखी एक मोठं संकट उद्भवलं होतं. ते म्हणजे फ्लूची साथ.
पश्चिम भागात अनेक ठिकाणी स्पॅनिश फ्लू नावाच्या या रोगाने अनेक ट्रेनिंग कँपला विळखा घातला होता. फ्रान्सच्या सीमेवर असलेल्या अस्वच्छ परिस्थितीमुळे हा रोग जास्त प्रमाणात पसरला. युद्धाचा शेवट 1918 च्या नोव्हेंबर महिन्यात झाला. मात्र सैनिक जेव्हा मायदेशी परतले तेव्हा ते हा विषाणू बरोबर घेऊन आले. त्यामुळे आणखी जीवितहानी समोर दिसत होती. त्यावेळी 5 ते 10 कोटी लोकांचा मृत्यू झाला असा अंदाज आहे.
त्यानंतर जगाला अनेक साथीच्या रोगांनी पछाडलं. फ्लूच्या तीन प्रकारांचाच त्यात समावेश होता.पण स्पॅनिश फ्लूसारखी तीव्रता कोणत्याच साथीच्या रोगात नव्हती.
सध्या थैमान घालत असलेल्या कोव्हिड-19 या रोगाने जगात चिंतेचे वातावरण आहे. स्पॅनिश फ्लूच्या साथीलाही 100 वर्षं पूर्ण होत आहेत. त्यामुळे या 100 वर्षांत नक्की काय बदललं किंवा स्पॅनिश फ्लूतून आपण काय शिकलो याचा बीबीसी फ्युचरने आढावा घेतला.
न्यूमोनियाचा धोका नेहमीचा
कोव्हिड -19 हा न्युमोनियाचाच एक प्रकार आहे. या विषाणूमुळे रुग्णाची प्रतिकारशक्ती क्षीण होते
कोव्हिड-19 मुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण स्पॅनिश फ्लूपेक्षा कमीच आहे. ज्या व्यक्तींची प्रतिकारशक्ती क्षीण आहे, किंवा वृद्ध व्यक्तींना न्युमोनियाची लागण होण्याचा धोका सर्वाधिक असतो.
काही जागांचा अपवाद
स्पॅनिश फ्लूची साथ पसरली तेव्हा विमानप्रवास तितकासा प्रचलित नव्हता. मात्र काही भागात या रोगाचा उद्रेक अजिबात झाला नाही. तेव्हा लोक बस आणि रेल्वेने प्रवास करायचे. त्यामुळे या रोगाचा प्रसार हळूहळू झाला. काही ठिकाणी अनेक महिने हा रोग पोहोचला नाही.
काही ठिकाणी या फ्लूचा प्रभाव रोखण्यासाठी चांगल्या पद्धती वापरण्यात आल्या. 100 वर्षांनंतर अजुनही या पद्धती प्रभावी आहेत. अलास्कामधील एका भागात त्यांनी शाळा बंद केल्या, सार्वजनिक ठिकाणी लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली. तसंच मुख्य रस्त्याच्या गावापासून संपर्क बंद करण्यात आला. सध्या हुवैई आणि उत्तर इटलीच्या प्रवासावर जी बंधनं घातली आहेत त्याचंच ते छोटं रुप होतं.
विषाणू आणि लोकसंख्या
डॉक्टरांच्या स्पॅनिश फ्लू जगातील सगळ्यात मोठ्या छळछावणीचा प्रकार होता. या रोगाने अनेकांचा जीव घेतलाच, मात्र त्यातले बहुतांश लोक तरुण आणि सुदृढ होते. साधारणपणे ज्या व्यक्तीची प्रतिकारक शक्ती चांगली असते ती व्यक्ती या रोगाचा सामना योग्य पद्धतीने करु शकतो. पण फ्लूचा हा प्रकार अतिशय भीषण होता.
या रोगामुळे फुप्फुसांमध्ये पाणी व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे इतर संसर्गाची वाट मोकळी झाली. गंमतीचा भाग असा की वृद्ध व्यक्तींना हा रोग होण्याची शक्यता नव्हती. कारण 1830 पासून फ्लूची साथ पसरायला सुरुवात झाली.
कोरोना विषाणूमुळे वृद्ध व्यक्ती आणि ज्या व्यक्ती आधीच एखाद्या रोगाने पीडित असतील तर त्यांना हा रोग होण्याची शक्यता जास्त असते. या रोगामुळे वृद्धांचा मृत्यूदर सध्या कमी असला तरी 80 वर्षांपेक्षा अधिक व्यक्तींच्या मृत्यूचं प्रमाण सर्वाधिक आहे.
सार्वजनिक आरोग्य:बचावाचा सर्वोत्तम मार्ग
जेव्हा पहिलं महायुद्ध संपलं तेव्हा स्पॅनिश फ्लूचा उद्रेक झाला होता. त्यामुळे सर्वं संसाधनं युद्धासाठी वळवण्यात आली होती. सार्वजनिक आरोग्याची संकल्पना तेव्हा अगदीच नवीन होती. अनेक ठिकाणी फक्त मध्यमवर्गीय किंवा श्रीमंतांनाच परवडत होता. अनेक गरीब लोकांचा या रोगामुळे मृत्यू झाला होता.
या फ्लूमुळे सार्वजनिक आरोग्याच्या संकल्पना विकसित देशांमध्ये रुजली. कारण साथीचे रोग इतक्या वेगाने पसरु शकतात हे लक्षात आलं.
साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी शहरी भागात प्रत्येक रुग्णावर उपचार करणं त्यावेळी शक्य झालं नाही. कारण त्यावेळी शासनाने सर्व संसाधनं युद्धाकडे वळवली होती. ज्यांना रोगाची लागण झाली त्यांना वेगळं ठेवण्यात आलं होतं. ज्यांना फारशी लागण झाली नाही त्यांना रोगाची जास्त प्रमाणात लागण झालेल्या लोकांपासून वेगळं ठेवण्यात आलं. लोकांच्या हालचालीवर मर्यादा घालण्यात आल्या. हे सगळं केल्यामुळे रोगाची साथ आपोआप बंद होईल असं तेव्हा वाटलं.
त्यामुळे आताच्या काळात साथीचे रोग थांबवण्यासाठी जे प्रयत्न केले जात आहेत, ते स्पॅनिश फ्लूशी लढण्यासाठी जे प्रयत्न झाले त्याचंच फलित आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)