एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे : महाराष्ट्रातील ठाकरे-शिंदे राजकीय वादाबद्दल 'या' 5 बातम्या तुम्ही नक्कीच वाचल्या पाहिजेत

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. शिवसेना पक्षात तर या बंडामुळे प्रचंड मोठा गोंधळ माजला आहे. रोज नवनवे आमदार-नेते हे एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळत असल्याचं समोर येत आहे.

या राजकीय वादाबाबत खालील पाच बातम्या तुम्ही नक्की वाचल्या पाहिजेत.

1. एकनाथ शिंदेंची 'नाराजी' हे महाराष्ट्रातलं 'ऑपरेशन लोटस'च आहे, याचे हे 5 पुरावे

चंद्रकांत पाटील मनात येईल ते मोकळेपणाने बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. महाविकास आघाडी सरकार सुस्थितीत असतानाही ते दर आठवड्याला 'सरकार लवकरच पडेल' अशी भविष्यवाणी करत होते. पण आता सरकार खरेच पडायला आले असताना मात्र चंद्रकांत पाटील शांत बसलेत. पत्रकारांनी विचारल्यावर ते म्हणाले की 'शिंदेंची बंडखोरी हा शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे.'

पण हा खरंच 'शिवसेनेचे अंतर्गत विषय' आहे का? की या बंडखोरीचा रिमोट कंट्रोल भाजपकडे आहे? आणि जर हे फडणवीसांचं 'ऑपरेशन लोटस' आहे, तर भाजप ताकाला जाऊन भांडं का लपवतंय? असे प्रश्न अनेकांच्या मनात आले असतील. त्याचीच उत्तरे तुम्हाला या बातमीत वाचायला मिळतील.

2. उद्धव ठाकरेंना आमदारांच्या बंडाचा सुगावा कसा लागला नाही?

शिवसेनेत एकनाथ शिंदेंचं बंड होऊन आता 'महाविकास आघाडी' सरकारचं अस्तित्वं धोक्यात आलं आहे.

एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images/facebook

भविष्यात होईल ते समोर येईल, पण जे भूतकाळात घडलंय त्यावरुन पडलेले काही प्रश्न अद्याप सुटले नाही आहेत.

त्यातला सर्वांत महत्वाचा प्रश्न, एवढं मोठं बंड होत असताना मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख असणाऱ्या उद्धव ठाकरेंना त्याचा अजिबात सुगावा कसा लागला नाही? लिंकवर क्लिक करून वाचा संपूर्ण बातमी.

3. 'उद्धव ठाकरेंनी 'या' 2 चुका केल्या, ज्या देवेंद्र फडणवीसांनी टाळल्या होत्या'

पृथ्वीराज चव्हाण यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं आहे.

देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रि‍पदासाठी पाठिंबा देणार का? शिवसेनेसोबत आघाडी करून काँग्रेसने चूक केली का? उद्धव ठाकरे 'डबल गेम' खेळतायत का? उद्धव ठाकरे यांच्याकडून कोणती मोठी चूक झाली? या आणि अशा काही प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली आहेत. वाचा पृथ्वीराज चव्हाण यांची सविस्तर मुलाखत..

4. शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करणारे नेते तुम्हाला माहिती आहेत का?

विधान परिषद निवडणुकांच्या निकालानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचं नाराजीनाट्य केंद्रस्थानी आलं आहे. एकनाथ शिंदे शिवसेना सोडणार का? त्यांची नाराजी दूर होणार का? ते भाजपबरोबर जाणार का? अशा अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत.

राज ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

एकनाथ शिंदेंनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला तर पक्षासाठी तो मोठा धक्का असू शकतो. पण याआधीही नेत्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे. वाचा शिवसेनेला जय महाराष्ट्र करणारे नेते कोण-कोण?

5. एकनाथ शिंदे : रिक्षाचालक ते शिवसेना फोडणारे नेते

एकनाथ शिंदे गेली अनेक वर्षं शिवसेनेत कार्यरत आहेत.

एकनाथ शिंदे

फोटो स्रोत, facebook

ठाण्यामधील कोपरी-पाचपाखाडीचे आमदार एवढीच त्यांची ओळख नसून गेली अनेक दशकं ते शिवसेनेत संघटन वाढवणारे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे कल्याण मतदारसंघातून दुसऱ्यांदा लोकसभेत गेले आहेत. पाहा एकनाथ शिंदे यांचा आजपर्यंतचा राजकीय प्रवास कसा राहिला?

व्हीडिओ कॅप्शन, अफगाणिस्तानात भूकंपानंतर उद्धवस्त गावांची भयावह दृश्यं; ढिगाऱ्यात अडकले शेकडो मृतदेह
व्हीडिओ कॅप्शन, आसाम आणि बांगलादेशमध्ये पुरामुळे शंभरपेक्षा जास्त मृत्यू
व्हीडिओ कॅप्शन, महागाई आणि तुटवड्यामुळे या लोकांवर शिळ्या पोळ्या खायची वेळ आली
व्हीडिओ कॅप्शन, पुरुषही महिलांकडून घरगुती हिंसाचार सहन करत असतात…

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)