You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
संजय पांडेंना फोन टॅपिंग प्रकरणात दिल्ली हायकोर्टाकडून जामीन
राज्याचे माजी प्रभारी पोलीस महासंचालक आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने अटक केली होती. बेकायदा फोन टॅपिंग प्रकरणात त्यांना अटक करण्यात झाली होती. आज 8 डिसेंबर रोजी त्यांना दिल्ली हायकोर्टाने जामीन दिला आहे.
गेल्या 30 जूनला ते मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त झाले होते. त्याआधी राज्याचे प्रभारी पोलीस महासंचालक होते. योग्य पोस्टिंग न मिळाल्याने त्यांनी सातत्याने त्यांची नाराजी बोलून दाखवली होती.
अवैध पद्धतीने फोन टॅपिंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
नेमकं प्रकरण काय?
नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या सीईओ चित्रा रामकृष्णन यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या संगनमताने फोन टॅपिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
NSE च्या 91 लोकांचे फोन टॅप केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. चित्रा रामकृष्णन यांच्या सांगण्यावरून यांनी हे फोन टॅप केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
पांडे यांच्याशी संबंधित iSec services private limited या कंपनीच्या माध्यमातून फोन टॅप करण्यात आले होते. ही कंपनी 2001 मध्ये स्थापन करण्यात आली होती.
त्यावेळी संजय पांडे पोलीस दलात नव्हते. त्यांनी पोलीस दलाचा राजीनामा दिला होता त्यांचा राजीनामा मंजूर झाला नाही आणि त्यांना पोलीस दलात परत बोलावण्यात आलं होतं. संजय पांडे 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)