सोशल मीडियावर मुलगा असल्याचं भासवून मुलीनंच केलं मुलींचं लैंगिक शोषण

जेम्मा वॉटनं सोशल मीडियावर स्वत:ची ओळख 16 वर्षांचा 'जेक वॅटन' अशी करून दिली होती.

फोटो स्रोत, MET POLICE

फोटो कॅप्शन, जेम्मा वॉटनं सोशल मीडियावर स्वत:ची ओळख 16 वर्षांचा 'जेक वॅटन' अशी करून दिली होती.
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

एका मुलीनं स्वत:ची ओळख तरुण मुलगा अशी करुन देत इतर मुलींचं लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस आली आहे.

जेमा वॉट या मुलीनं सोशल मीडियावर 16 वर्षांचा 'जेक वॅटन' असं नाव धारण केलं. त्यानंतर अनेकांना ती इंग्लंडमधल्या वेगवेगळ्या ठिकाणी भेटली. भेटीपूर्वी तिनं इतरांशी अश्लील फोटो शेयर केले.

21 वर्षीय वॉट 4 मुलींचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी Winchester Crown Courtनं दोषी ठरवलं आहे. तिला 8 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलीय.

तिनं आतापर्यंत 50 जणांना आपल्या जाळ्यात ओढल्याचा अंदाज पोलिसांना व्यक्त केलं आहे.

Scotland Yard च्या मते, "वॉटनं तिचा स्वत:चा फोटो स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्रामवर 'जेक' म्हणून वापरला आणि 13 ते 16 वर्षांच्या मुलींचे प्रोफाईल फोटो लाईक करून त्यांना टार्गेट केलं."

या मुलींना भेटण्यापूर्वी तिनं आधी अश्लील मेसेज आणि मादक फोटो त्यांच्यासोबत शेयर केले.

वॅट्सनं अनेक फेक सोशल मीडिया अकाऊंट तयार केले होते.
फोटो कॅप्शन, वॅट्सनं अनेक फेक सोशल मीडिया अकाऊंट तयार केले होते.

केस बांधलेले, बेसबॉल कॅप, जॉगिंग बॉटम्स आणि हुडी हा वेश तिनं परिधान केला होता.

जोपर्यंत वॉट ही एक महिला आहे, हे पोलिसांनी जाहीर केलं नव्हतं, तोपर्यंत तिच्याशी चॅटिंग केलेल्या सगळ्या मुलींना वाटत होतं की, त्या एका किशोरवयीन मुलासोबत रिलेशनशिपमध्ये आहेत.

या मुलींपैकी काहींच्या पालकांसोबत तिनं 'जेक' म्हणून वेळ घालवला होता.

या अनुभवामुळे दोन बळींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे.

'मी त्याच्यावर प्रेम करायचे'

वॉटबद्दल पोलिसांकडून सत्य कळाल्यामुळे माझा स्वप्नभंग झाल्याचं एका 14 वर्षांच्या मुलीनं सांगितलं.

"माझं जग संपलं होतं, माझा श्वास थांबला होता, मी त्याच्यावर खूप प्रेम करत होते..."असं पीडितेच्या निवेदनात म्हटलं आहे.

4 बळींपैकी एक 13 वर्षीय मुलगी प्लेमथ, दोन 14 वर्षांच्या मुली अनुक्रमे सरे आणि हॅम्पशायर , तर एक 16 वर्षांची मुलगी वेस्ट मिडलँड येथील आहे.

फिर्यादीच्या वकील बर्नाबी शॉ यांनी सांगितलं की, "वॉटनं 3 महिन्यांच्या कालावधीत नियमितपणे रात्रभर या मुलींशी संवाद साधला.

एकदा आपण वॉटच्या जननेंद्रियाला स्पर्श करत आहोत, असं एकीला वाटलं. पण, तिथं "अनेक मोजे एकत्र जोडलेले असावेत" याची जाणीव झाल्यामुळे तिला फसवणूक झाल्यासारखं वाटलं," त्यांनी सांगितलं.

वॅट्स

फोटो स्रोत, Reuters

शिक्षा सुनावताना न्यायाधीश सुसान इव्हान्स क्यूसी म्हणाल्या की, वॉटनं स्वत:च्या समाधानासाठी तरुण मुलींना तयार केलं.

"या मुलींना तिनं संभ्रमात ठेवलं आणि फसवणुकीपासून दूर जाण्याची शक्यता वाढवली," असं त्यांनी वॉटला उद्देशून म्हटलं.

डेट कॉन फिलिपा केन राईट यांनी सांगितलं की, "सगळ्या पीडितांना असा विश्वास होता की, त्यांचे एका पुरुषाशी संबंध आहेत आणि वॅाटने त्यांना पूर्णपणे ताब्यात घेतलं."

"यात सामील झालेल्या सर्व लोकांचे आयुष्य बदलणारी ही घटना आहे," असं त्या पुढे म्हणाल्या.

मार्च 2018मध्ये हॅम्पशायरमधील डॉक्टरांनी पोलिसांकडे सर्वप्रथम चिंता व्यक्त केली होती, जेव्हा एका मुलीनं तिचे मोठ्या मुलाशी संबंध असल्याचं सांगितलं होतं.

याच वर्षीच्या जुलै महिन्यात वॉटनं या 3 मुलींशी लैंगिक संबंध ठेवल्याचं कबूल केलं.

चौकशीदरम्यान तिला सोडण्यात आलं आणि ब्रिटिश ट्रान्सपोर्ट पोलिसांनी ऑक्टोबर 2018 मध्ये पुन्हा अटक केली, तेव्हा ती चौथ्या पीडित मुलीसह ट्रेनमध्ये सापडली होती.

अधिकाऱ्यांना सुरुवातीला वाटलं की, वॉट हा 16 वर्षांचा मुलगा आहे आणि ते तिला घरी म्हणजेच लंडनला घेऊन जाण्यापूर्वी त्यांना तिची खरी ओळख पटली.

लैंगिक गुन्ह्याप्रकरणी नोव्हेंबर 2019मध्ये वॅट्सला दोषी ठरवण्यात आलं.

हॅम्पशायर कॉन्स्टॅब्युलरी येथील इंस्पेक्टर निकोलस प्लुमर म्हणाले, "ही खरोखरच धक्कादायक केस आहे. एखादा गुन्हेगार मुलांचं लैंगिक शोषण करण्यासाठी किती खालची पातळी गाठू शकतो, ते यातून दिसतं."

"आपली मुलं ऑनलाईन राहून काय करतात, याविषयी त्यांना समजावून सांगण्याचा आत्मविश्वास पालकांमध्ये असायला हवा," त्यांनी पुढे म्हटलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)