आमदार प्रज्ञा राजीव सातव यांच्यावर हल्ला #5मोठ्याबातम्या

प्रज्ञा राजीव सातव

फोटो स्रोत, PrADNYASATAV/TWITTER

फोटो कॅप्शन, प्रज्ञा राजीव सातव
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा.

1. प्रज्ञा राजीव सातव यांच्यावर हल्ला

काँग्रेसचे माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा यांनी आपल्यावर हल्ला झाला असल्याची माहिती ट्वीटरवर दिली आहे.

कळमनुरी येथिल कसबे धावंडा गावामध्ये हा हल्ला झाल्याचं त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

एका अनोळखी व्यक्तीने पाठीमागून येत आपल्यावर हल्ला केला. मला गंभीर जखमी करण्याचा हा प्रयत्न होता आणि माझ्य़ा जीवाला धोका आहे. महिला आमदारावर हल्ला म्हणजे लोकशाहीवरच हल्ला. समोरुन लढा, भित्रे बनून नको.

लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.

2. व्हॅलेंटाईन डे ऐवजी काऊ हग डे

व्हॅलेंटाईन वीक सध्या सुरू आहे. दरवर्षी या आठवड्यात आणि व्हॅलेंटाईन डे म्हणजे 14 फेब्रुवारीला यासंदर्भात चित्रविचित्र बातम्या, घटना घडलेल्या दिसून येतात. त्यामुळे सर्वांचे लक्ष याकडे असते आता

पशु कल्याण मंडळाने व्हॅलेंटाईन डे ऐवजी 14 फेब्रुवारीला 'काऊ हग डे' साजरा करण्याची मागणी केली आहे.

14 फेब्रुवारीला गायींना मिठी मारून त्यांच्याप्रती प्रेम व्यक्त करावे आणि व्हॅलेंटाईन डे ऐवजी 'काऊ हग डे' साजरा करावा, अशी मंडळाने मागणी केली आहे. एबीपी माझाने ही बातमी दिली आहे.

3. राखी सावंतचे नवऱ्यावर अनैसर्गिक सेक्सचे आरोप

अभिनेत्री राखी सावंत हिने तिचा नवरा आदिल दुर्राणी यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. आदिल आपल्याला मारहाण करायचा, पैसे काढून घेतल्यामुळे आीवर उपचार होऊ शकले नाहीत. त्याचे विवाहबाह्य संबंध आहेत तसेच अनैसर्गिक सेक्सचे आरोपही त्याच्यावर केले आहेत.

आदिलवर भादंवि कलम 377 (अनैसर्गिक लैंगिक संबंध), 498ए, 323, 406, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राखी सावंतचे नवऱ्यावर अनैसर्गिक सेक्सचे आरोप

फोटो स्रोत, Getty Images

आदिल दुर्राणी याला अंधेरी कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही बातमी सकाळने प्रसिद्ध केली आहे.

4. शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प

एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपा यांच्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प 9 मार्च रोजी सादर करण्यात येईल.

27 फेब्रुवारी रोजी विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होईल. या अधिवेशनात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करतील. 27 फेब्रुवारी ते 25 मार्च या काळात हे अधिवेशन होणार आहे.

शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प

फोटो स्रोत, Getty Images

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक बुधवारी विधान भवनात आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली.

या बैठकीला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि इतर मंत्री उपस्थित होते. ही बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे.

5. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शिक्कामोर्तब केले. यानंतर रेवदंडा येथे मुख्यमंत्र्यांनी आप्पासाहेबांची भेटही घेतली. ही बातमी टाईम्स नाऊ मराठीने प्रसिद्ध केली आहे.

25 लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे स्वरूप आहे. लवकरच एका सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी 30 वर्ष निरुपण करत आहेत. बालमनावर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बालसंस्कार बैठक सुरू केल्या आणि आदिवासी वाडी, वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे कार्य केले आहे.

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर
फोटो कॅप्शन, बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)